#शरद सांगे नामदेवा - विठ्ठल ऐकल्याविण कसा राही.
#शरद सांगतो #नामदेवा -विठ्ठल ऐकल्याविण कसा राही ??
"नामदेवे रचिला पाया,
तुका झालासे कळस "
वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला. या अखंड महाराष्ट्रावर ज्या सावळ्या विठुरायाची कृपादृष्टी रहावी म्हणुन नामदेवापासुन तुकारामापर्यंत जय हारी विठ्ठलचा गजर ज्या परंपरेनी जिवंत ठेवला त्या #वारकरी परंपरेचाच एक #पाईक म्हणजे #शरद #झरे. दि .4 मार्च 2020 रोजी शरद झरेची #पांडुरंगाला #साकडं ही पोस्ट पाहिली. आणि फोन केला म्हणलं ,
"शरदजी, अहो काय भाबडेपणा लावलाय. हे असं करून कंपन्या बंद होणार का ? कशावरून वाटतं की पांडुरंग ऐकेल तुमचं."
त्यावर शरदजी व्यक्त झाले. म्हणाले.
"विक्रांत पांडुरंग म्हणजे कोण रे ?? तुझा माझा देव . बहुजनांचा देव. या महाराष्ट्राच्या मातीत गुरासारख्या राब राब राबणार्या आणि कडक उन्हात घामाने निथळुन तहान लागल्यावर नांगरावर उभं राहुन पाणी पिणार्या सावळ्या बापाचं प्रतिकचं जणु. . माझा बाप पण तरीही सगळ्या जगाचा सुप्रीम. आज मी त्याला साकडं घातलय. हा भाबडेपणा नाही. श्रद्धा आहे .माझी निष्ठा आहे. माझ्या सायकल यात्रेला प्रारंभ केला तेव्हापासुन माझ्या डोक्यात हे होतं. तुला माहित आहे की मी माझं आयुष्यच पर्यावरणाला वाहिलय. तेव्हा प्रचंड वेगाने माणसाच्या भौतिक सुखासाठी कापली जाणारी झाडं पाहुन , शुभ्र ,निरभ्र ,शुद्ध ऑक्सिजनने भरलेल्या आकाशाच्या छाताडाला चिरत जाणारे कारखान्यांचे काळेकुट्ट कार्बन-डायऑक्साईड ओकणारे धुराडे पाहुन मनाला खुप वेदना होतात. आणि एकाचवेळी राग, संताप, हतबलता आणि सगळं बदलण्याची ऊर्मी अशा संमिश्र भावनांच मिश्रण तयार होतं. मग हा कोलाहल घेवुन मी जाणार तरी कुठं ? सरकारकडे ? छे ! अरे दरवर्षी सरकारच ज्याच्या दारात आपलं मागणं घेवुन जातं त्या पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दारात जायचं ठरवलं मी.आणि विठ्ठलाचा माझा स्नेह तसा जुना बरं का ? अगदी बालपणी ऐकलेल्या टाळ - मृदंगाच्या गजरात मी बेभान होवुन जायचो. त्या दिवसापासुनचा. तरीपण मी थेट पांडुरंगाकडे गेलो नाही तर त्याचा आवडता शिष्य नामदेवाकडं माझं गार्हाण मांडलं.. मला विश्वास आहे. तो ऐकणारचं. बरं फोन ठेवतो आता पुढंही निघायचयं तु ही काळजी घे. " त्यांनी फोन ठेवला. मी अवाक झालो. म्हणलं यार या माणसाचं काही कळतच नाही. पण खुप वेगळं रसायन आहे हे. आणि त्या दिवसाच हे बोलणं मी विसरूनही गेलो होतो.
मात्र ही गोष्ट माझ्या सुप्तमनात कोरली गेली होती( Subconscious Mind ) दरम्यान दिवस निघुन गेले. मार्च -एप्रिल- मे उजाडला . आता संपतही आला. मी रिसेन्टली शरजींची पोस्ट पाहिली. ते तीन दिवस होम मेडिटेशन करणार होते. आणि मला आज अचानक आठवलं. शरदजींनी #पाडुरंगाला साकडं घालत होतं. त्यानंतर कोरोनामुळ लॉकडाउन करावं लागलं आणि खरच फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील कारखाने बंद झाले आहेत. जालंधरहुन हिमालय दिसु लागलाय इतकं प्रदुषण कमी झालंय. शरदजींना भेडसावणार्या , काळकुट्ट कार्बनडायऑक्साईड आकाशात नेवुन ओतणार्या दुष्ट कारखानी चिमण्या आज 3 महिने झालं थंडावल्यात . हा चमत्कार नाही का ? आपण तर्कनिष्ठ माणंस चमत्कार वगैरे मानत नसलो तर मग शरदजींनी पाडुंरंगाला घातलेलं साकडं, आषाढी एकादशीला पंढरीनगरीत आत्मक्लेश करणार असल्याचा दिलेला इशारा आणि त्यानंतर कुणाच्या बापच्यानं शक्य नव्हता असा भुतो -न- भविष्यती झालेला बदल.याकडे कसे पाहणार ?? कदाचित नामदेवानं शरदच म्हणलं ऐकल आणि पांडुरंगाच्या कानी घातलं. पांडुरंगाने ते ऐकलं आणि सगळे कारखाने बंद पाडले. असं तर झालं नसेल ?? ते काय झालं असेल त्याचा निर्णय तुम्ही करा. मी तर अभिव्यक्त झालोय.बाकी शरदजी " आता तुम्हांला #आत्मक्लेश करण्याची काही गरज नाही बरं.. " बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
टिप -: खाली शरद झरेंच्या 4 मार्च रोजीच्या फेसबुक पोस्टची लिंक देतोय. ती ही नक्की वाचा. )
- विक्रांत शंके
https://www.facebook.com/100029348252468/posts/269088927412714/?app=fbl

शरदजी यांना मनापासून धन्यवाद.निश्चितच त्यांचे गहराने संत नामदेवांनी
ReplyDeleteपांडुरंगापर्यंत पोहचवले असावे. आणि हा बदल घडून आला असेल.
अंदाज बांधायला काही हरकत नाही.
Delete