तरुणांनो आपण कोडगे झालो आहोत का?,

*माझी अभिव्यक्ति*
तरुणांमधील सामाजिक बांधिलकी कमी होत आहे,अशी प्रतिक्रिया काही जेष्ठांकडुन ऐकण्यास मिळाली... त्याबद्दल

आज अंनिसच्या कार्यक्रमानंतर चहा घेत असताना काही वृधांकडुन वरील प्रकारची प्रतिक्रिया मला ऐकण्यास मिळाली . तेव्हा याचे कारण विषद करीत असताना काही बाबी मी तिथे मांडल्या कारण त्यांची ही खंत रास्त होती. त्याचाच उहापोह प्रस्तुत लेखात करतोय. तर तरूणांना सामाजिक भान खरच राहिलेल नाही. कारण आपण कोडगे झालो आहोत. हो हे मान्य करायला हव आपण. यात मी तरूणावर टीका करीत नाहीये पण आपण असंवेदनशील झालो आहोत हे नक्की. पण यात आपली चुक नाही. आपल्यावर हा *भांडवली मुल्यांचा* प्रभाव आहे. तो कसा तर , आपण समाजाच काही देण लागतो ही भावनाच आपल्या मनात आपल्या आजुबाजुच्या वातावरणाने तयार होवु दिली नाही. कारण ही व्यवस्था तसच सांगते .उदा. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचय , तर फक्त तुमच्या self development  चा विचार करा. अशा स्वरूपाचे विचार जाणीवपुर्वक प्रसवले जातात . आपणास आपल्या सुखी भविष्याची स्वप्ने दाखवुन आपल्या विचारांच्या कक्षा मर्यादित केल्या जातात. आणि आता तर नवीन मॉडेल चा खुप मोठा ट्रेंड आलाय. मॉडेल ट्रेंड म्हणजे काय तर ही व्यवस्था तुमच्यासमोर अपवादात्मक व्यक्ती या मॉडेल उभ्या करते. त्याच्या यशाच्या गाथा गाउन तुमने कान बहिरे करते. सचिन तेंडुलकर महान क्रिकेटर त्यान फक्त त्याच यश पाहिल.. 🤩 *मॉडेल* अन्सार शेख, 21 व्या वर्षी.  IAS , अपार कष्ट. *मॉडेल* यांचा आदर्श घ्या. वगैरे  आता यांनी यश मिळविल हे मी नाकारत नाही, त्यामागे त्यांच कष्ट होते हे ही मी मान्य करतो. पण आपल्या देशात या बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्यासारख्या विभुती झाल्या आहेत.. मात्र त्यांच उदात्तीकरण कुठेच होताना दिसत नाही कारण ही सामाजिक मानवी मुल्यांची प्रतिक आहेत . ही जगासाठी जगणारी लोक आहेत. पण भांडवली व्यवस्थेला *स्व* साठी जगणारी माणस हवी आहेत.  समाजातल क्रिम घ्यायच, हुशार लोक घ्यायचे आणि त्यांची *फक्त त्यांचीच* अगदी राजेशाही व्यवस्था करून त्यांना आपल्या कामाला जुंपायच.त्यांच प्रत्येक बाजुन उद्दात्तीकरण करायच आणिअहोरात्र जन सामान्यांच शोषण करीत राहायच ही यांची खेळी आहे. अरे बाबा, तुला काय करायचय, हे उद्गार म्हणचे यांचा जणु आत्माच आहे .म्हणजे चुकीच्या बाबतीत आपण आवाज, उठवला, एखाद्याच्या बाजुने धावुन गेलो तर लगेच आपला मित्र किंवा मैत्रिण म्हणणार *तुला काय करायचय ?*  किंवा हे असच असत वगैरे. ही मानसिकता टिकवुन ठेवण्यास आपणही बरेचसे जबाबदार आहोत. पण आपण स्वतःचा विचार न करता कधीच दुबळ्यांची बाजु घेत नाही.  आता हे दुबळे लोक दुबळेच का राहतात याबद्दलचाही एक युक्तीवाद यांच्याकडे नेहमी त़यार असतो.. ते दुबळे आहेत. का तर ते आळशी आहेत कारण आजच्या जगात कष्ट केल्यावर सर्व साध्य होत. मजुराच्या मुलाला जर तुम्ही  iAS च्या मुलाच्या जोडीने परिक्षेला बसवलत तर जाहिर आहे. कलेक्टरचच पोरग बाजी मारेल. इथे समान स्पर्धा नाही. त्याच ऐवची कलेक्टतच्या पोराला मजुराच्या पोराबरोबर उन्हात कामाला पाठवा ते उन्हाळ लागुन मरल. तेव्हा एकीकडे आपल्याला स्व : केंद्रित होण्यास शिकविल जात, आपल्या समोर मॉडेल उभी केली जातात. आपल्या डोळ्यांना करियरची झापड लावली जातात.  अश्याने आपण कोडगे बनतो की नाही  ?याचा विचार करा
                                          विक्रांत शंके

Comments