वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने

"दिसामाजी काहितरी लिहावे ,"
"प्रसंगी अखंडची ,वाचीत जावे "
                   - समर्थ रामदास

15 आक्टो. मिसाइल मैन म्हणुन जगभर ओळखल्या जाणार्या एका महान कार्यकर्तृत्वाची जयंती ( डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम) यानिमित्ताने देशभर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा केला जातो. खर तर प्रेरणा घेवुन वाचन करणे किंवा वाचनासाठी प्रेरणा ही मला औपचारिकता वाटते. कारण ज्ञान मिळविण्याच प्रभावी साधन म्हणजे वाचन होय. वाचनातुन प्रेरणा मिळत असते. वाचनाच महत्व सांगु जाता वाचनाचे कितीतरी फायदे आहेत , याबद्दल तुम्ही मुक्त विद्यापीठाची पुस्तक रेफर करू शकता. यातील वाचन कौशल्ये या भागात तुम्हांला याचे फायदे वाचायला मिळतील. पण वाचनातुन प्रेरणा घेण्याची गरज असता, वाचनासाठी प्रेरणा दिन साजरा करावा लागतो. ही नक्कीच सौहार्दाची बाब नाही. कलामांचा सन्मान म्हणुन आपण साजरा करतोय, ही त्यातल्या त्यात जमेची बाजु. पण वाचन दिवस आहेच तर आता वाचन संस्कृतिशी निगडीत महत्वाच्या बाबींचा उहापोह मला करावासा वाटतोय. सध्या वाचनाबद्दल समाजात अनास्था निर्माण झाली आहे. अस म्हटल जात. मलाही ते खर वाटायच पण तस नाही , खर तर हा मुद्दा बराचसा धुसरतेवर आधारित आहे. पण विशेषतः तरूण मुलं मुली वाचतात, हे वास्तव आहे. पण त्यांना दर्जेदार साहित्य लवकर उपलब्ध होत नाही. मी ही याचा बळी आहे. कारण विक्रेते आणि प्रकाशक तीच पुस्तक ठेवतात ज्यातुन त्याना नफा मिळतो. अस्सल साहित्यिक मुल्य असणार्या अभिजात कलाकृती बाजारात सहजी उपलब्ध होत नाहीत. दुसरा मुद्दा वाचनालयांचा, आपल्या आजुबाजुला काही अपवाद वगळता वाचनालये ही चांगली नसतात. तसेच वाचनाची गोडी लागण्यासाठी त्याचे संस्कार बालवयातच व्हायला पाहिजेत. लहान मुलाना गोष्टीची पुस्तक, चित्रमय पुस्तक वाचायला द्यायला हवीत. आपले पालक हे करीत नाहीत. वाचनाची प्रकिया ही आनंददायी असायला हवी तरच वाचताना कंटाळा येणार नाही. तसेच व्यक्तिच्या वयानुसार वाचनाचे विषय बदलत राहतात, जस की लहान मुलाना गोष्टींची पुस्तक आवडतात, किशोरवयात कथावजा ललित, तर कुमारवयात प्रेमाशी निगडीत कादंबर्या , रहस्यमय कादंबर्या , काहीजण क्लिष्ट विषयाशी सबंधित वाचनही कुमारवयात करतात, मध्यमवयात किंवा गृहस्थाश्रमात वाचन फारस होत नाही, पण वाचण्याची इच्छा असते. उतारवयात धार्मिक ग्रंथात रस वाटायला लागतो, पोथी पुराण हल्ली बरीच वृद्ध मंडळी वैचारिक वाचायला लागलीत. एकुण काय तर  ज्या त्या वयानुसार वाचन प्रेरणा व वाचनाच्या गरजा भिन्न असतात. तेव्हा आपल्यासारख्या पुस्तक प्रेमीनी साहित्याची आवड असणारे साहित्यप्रेमी, शिक्शणतद्न , सरकार, सामाजिक संस्था आदीनी मिळुन या सबंधाने नियाेजनबद्ध उपक्रम राबवायला हवेत. कारण वाचाल तर वाचाल म्हणलयच ना. जाता जाता गुलजारची पुस्तकांबद्दलची कविता

किताबें


गुलज़ार

किताबें झाँकती हैं बंद अलमारी के शीशों से


बड़ी हसरत से तकती हैं

महीनों अब मुलाक़ातें नहीं होतीं

जो शामें उन की सोहबत में कटा करती थीं, अब अक्सर

गुज़र जाती हैं कम्पयूटर के पर्दों पर

बड़ी बेचैन रहती हैं किताबें

उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है

बड़ी हसरत से तकती हैं

जो क़द्रें वो सुनाती थीं

कि जिन के सेल कभी मरते नहीं थे

वो क़द्रें अब नज़र आती नहीं घर में

जो रिश्ते वो सुनाती थीं

वो सारे उधड़े उधड़े हैं

कोई सफ़्हा पलटता हूँ तो इक सिसकी निकलती है

कई लफ़्ज़ों के मअ'नी गिर पड़े हैं

बिना पत्तों के सूखे तुंड लगते हैं वो सब अल्फ़ाज़

जिन पर अब कोई मअ'नी नहीं उगते

बहुत सी इस्तेलाहें हैं

जो मिट्टी के सकोरों की तरह बिखरी पड़ी हैं

गिलासों ने उन्हें मतरूक कर डाला

ज़बाँ पर ज़ाइक़ा आता था जो सफ़्हे पलटने का

अब उँगली क्लिक करने से बस इक

झपकी गुज़रती है

बहुत कुछ तह-ब-तह खुलता चला जाता है पर्दे पर

किताबों से जो ज़ाती राब्ता था कट गया है

कभी सीने पे रख के लेट जाते थे

कभी गोदी में लेते थे

कभी घुटनों को अपने रेहल की सूरत बना कर

नीम सज्दे में पढ़ा करते थे छूते थे जबीं से

वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी

मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और

महके हुए रुकए

किताबें माँगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे

उन का क्या होगा

वो शायद अब नहीं होंगे!

                  Written by #Vikrant Shanke


Comments

  1. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या, अभिप्राय कळवा

    ReplyDelete

Post a Comment