इहवादाचा (Materialisam) सारं माझ्या चष्म्यातुन

मित्रांनो, इहवाद तुम्हा सर्वाना माहितच आहे. इहवाद म्हणजे भौतिकवाद, जे आहे तेच खरे हे स्वीकारण्यामागची प्रेरणा. आता इहवादी तत्वज्ञान भारतामध्ये चार्वाकानी मांडल. त्यांच दार्शनिक साहित्य याच चार्वाक दर्शन नावाने असणारी साहित्यसंपदा. यात मोठ्या प्रमाणात इहवाद मांडला आहे. त्यांतर इहवाद मांडणारे येतात बुद्ध. आता बुद्ध आधी की चार्वाक आधी या अंगाने मी जाणार नाही तर मला आधी कोण कळल ते सांगेन. प्रथम इहवादी तत्वज्ञान कस मानवतावादी आहे आणि आधिक निसर्गाच्या जवळ जाणार आहे ते सांगतो. या विचारांमध्ये सत्य हे केंद्रिभुत मानल गेल आहे. तुम्हांला जे वाटत, जाणवत feel होत. तेच सत्य. ज्याचा पुरावा सहजी उपलब्ध होतो. ते सत्य त्यावर विश्वास ठेवा. हाच इहवाद आहे. आपण दैनंदिन आयुष्यात याच अंगाने जगतो आपण बुद्धिप्रामाण्यवादी आहोत. यासाठी तत्वज्ञान का चाळा असा तुमचा प्रतिप्रश्न असु शकतो तर याच उत्तर मी अस देइन की, आजही आपण म्हणावे इतके बुद्धिवादी झालेलो नाहीयोत. मुळात चार्वाकाना आणि बुद्धाना हे तत्वज्ञान मांडण्याची गरज का पडली तर त्याना सामान्य जनतेची दिशाभुल करणार्या वैदिक तत्वज्ञानाला एक सक्षम पर्याय उभा करण गरजेच वाटत होत. कारण जगत मिथ्या: ब्रम्ह सत्यम म्हणजे जग काय आहे, तर मिथ्या आहे. खोटं आहे. आणि ब्रम्ह हेच सत्य आहे, या जन्मात कर्म करा पुढील जन्मी तुम्हांला मोक्ष मिळेल . तुम्ही या जन्मात जर दुखी असाल तर हे तुमच्या पुर्वजन्मीच्या पापाच संचित आहे. इ. स्वरूपाची विचारसरणी व मुल्यव्यवस्था काही या देशातल्या मुठभर लोकांनी आपल्या स्व : हितासाठी धर्माचा आधार घेवुन पेरली. तस पाहता जगभर अश्या हुशार आणि अप्पलपोट्या लोकांनी धर्माचा हवाला देत सामान्यांची दिशाभुल करत वेळप्रसंगी त्यांच्यावर दमन लादत आपल स्वहिताच राजकारण खेळल याचा इतिहास मोठा आहे. पुढच़्या वेळी जगाच्या संदर्भात नक्कीच लिहीन. तर भारताच्या अनुषंगाने पाहता इथल्या प्रस्थापित तत्वज्ञानानी माणुस हा कधीच केंद्रीभुत मानला नाही. त्याची दुःख, भावभावना याना कस्पटासमान वाटल्या. यानी महत्व दिले देवाला, धर्माला, देशाला.. पण देवाला तर माणसानेच जन्म दिला, आणि देश म्हणजे समुद्र, डोंगर माती नसुन विशिष्ट भुभागात राहणारी माणस असतात. हे याना कधी उमगल नाही. ते त्यांना उमगलही असेल मात्र स्वच्या हातामध्ये होणार सत्तेच संपत्तीच केंद्रीकरण त्याना हे करण्याची अनुम़ती देणार नव्हत. आता माझे बरेच मित्र म्हणतात, की तत्वज्ञानाचा, आदर्शवादाचा आपल्या वैयक्तिक जीवनात काहीएक फायदा नसतो. तेव्हा ही तुझी मुल्यव्यवस्था वगैरे गोष्टीपुस्तकातच बंद ठेव. Life खुप सिंपल आहे. पण तस नाही मित्रांनो,  हे लादलेल तत्वज्ञान, यातील मुल्यांचा तत्कालीन समाजावर झालेला परिणाम आणि त्याचा प्रभाव म्हणुन समाजाच्या आपल्या भोवताल जगाच्या बनलेल्या धारणा यांचा खुप निकटचा संबंध आहे. एक साध उदाहरण घेवु,  इश्वर हा खुप दयाळु सर्वांच भल पाहणारा कर्ताकरविता आहे. संकटकाळी त्याची फक्त आठवण करा. तुमच दुःख हरण होइल तुम्हंला काही करण्याची गरज नाही. या हजारो वर्षापासुन घट् बसलेल्या चुकीच्या धारणेतुन मानवी समाजाच तोनात नुकसान झालय अजुनही होत आहे. त्याचबरोबर साधकाने सुखोपभोग ताज्य मानावा. म्हणजे चांगल अन्न ग्रहण करू नये, इ. इ खुप काही. याच्या खोलात मी काही जात नाही. मात्र मला हे सांगायच आहे की, या जगात सर्वात महत्वाचा हा माणुस आहे. मग तो स्री असो वा पुरूष तेव्हा माणुस आणि त्याच सुख हेच केंद्रिभुत मानुन आपण चालल पाहिजे. मग पाश्चिमात्य राष्ट्रांत हेच चालु आहे की, या चंगळवादाने तुमची मनःशांती हरवते वगैरे , संस्कृति कोमेजते, कुटुंबसंस्था नष्ट होते म्हणुन मानवी दुःखाचा पुरस्कार करणारे लोक मात्र जेव्हा त्याच पाश्चिमात्यानी लावलेल्या वैज्ञानिक शोधांच्या जीवावर मेडिसीन खावुन केविलवाणी जगण्याची धडपड करतात तेव्हा मला त्यांची कीव..............  येत नाही. त्यांना जहाल विष द्याव वाटत. जाता जाता एवढच

ठेविले अनंते तैसेची/ रहावे,
रक्त शोषु द्यावे /शांतपणे ,
अधम सत्तेचे पाउल /चाटावे ,
चित्ती असु द्यावे /समाधान ,

संताच्यासारखे नाही /बोलवत
जीव /काहिलत संतापाने
भगवंतापरी ओकावी /गरळ
पाप -पुण्य-मुळ उखडावे ......
                      Written by - Vikrant Shanke

Comments

  1. खूप छान लेख आहे विक्रांत.आणि या पुढील ही वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या💐🌷💐🌷

    ReplyDelete
  2. खूप छान आहे विक्रांत दादा तू लिहिलेला लेख मला खूप आवडला 👌👌👌💐💐💐💐💐

    ReplyDelete
  3. खूप छान आहे

    ReplyDelete
  4. is a best article
    Your thinking is very good

    ReplyDelete

Post a Comment