The Mudwalk -अंधारातुन प्रकाशाकडे ( एकांकिका)
The Mudwalk- अंधारातुन प्रकाशाकडे ( एकांकिका)
बुध्द भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही. बुध्दाच्या मृत्यूनंतर (इसवीपूर्व ४८३) त्याच्या पार्थिव अवशेषांकरता पूर्व भारतीय तत्कालीन दासप्रथाक अराजक संघगण (Oligarchy) या सामंतप्रथाक राजसत्ता युध्द करण्यापर्यंत येऊन ठेपल्या होत्या, असे 'महापरिनिब्बान' सुत्त सांगते. "तेव्हापासून त्यांचे विचार व कार्य यांवर भारतात सुरू झालेला संघर्ष अजून संपलेला नाही. या बुद्धाचे तत्वज्ञान अनेक बाजुनी समजण्याचा समजावण्याचा प्रयत्न विवेकी मंडळी करत असते . बुद्ध आपल्यापर्यंत येतो कथातुन, बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातुन तसेच बुद्धाचे हे तत्वज्ञान The Mudwalk या नाटकातुनही मांडण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न केलाय. मी ते नाटक पाहिलं व आज बुद्धपोर्णिमेच्या निमित्ताने तुमच्याशी तो अनुभव शेअर करतोय. मी हे नाटक पाहिल त्याबद्दल मला काय वाटल हे लिहितोय. थोडक्यात माझ्या परीप्रेक्श्यातुन हे नाटक मी मांडतोय. आपण पाहत असतो आपल्या आजुबाजुला अनेक विषय घेवुन एकांकिका लिहील्या जातात. नाटक बसवली जातात. द मडवॉक ही एकांकिका आहे. बुद्ध समजुन घेण्याच्या धडपडीतल एक पुष्प. पाच हजार वर्षापुर्वी भारतीय समाजाची वैदिक, कर्मकांडप्रणीत धर्मापासुन सुटका करण्यासाठी आणि माणसाच्या दु:खाच मुळ शोधण्यासाठी बुद्ध बाहेर पडले. आणि त्यानी माणसाच्या मनाच तत्वज्ञान मांडल. बुद्ध हे अध्यात्मिक गुरू वगैरे नव्हते. बुद्ध होते अत्यंत पुढारलेले मानसशास्रद्न. त्यानी अध्यात्माचा अभ्यास केला, त्याबद्दल मांडल, तत्वज्ञानाबद्दल मांडल हे खरय पण याचं मुळ ते माणसाच्या मनातच सांगतात. Human Mind is everything. अस म्हणतात बुद्ध. आणि यावर भरपुर काही मांडलय. तुर्तास या एकांकिकेच्या संदर्भात बोलुयात. एकांकीकेची थीम अशी साकारलीय रघुनाथ, बबन आणि दुर्गा हे तिघे बुद्ध तत्वज्ञानावर Ph.D. करण्यासाठी निघालेले असतात. यांचा विषय असतो. " समुदायाच्या सर्जनशील आणि धार्मिक विकासात बुद्धांच्या मुल्यांचे अध्ययन, अविष्करण आणि श्वाश्वत रूजवणुक " मग ते तिघेजण कोणत्यातरी बेटावर जिथे बुद्धकालिन मुर्त्या वगैरे असतात. तिथे फिल्ड वर्कसाठी बोटीतन जात असतात. तिथुनच कथानक सुरू होत. पात्रांच्या संवादातुन बुद्ध उलगडण्याचा प्रयत्न लेखक करत असताना दिसुन येतो. चर्चेदरम्यान एकजण म्हणतो की, बुद्ध आज विमानात झोपलेल्या लोकाना भेटला असता तर लोकानी त्याला झोप येण्यासाठी वर्तमानपत्र, हेडफोन, इ आवश्यक असत असच सांगितल असत. तेव्हा दुर्गा म्हणते " हे सगळे झोपले पण #जाग होण्यासाठीची झोप फक्त बुद्धालाच लागली. आणि बुद्धानी विमानातुन प्रवास केलाच नसता कारण पावलांनी सीमा ओलांडल्या की अंतर राहत नाही हे त्याला सांगायच होत.. या इथुन अशा संवादानी नाटक तुम्हाला तुमच्या प्रेमात पाडत. अर्थपूर्ण अगदी विचार करण्यास भाग पाडणारे संवाद. काढता येतील तेवढे अर्थ. मग हे बेटावर पोचतात तेव्हा याना तिथला गाईड "मिसेस बेंजामिन फ्रैंकलिन भेटतो. नाव मुद्दाम परिचयाच वापरल कारण नाव ऐकताच प्रेक्षक त्याच्याकडे आकर्षित व्हावा. आणि संपुर्ण नाटकभर हे पात्र खिळुन राहच खिळवुन ठेवत. बेंजामिनला त्या वारसास्थळाच्या ऑथॉरिटीने या तरूण संशोधकांच्या मदतीसाठी पाठवलेल असत. मग हा तिघांना आपली ओळख करून देतो. प्रथम त्या तिघांच मत बेंजामिनबद्दल अगदी न्युट्रल असत. म्हणजे आपल काम भागवुन घेवु आणि जावु काय करायचय या टकल्याशी जवळीक साधुन. असा एटिट्युड. पण बेंजामिन अपिअरच होतो मुळात फ्रेंडली. ऑपेरा म्हणत, गात, मोठ्यानी बोलत हा याना गाईड करत असतो. तेव्हा याचे संवाद विचार करायला भाग पाडतात .बेंजामिन सांगतो, ही एक माणसाला लागलेली वाईट सवय म्हणजे एकातुन मुक्त होतो न होतो तोच, दुसर्यात अडकायला तयार. आणि तेव्हा तो त्या तिघाना म्हणतो मीच तुमचा गाईड. तिकडुन आश्चर्य, तु?? तेव्हा या रिएक्शनला धरून बेंजामिन खेचतो. हो "मी " असाच Igo दुखावला जातो, मी म्हणल्यावर, अरे, जीवापेक्षा

Igo मोठा नाही हे जीव निघुन गेल्यावर कळुन काय उपयोग?? ते पुढे जात राहतात. तेव्हा एकजणाची मोबाइलला रेंज नसल्याची तक्रार. बेंजामिन समजावतो," बर आहे, रेंज नाही ते, कसय ना ती रेंज गेल्याशिवाय बुद्ध रेंजमध्ये नाही येणार " म्हणजे असंख्य फालतु गोष्टीत व्यस्त असणार्या आणि मनःशांती मिळविण्यासाठी उगी बुद्ध समजुन घेत असल्याच दाखवणार्यासाठी ही सणसणीत चपराक आहे. पुढे जात राहतात तेव्हा अंघोळीचा प्रश्न निघतो तेव्हा बेंजामिनचा अजुन एक सल्ला, शरीरासाठीची अंघोळ तर आपण रोज करतो पण, मनातला घोळ घालण्यासाठीची अंघोळ ? ती आली पाहिजे. त्यानंतर बेंजामिन, जेव्हा माणसाच मन हेलावतं, काहीश्या घटनेने भरून येत, साचलेपण बाहेर येत, सलतं, दुखतं, खुपतं त्याबद्दल बोलतो. विचारतो .तो त्या तिघाना विचारतो "आतुन विसळल्या सारख झालय का कधी?? "नसेल तर राहु द्या. आपण जिथे जायचय तिथे जावुच पण पोहचणार कधीच नाही. म्हणजे तुमच्या मनात संवेदनशीलता नसेल, भावनांच अस्तित्व आणि पुढे जावुन त्यांच वर्गीकरण, समायोजन. हे जर होत नसेल तर प्रवास निरर्थक आहे. जेव्हा हे ऐकुन ते सदग्दीत होतात आणि, दुर्गा सांगते, "लहानपणी मला फुलपाखर जमवायचा नाद होता आणि ती फुलपाखर मी काडीपेटीत बंद करायची पण जेव्हा आमच घर बदलल आणि काही वर्षानी मला ती काडीपेटी सापडली, तेव्हा त्यात बंद असलेल्या त्या पाखरांची, जीवांची कलेवरं बघुन पोटात खड्डा पडला " रडते. तेव्हा बेंजामिन म्हणतो " स्वतःला जाब विचारता आला पाहिजे, This is a key to unlock. "
इथपर्यंत ठीकय. यातुन मानवी मनाची गिल्टची अवस्था यातुन बाहेर पडण यावर बुद्धानी भाष्य केलय ते सुचवण्याचा लेखकाचा प्रयत्न असेल.किंवा बुद्धानी सांगितलेल्या अत : दीप : भव : स्वयंप्रकाशित व्हा, तसेच स्वत:च्या मनाशी संवाद साधत स्व ला शोधा (Discover yourself) च्या व्याखेत हे येवु शकत. पण याआधी रघु आणि बबन जो त्यांचा दुर्देवी भुतकाळ( wrost past) आठवुन विलाप करतात ते बुद्ध तत्वज्ञानाच्या अगदी विरूद्ध आहे. यात लेखकाची गोची झालेली दिसते. कारण बुद्ध नेहमी सांगतात, Don't think about a past, live the now moment. नाटक पुढे सरकत राहत. आता त्यांच्या त्या लेण्या अगदी जवळ आलेल्या असतात. संशोधक उत्सुक असतात. पण त्या लेण्यापर्यंत पोचण्याआधी त्याना काही अंतरापर्यंतचा चिखल तुडवायचा असतो. ते चिखलातुन जायला कचरतात तेव्हा बेंजामिन त्या तिघांनाही गाळात ढकलतो आणि म्हणतो, " अरे चला, निरंतर या चिखलात चालत राहिल की, शरीराचा भाग झालेल्या त्या चिखलाच काही वाटेनास होत. हा आहे बुद्धाचा नथिंगनेस, काहीच न वाटण्याची अवस्था! " अगदी अप्रतिम अस विश्लेषण . ते लेण्यांच्या ठिकाणी पोचतात यांचे संवाद निरंतर चालु असतात.संशोधकाना माहीत देत असताना मध्येच बैटरी लावुन बेंजामिन म्हणतो, " पहा, त्या तिकडे काय दिसतय?? " " उत्तर येत " आकृत्या दिसताहेत, बसलेले, उठलेले चेहरे " तेव्हा बेंजामिन म्हणतो " हा आहे #समुहविलाप - आम्ही इथ आलो, पण रमलो मात्र नाही. दुसर दृश्य काय म्हणालात?? बुद्ध आणि बुद्धांच्या चर्चा, बुद्ध आणि बुद्धाची गळाभेट. बुद्धच बुद्धाला भेटतोय. This is the nothingness of Buddha.दरम्यान या मुर्तीवास्तवावर दुर्गा कळीचा प्रश्न विचारते. "बेंजामिन, मुर्त्यांना विरोध करणार्या बुद्धाच्या जगात एवढ्या मुर्त्या का रे ? " प्रश्न विचारून कस पकडल या अर्थाचे भाव तिच्या चेहर्यावर . बेंजामिन मनाशीच हसतो मग उत्तर " एवढे टाक्याचे घाव दुसर्या कोणाला सोसले असते का? " सभागृहात टाळ्यांचा कडकडाट. याचा अर्थ बुद्ध हा घाव सोसतो हा नाही, मुळात बुद्धाला सोसण हे मान्यच नाही, Suffering is not allowed in Buddha's path. टाक्याचे घाव सोसतो याचा अर्थ बुद्ध संवादाची स्पेस देतो. पुन्हा बेंजामिन काही मानवी व्यंगावर टीका करतो, माणसाची अजुन एक वाईट सवय माहीत असलेल्या सत्यावर स्वताःच्या नावाचा शिक्कामोर्तब करायची घाई माणसाला असल्याच सुचवतो. मग बुद्धाकडे बोट करून म्हणतो हा बुद्ध. याने खुप वर्ष घेतली माणस वाचायला. आणि आता माणस त्याला वाचतात. तेव्हा तुुम्ही याला पटापटा वाचुन संपवु नका रे.. कादंबरीसारख रेंगाळत ठेवा बुद्ध हा विषय.
बोलत बोलत प्रेमाचा विषय निघतो, दुर्गा विचारते " बुद्ध कधी कुण्या स्रीच्या प्रेमात पडला होता का रे? " तेव्हा बेंजामिन सांगतो " प्रेमात पडतो तो आपण, बुद्ध प्रेमात प्रेमासाठी उभा राहतो, - म्हणजे एखादा बाप आपल्या मुलीच्या प्रेमात असतो तसा बुद्धसुद्धा असेल कितीतरी युगांपासुन प्रेमात. ( मानवतेच्या) . मग प्रेम आणि स्रीला जोडुन अजुन एक प्रश्न येतो, " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्री असते, तशीच बुद्धाच्याही मागे कुणी असेलच ना?? " तेव्हा बेंजामिन अगदी सहजतेने उच्चारतो " मुळात बुद्धाला यशस्वी व्हायचय नव्हत ना, यशस्वी होण्यासाठी कुणालातरी हरवण आल, बुद्धाला ते नको होत. " म्हणजे जिंकण तेही प्रेमाने, प्रद्नेने जस बुद्धाने अंगुलीमालाला जिंकल. मग बेंजामिनलाच प्रश्न विचारला जातो? तु कोण आहेस?? तेव्हा तो म्हणतो I Am a bloody mud walker. बेंजामिन अखंड बोलत जातो, आकाराचा आग्रह सोडावा लागतो, निराकाराच आगमन होण्यासाठी.हिंदुकुश पर्वतरांगांमधुन सन 2001 साली बुद्ध मुर्त्या हटविण्यासाठी अफगाण्यांनी जो संहार घडवुन आणला त्याचा संदर्भ येतो तेव्हा, बेंजामिन काहीसा शोकाकुल होतो आणि म्हणतो, " संहाराची गरज काय होती रे?? बुद्धाला संपवण्यासाठी. अस घट्ट छातीशी कवटाळल असत ना तरी विरघळला असता रे तो . पण हे समजण्यासाठी आतला माणुस जागा व्हावा लागतो. तो जागा होतो ना तेव्हा त्याचा हात, आपोआप बुद्ध मुद्रेत येतो. संशोधकांच्या चर्चेत धम्म आणि धर्मावरही भाष्य होत. यात बुद्ध धम्म हा धर्म नाही तर ते तत्वज्ञान आहे. हे सांगण्याचा प्रयत्न लेखकानी यात केलाय. शेवटी चर्चेतुनच हे माणुस म्हणुन जगा या निष्कर्षाप्रत येतात. येतात. बेंजामिनची हे ऐकुन आत येतो, म्हणतो, हो! माणुस म्हणुन जगा, एकदा का जगवायला शिकल की जगणं आपोआप शिकतो माणुस , पण सध्या तो जगण्यातच मस्त आहे. देहधर्माइतका कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही. हे बुद्धाला कळाल. जगात नर आणि मादी या दोनच जाती. आणि श्वाश्वत व्हायला हवा तो मानवताधर्म. पुढे बेंजामिन सांगतो Remember you are born to live ,but don't live because you are already born. या ठिकाणी तर बेंजामिन प्रेक्षकाना flat करून जातो. तुम्ही जगण्यासाठी जन्मता पण आता जगु नका कारण तुम्ही जन्म घेतलाय. आता जगवा. लोकाना जगवा .हा अर्थ. बुद्ध मुर्त्यांमध्ये नाही तो डोक्यात असतो आणि तो तो मनात उतरला की, बुद्ध जगतोय की मी जगतोय हा प्रश्नच उरत नाही. यात बोलत बोलत बेंजामिन बुद्धाची world is dianamic ची संकल्पना पण सांगतो. आपण एकाच बाटलीतील पाणी पितो पण दर क्षणागणिक आपल्या घशात जाणारा थेंब नवा, श्वाश्वात भरली जाणारी हवा नवी. शेवटी बेंजामिन सांगतो " मी जे सांगितल ते follow करायच की नाही हे तुमच तुम्ही ठरवा. बुद्धाच प्रतिनिधित्व करतो तो. आपण सिद्धार्थ गौतम बुद्ध नाही होवु शकत पण स्वत:चा अर्थ समजुन घेणारा सिद्धार्थ तरी होवु शकतो न. ( Discover yourselves) दिवस मावळतीकडे झुकलेला असतो. बेंजामिनकडे पाहण्याची तीनही संशोधकांची दृष्टी आमुलाग्र बदललेली. परकेपणा जावुन, त्याठिकाणी आपलेपणा आलेला. पण काय कराव ? सोबत संपलेली असते. आपल्या बाबतीतही बरेचदा असच होत ना आपण माणस ओळखायला चुकतो, माणसाजवळ जातानाच हे परकेपण पांघरून जातो. या दरम्यान त्या बुरख्यामुळे आपलच माणुस ओळखु येइनास होत. जेव्हा ओळख पटते तेव्हा वेळ निघुन गेलेली असते . मग आधीच प्रत्येक माणसासमोर जाताना आपण प्रेमाच, करूणेच आपलेपण घेवुन गेलो असतो तर?? बाकी अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य उत्तम आहे यु ट्युबवर The Mudwalk अस सर्च करून ही एकांकिका तुम्ही जरूर पहा. याची लिंकही खाली देतोय .
The Mudwalk (एकांकिका)
नेपथ्य -: सुयोग भोसले
प्रकाशयोजना -: राजेश शिंदे
पार्श्वसंगीत -: राहुल मोरे
लेखन -: श्रीपाद देशपांडे
दिग्दर्शन -: सुनील हरिश्चंद्र
© Vikrant Shanke

https://youtu.be/ySQSOd-ZOQI

Please post your comments here.
ReplyDeletePlease post your comments here.
ReplyDeleteUtaam Naktaca Pariksan Kelat Vikrant Ji.. .Tumca Natkaca Abhipray Chan Aahe... Bakki Ya Natkat Buddha Ani Budhanci VicyarSarni Khup Bharavun Takte... Natkaca Yogya Abyas Tyat Khree Budha Aplyasamor Thevnaca Prytna Lekhkani kelela Aahec... Amcya Sarkhya Nav khya Kalakarana Ase Naktka Pahna Ani Charector Ksa asla Pahije Ani Chrector Patknyasati Keleli Mehanat Tyat Disun Yete.. Amha Kalakarana Ya Naktatun Khup Molyavan Margdarshan Betate .. Nakache Naypathye... Light. .sangeet... Lekhan... Direction ... Kamal.... Hats Off.. Ani Ho Tumca Abhipray Ekdam Mast... Tumcya Abhiprayatun Natak Sahaj Smjty. .. Ani Mla Watat Ya Natkabaddl Bolayaci Tayari kinva tevdhi poch mazi nahi zali.. Karan He Ekankika Khup study Karun Ani Khup MehaNativr Banleli Aahe.. Pn Tri todkya modkya shabddat.. Hoil Tevdha Mat Mandalay. ..
DeleteMast
ReplyDelete