ह्रदयाच्या गाभार्यातुन

आठवणींचा त्रास कधी व्हायला लागतो? आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर हे सांगण कठीण आहे .कदाचित माणसाच्या जाणीवा प्रगल्भ झाल्याच्या दुसर्या दिवसापासुन लगेच. माणसाच मन इतक विचित्र बनलय की कधी त्याचा अर्थच लागु नये इतक गुंतागुंतीच .नात्यामध्ये तर त्याच स्वरूप अजुन जटील होत जात.खर तर माणुस हा सामाजिक प्राणी आहे अस म्हणतात .( Social Animal) तो तसा नसायला हवा होता .
माझ्या मनाची ही गुंतागुंत शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय .कदाचित तो खुपच गुंतागुंतीचा झालाय ......  

तुझ्या आठवणींचे पाश आवळले जात आहेत माझ्या नरड्याभोवती घट्ट.
तुझ्या मिलनाच्या कल्पनेने मी मोहरून जातो तरीही.
का लागावी ती हुरहूर अस्वस्थ करणारी ते मलाही सांगता येत नाही
तुझी ही तीव्र ओढ ,तनामनात खोल रूतलेली
मलाच उभी करते गिल्टच्या पिंजर्यात
सेल्फ रिस्पेक्टचा बहाना देत
मग तुझा चेहरा पाहुन अजुन अस्वस्थ होतो मी
माझ्या मनाची ही कुतरओढ,आणि तुझी कातडीबचाव वृत्ती
तरीही तु कुठुनशी अचानक येवुन पाठीशी माझ्या घट्ट बिलगशील म्हणुन उभा आहे समुद्रकिनारी
सागराकडे तोंड करून , आता तुझ बिलगणच थांबवु शकणार आहे मला पुढे जाण्यापासुन
                        - विक्रांत

Comments