आजोबांच्या गोष्टी
एका उंदराची गोष्ट
एका नगरात एक उंदीर रहात होता .मित्रांनो हा तेव्हाचा काळ आहे .जेव्हा प्राण्यांनाही माणसाची भाषा यायची बरं का ? तर हा आपला उंदीरमामा एकदा त्याच्या आईकड गेला .आणि म्हणाला " आई ,आई माझ लग्न कर ", तेव्हा आई म्हणाली "बाळ ,लग्नासाठी पैसे लागतात खुप सारे तेव्हा आधी तु पैसे आण ,मग आपण तुझ लग्न करू." आता गुडघ्याला बाशिंग बांधलेले आपले उंदीरमामा निघाले पैसे शोधायला. शेताच्या कडेकडेनी म्हणजेच कुपाटी कुपाटीने जात असताना ,त्यांच्या शेपटीत काटा मोडला .अाई ग ! उंदीरमामा कळवळले .आता वेदना होत होत्या .मग शेपटीतला काटा काढण्यासाठी उंदीरमामा गेले जवळच्या नाव्ह्याकडे ." न्हावीदादा न्हावीदादा माझा काटा काढ गा !" तेव्हा न्हावीदादा म्हणाले, "नको रे बाबा तुझ्या शेपटीतला काटा काढताना ,तुझ शेपुट तुटल तर माझा वस्तारा घेशील " तेव्हा उंदीरमामाने शपथ घेतली " आल्लोबाच्यान,कोल्लोबाच्यान-खाप्परकुट्टी लिंगोबाच्यान, तुझा वस्तारा मी नाही मागणार." तेव्हा न्हावी दादाने काटा काढण्यासाठी उंदीरमामाच्या शेपटीला वस्तरा लावला.वस्तरा धारदार होता. मामांच शेपुट तुटलं.उंदीरमामा रागवले. म्हणाले " नाव्हीदादा , आता तुझा वस्तारा तरी दे नाहीतर माझ शेपुट तरी दे " नाव्हीदादाजवळ पर्याय नव्हता .तेव्हा उंदीरमामाला त्या जुना वस्तरा शोधुन दिला .तो गंजलेला वस्तरा पाहुन उंदीरमामाच पित्त खवळल ते म्हणाले "वाह रे वाह! आपण खातो चांगा-चुंगा,मला देतो लांगा लुंगा,सरकार को दो दंडे लगाऊंगा ." तेव्हा घाबरून न्हावीदादाने उंदीरमामाना चांगला वस्तरा दिला .
उंदीरमामा तो वस्तरा घेवुन निसटले आणि पुढे निघाले पैशाच्या शोधात....क्रमश......


Comments
Post a Comment