तीन शब्द
तुझ्यासोबतच ती उत्कटता अनुभवलेली
प्रेमाची ,असुसेची ,उबदारपणाची
तुझ्यासोबतच ती उत्कटता अनुभवलेली
नव्या ओळखीची ,
आपल्या दृढ होइल अस वाटणार्या नात्याची ,
अनामिक ओढीची ,
तुझ्यासोबतच ती उत्कटता अनुभवलेली
हळुवार क्षणांची ,
क्षणभरात असंख्य युगे देणार्या आठवणींची,
चिरस्मृतींची ,
आता पुन्हा तुझ्यासोबत तीच उत्कटता अनुभवतोय
विरहाची.
कुणीतरी माझ हरवल्याची ,
मुल्य कोसळल्याची.
तुझ्या सोबत ती उत्कटता अनुभवतोय
आभासी प्रतिमांसोबत जगण्याची ,
सुंदरतेच्या चिंतनात जे सुख असत ते प्राप्तीत नाही या वाक्याची
तू नसतानाही सोबत असल्याची
- VikRant


कृपया अभिप्राय द्या. सुचना कळवा
ReplyDelete