पोर्ट्रेट

अशी ही शतकांची नश्वरता
अन उगाचच मनाला रितेपणा आणणारी एकाकी
तुझ्या चिंतनात असे किती क्षण वागवलेले
पण तु कधीच वक्तबद्ध झाली नाही
जेव्हा जेव्हा माझ्या शब्दाना बोथटपणा आला 
तेव्हा तुच दिलीस त्याना धार
पण तुझ्यामुळेच कधी कधी माझ्या विचाराना ग्लानी आलेली !
कसा हा विचित्र विरोधाभास ?
आता नेहमीच टिकुन राहतेय ही
सगळच भोगुन न भोगल्याची स्थिती
मनात नुसता भावनांचा कल्लोळ ,अन सुन्न डोक्याची बधीरता .
तरीही तुझ एक पोर्ट्रेट सतत स्वप्नात येणार 
दूर वाळवंटात मावळत्या सुर्याच्या संधीप्रकाशात ,
एकामागे एक चालणार्या उंटाची तुटलेली रांग
त्यांच्याबरोबर चालणारी बंजारनच तु मला दिसतेस
आपल्या प्रियकराच्या शोधात स्व: च्या अस्तित्वाला नवा अर्थ द्यायला निघालेली 
                               -VikRant

Comments