ती भाग 2
*ती* भाग 2
टपरीवर घेतलेल्या चहानंतर ही दुसरी वा तिसरी भेट
पांढरा शर्ट , साधी पैंट, गळ्यात गमजा,
विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कसल्याश्या सेमिनारला दोघांचीही हजेरी
ती मात्र मस्त पांढर्या रंगाचा सलवार घालुन आलेली
सेमिनार संपल्यावर सभागृहाच्या झाडाखाली उभ्या उभ्या चर्चा. दोन तास
कुण्याच ललनेबद्दल काहीच न वाटणारा मी,
आज तिच्याकडं झुकत असलेला,
मी : पांढरा रंग शोभतो ग तुझ्यावर
ती : (लाजुन ) हो का ? अपेक्षित प्रतिक्रिया मिळाल्याचे भाव
मी : कोण येणार आहे घ्यायला ?
ती : भावाला फोन केलाय
मी : त्याने पाहिलं तर
ती : I Dont Care .
परत मोर्च्यातला बोल्ड अंदाज . पितृसत्ताक वर्चस्वाचा भीक न घालणारी ती अजुनच माझ्या मनात रूतत जाते .
तिला निरोप देवुन घरी येतो,
स्वतःच्याच धुंदीत 3 -4 सिगार मारतो,
शुभ्र धुम्रवलयात तिची प्रतिमा साकारतो,
अैनाच्या प्रेमात मार्क्स झाल्याचा फील घेतो .
मला आठवत नाही , ती माझ्या आठवणी कितपत साठवते ?
ती माझ्या आयुष्यात कशी आली ? हे आजही मला आठवते


Comments
Post a Comment