ती भाग 3

 ती भाग 3 
एव्हाना ओळख चांगलीच झालेली,
तु आणि मी एकच की ! इथवरचा टप्पा गाठलेला 
आता तिची भेट म्हटलं की मनात हुरहुर दाटुन यायची.
सभा, बैठकांमुळे उशीर झाली की, वेळेत न आल्याने तिचा लटक्या रागाने लाल झालेला चेहरा .
प्रेमळ रूसवा आणि माझी मनधरणी.
ती : का एवढा उशीर झाला ? हे नेहमीचचं असतं तुझं 
मी : अग बैठकीत होतो उशीर झाला
ती : माझ्याबद्दल काही वाटतं की नाही तुला ? नेहमी सभा,  बैठका , मोर्चे. एखाद्या बैठकीशीश का लग्न नाहीस करून घेत ?
दोघंही या विनोदावर खळखळुन हसतो. हसता हसता मला तिच्या डोळ्यातील अभिमान दिसतो. माझ्या प्रत्येक  भाषणानंतर  दाटुन येणारा.
माझ्यातला स्व : मनोमन सुखावतो. मी प्रेमानी तिचा हात हाती घेतो. जरासा  दाबतो.चार पावलं चालतो. 
ती थोडंस रेंगाळते, पाठीवरची बैग पुढ्यात घेते, गालात हसते.
डोळे बंद करण्याचा आग्रह आणि पुढ्यात महागड्या किमतीचं पेन . मला आवडतो म्हणुन. 
मी अचंबित होतो. न राहवुन तिचं चुंबन घेतो. तिला ते आवडत नाही. मी तिचा निरोप घेतो.
ती माझ्या आयुष्यात कशी आली ? हे आजही मला आठवते.

Comments