ती भाग 4
ती भाग 4
प्रेमाच्या आणाभाका घेवुन एक दीड वर्ष झालेल.
आमच्या प्रेमाचीच चर्चा सगळ्याच्या तोंडी.
कुठुन सल्ले तर कुठुन कौतुक,
काही जीवलगांना तर दोघांते चार हात झालेले पाहण्याची घाई .
पण लग्नाचा विषय काढला की , तिचा झरझर उतरणारा चेहरा.
मी चारित्र्यावर घेतलेला संशय, तिचे पुराव्यादाखल वागणे.
नात्यातला वाढत जाणारा ताणं आणि विरत जाणारा संवाद
मी : तु हल्ली मोकळेपणानी बोलत का नाहीस ?
ती : हो का ( उपहासाने हसत , चेहर्यावर तुच्छपणाचे भाव)
त्या रात्री प्रचंड वेदना होतात. तिला मैसेजही करत नाही अन् विचाराच्या भोवर्यात सापडतो. चिंतनात पडतो, अस्वस्थतेत धडपडतो.सकाळी उठुन फ्रेश चेहर्यानी तयार.
हं आज काय ?
कार्यकारिणीची बैठक
बर चला .
बैठकीत मन लागत नाही.
घरी येतो . फोन करतो. नंतर बोलते .हे उत्तर.
तापल्या तव्यावर काळीच ठेवल्यासारखा चर्र चिरत जाणारा आवाज कानात घुमतो. रोमारोमात पोकळपणा भिनतो. टॉईफॉइडच्या तापासारखा.
दिवस उलटतात.विसंवाद वाढत जातो.
एके दिवशी सभागृहाच्या दिशेनी ताड-ताड पावलं वाजतात.
मी दारशी उभा . ती येते.
पत्रांचा ढीग तोंडावर मारून , बरच काही सुनावते.
ती माझ्या आयुष्यातुन निघुन गेली हे तीन दिवसानी जाणवते


Comments
Post a Comment