ती भाग 5
ती भाग 5
माझं प्रेमप्रकरण संपुन दिवस उलटुन गेलेले
त्या दिवशीचे पत्रांचे कागद उराशी बांधुन जड पावलानी घर गाठलेलं
मध्यंतरी ती चे चाळे सुरू राहिलेले
कधी ह्याच्यासोबत , कधी त्याच्यासोबत.
मी मात्र कोरा, चुकुन माकुन आलेला प्रेमाचा प्रस्ताव नम्रपणे नाकारणारा.
आज मात्र स्वतःला आरशात पाहण्याची लगबग
थोडासा स्थूल, डोक्यावर नुकतेच करडे केस, दाढीला शोभणारा कट दिलेला.
त्या घटनेला तप उलटुन गेलेलं.
बायको काहीतरी मोठ्यानी बडबडत, जाकीट घेवुन आलेली.
ती : काय हो ? खाली कार्यकर्ते थांबलेत . पोलिस व्हैनही आलीय.
मी : येवु देत गं ! जरा बस सांग कसा वाटतोय ?
ती: ( लाजुन) हे काय अचानक ? भारी दिसताय पण आजं जवळ ओढुन तिच्या गालांवर ओठ टेकवत.
मी : अचानकच असतं माझं
वरच्या खोलीतुन खाली जीना उतरत हॉलमध्ये नजर टाकतो.
हारातुरांचे गुच्छ आणि कार्यकर्यांचा उत्साह.
एकुणच मी कुठल्याश्या खात्याचा कैबिनेट दर्जाचा मंत्री झाल्याची जाणीव करून देणारं वातावरण.
जायची तयारी झालेली . एवढ्यात PA चं थांबत येणं.हातात चिठ्ठी देणं .चिठ्ठीवर नाव ओळखीचं अगदी काळजाच्या जवळचं.
खसकन पायातलं अवसान जात. इतक्या वर्षानी ती कशी दिसत असेल ? या विचारानी मन सैरभेर होतं.
जवळच्या कोचावर शांत बसतो. पाणी पितो.
घाईघाईने लेटरपैडवर सही सही करतो.
बंगल्याच्या पोर्चमधुन गाड्यांचा ताफा निघतो.
काही लाल तर काही निळ्या सायरनचे आवाज आसमंत व्यापतात.
फॉर्चुनरच्या काळ्या काचेतुन,माझी नजर एका जोडप्यावर स्थिरावते.
मी सही केलेलं पत्र तो पुरूष आलटुन पालटुन पाहतोय. आणि स्री गाडांच्या ताफ्याकडं पाहतेय. मी काच खाली करून तिला पाहण्याची जराही तसदी घेत नाही.
ओळखीचं नाव पाहुन, पत्राच्या मागे मी माझा खाजगी नंबर लिहिलेला.
रात्री जेवणाच्यावेळी वॉट्सअप मैसेजवर ती Thanks Vikrant सह स्माईली पाठवते.
माझ्या आयुष्यात ती कधीतरी आली होती. हे स्फुटपणे आठवते.
-Vikrant Shanke


Comments
Post a Comment