लातूरातील पोलिसी अत्याचार

पोलिसच जेव्हा मारेकरी बनतात
खुपश्या उद्वेग्नाने आणि बर्याच निराशेनी लिहीतोय. या लिहिण्याला कारण बनलीय एक घटना. चळवळीमध्ये हल्ली  सोबत असणारा माझा मित्र देवा बजगुडे  हा 4 दिवसांपुर्वी माझ्याकडं रडवेला चेहरा करून आला. म्हणाला विक्रांतजी माझ्या लहान भावाला पोलिसानी पकडुन नेलंय व प्रचंड मारहाण चालु आहे. स्वतः लातूरचे  DYSP सचिन सांगळे मारहाण करत आहेत. तेव्हा मी त्याला दिलासा दिला व कायदेशीर मदत मिळवण्याच्या दिशेनी विचार चालु केला. यादरम्यान त्याची माहितीही काढुन घेतली. त्यात सविस्तर वृत्त असे समजले की, त्याचा लहान भाऊ रामेश्वर बजगुडे उर्फ पाप्या हा सराईत गुन्हेगार आहे. ( Habitual Criminal ) त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत व काही प्रकरण न्यायालयात चालु आहेत. आता आपण पाहतो त्याप्रमाणे गुन्हेगार व पोलिसांचा बरासचा संबंध जवळचा असतो. त्याला अनेक पदर आहेत. पण यावेळी *रामेश्वर बजगुडे* यास लातूर पोलिसानी ( गांधी चौक, पोलिस स्टेशन ) 5 दिवसापुर्वी चौकशीच्या नावाखाली अटक केली व सतत  3-4 दिवस त्यास मारहाण करत राहिले. दरम्यान भावाच्या विनंतीवरून मी चळवळीतील  काही पत्रकार व वकीलांशी संपर्क करून प्रकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत होतो. ते सोडतील का याबद्दल विचार चालु होता. काल उशिरा मी परळी येथील व्याख्यान संपवुन येत असताना त्याच्या भावाने सांगितले की त्याला सोडलं आहे. आणि त्याने काही फोटो पाठवले. ते फोटो पाहुन माझं मन अतिशय द्रवलं . अगदी जनावरासारखी मारहाण केलेली होती. तेव्हा मी त्याना संबंधिताचे मेडिकल करून पोलिसांवर न्यायिक कार्यवाही करण्यासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा माझ्या सल्ल्याप्रमाणे भाऊ -भाऊ जेव्हा मेडिकल करायला शासकीय रूग्णालयात गेले असता तिथे परत दोन पोलिसांनी त्याला पकडुन नेल . मला हे समजताच मी सर्व चळवळीच्या साथींना घेवुन गांधी चौक पोलिस स्टेशनला भेट दिली . पण तेथील पोलिसांनी हा अट्टल गुन्हेगार आहे. याच्या फंद्यात पडु नका असा सुज्ञ सल्ला दिला. व परत पाठवले . काही वेळानी त्याच्या भावाने फोन केला की रामेश्वरला सोडुन दिलंय . आता तुमच्या माझ्यासाठी काही प्रश्न 

गुन्हेगार जरी असला तरी पोलिसांना बेदम मारण्याचे आधिकार कोण दिले ?
या प्रकरणात आम्हांला समजलं की रामेश्वर बजगुडे हा अट्टल व सराईत गुन्हेगार आहे. ( Habitual Criminal ) पण जरी हा गुन्हेगार असला तर अश्याप्रकारे अमानवी मारहाण करण्याचा पोलिसांना आधिकार कायद्याने दिलेला नाही.

बंदीप्रत्यक्षीकरणाचं काय ? ( Habious Corps)
आपल्याला म्हणजे प्रत्येक  भारतीय नागरिकाला संविधानाने  जिवीत व स्वातंत्र्याच्या मुलभुत हक्कामध्ये अंतर्भुत बंदीप्रत्यक्षीकरणाचा आधिकार दिला आहे. यानुसार पोलिसांनी   कोणत्याही स्वरूपाची अटक केली तर त्याव्यक्तीवर गुन्हा नोंदवुन त्यास 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणे बंधनकारक आहे.

जेव्हा पोलिस दवाखान्यातुन उचलुन नेतात

देवा बजगुडेच्या म्हणण्यानुसार त्याच्या भावाला मेडिकल ट्रीटमेंट  सुरू असताना 
पोलिसांनी उचलुन नेलं. हा म्हणजे अगदी कळंस आहे. कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याच्या  वैद्यकीय उपचारादरम्यान कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. जगणं, श्वास घेणं, वैद्यकीय उपचार घेणं हा माणसाचा मुलभुत हक्क आहे. तुम्ही खाकीच्या आडुन तो हक्कच नाकारताय .

कायद्याचं राज्य आणि तुमची माझी चुप्पी
आपण निस्तेज देशात कायद्याचं राज्य आहे. पण डोळ्यादेखत असे प्रकार घडताना आपणं डोळे झाकुन पाहतो.गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे पण त्याला शिक्षा देण्याच्या प्रयत्नात पोलिसानी गुन्हेगारी वर्तन करणं कितपत योग्य आहे. भारतीय कायदा हे म्हणतो की जोपर्यंत न्यायालय गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवत नाही तोवर तो गुन्हेगार नाही. तसेच गुन्हेगाराना शिक्षा देण्याचा आधिकार न्यायालयाला आहे. पोलिसांना नाही. देवा बजगुडे, रामेश्वर बजगुडेसारखी मुलं, व्यक्ती ही सुद्धा माणसं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडं माणुस म्हणुन पहावं. देशाची सेवा करायचीय म्हणुन MPSC च्या मुलाखतीत तोंडाला फेस येईपर्यंत बोलणार्या व आधिकारची जागा मिळाल्यावर माणसांवर अन्याय करणार्या प्रत्येक  प्रवृत्तीला माझा विरोधच असेल. कारण माझ्या डोक्यात गांधी - आंबेडकर -भगतसिंग आहेत. प्रश्न तुमचा आहे. तुम्ही सदैव मला साथ द्याल या अपेक्षेसह रजा घेतो .
जय हिंद     -  जय भिम 
       - #विक्रांत शंके
( विद्यार्थी नेता, लातूर )

Comments

Post a Comment