इन्कलाब जिंदाबादच्या अर्थाच्या संदर्भात

अन्यायाच्या विरोधात मुठी उगारून उभा राहण असतो इन्कलाब

आपल्या समुहाच्या हितासाठी परिणामाची पर्वा न करता भिडणं असतो इन्कलाब

या वर्षानुवर्षाच्या शोषित  व्यवस्थांचे पाश गळ्याभोवती करकचुन  आवळले जात असताना दमनाचे दोर कापणं असतो इन्कलाब

आपली वैचारिक  भुमिका पक्की करून तत्वांशी बेईमानी न करता सतत लढत राहणं असतो इन्कलाब

आजादीच्या नार्यानंतर पाठोपाठ येणारा व अभिव्यक्तीची हमी देणारा शब्द असतो इन्कलाब.

जो शब्द भगतसिंग राजगुरू  , अशफाकउल्लाऩी उच्चारला तो पहिला  शब्द आहे इन्कलाब

समोर असलेल्या मुजोर समुहासमोर छाती ताणुन विद्रोहाची ठिणगी जागवणारा असतो इन्कलाब

अरे त्याना काय जाणीव ज्यांना गुलामीचीच सवय आहे जिवंत व्यक्तीस्वातंत्र्याची खुण आहे इन्कलाब
                  -इन्कलाब जिंदाबाद
                    -   Vikrant

Comments

  1. Khupch arthpurn ani aajchya paristhitila sajeshi

    ReplyDelete
  2. जबरदस्त आजच्या घडीला याच इन्कालब ची गरज आहे
    कविता खूप आवडली कॉपी करतोय

    ReplyDelete
    Replies
    1. करा काही हरकत नाही .

      Delete
  3. Very nice poem it's touch my heart....

    ReplyDelete
  4. Very nice vikrant bhai
    इन्कलाब जिंदाबाद

    ReplyDelete
  5. खुप च छान विक्रांत💐

    ReplyDelete
  6. ✊Inqlab zindabad✊.
    काय बोलावे आता तुमच्या लिखाणाविषयी.
    अत्यंत सुव्यवस्थित पणे तुम्ही प्रत्येक शब्द आणि वाक्य मांडत असता.
    त्या प्रत्येक वाक्यात त्या- त्या विषयाबद्दल वाचकांना समजेल अशा भाषेत तुम्ही लिखाण करता.
    हे कस जमतं तुम्हाला #विक्रांत# जी?

    ReplyDelete
  7. विक्रांत अभिनंदन.छातीत आग असेल तर शब्दांचे अर्थ लागतात .हे लक्षात आलं

    ReplyDelete
  8. खूपच छान कविता लिहिली विक्रंतजी आपण .. इंकलाब शब्दाचा खरा अर्थ सांगितला

    ReplyDelete

Post a Comment