स्व: चा शोध

हल्ली तु शोध घेतेयस माझा हे समजलं, वा छान, चालु दे तुझ 
आणि माझाच मला 
नवा कुणी सापडलो तर  सांग 
काय ना , मी बसतो ग रोज स्वतःसोबत , साथसंगत म्हणुन 
एकांतस्थळी निवांत
पण कदाचित असतो बेभान, सापेक्ष स्वतःप्रती,
म्हणुन उलगडाच होत नाही मला माझ्या व्यक्तिमत्वाचा 
हो! साधायचीय मलाही 
तु म्हणतेस त्याप्रमाणे निरपेक्षता, स्वतःप्रती,दुनियेप्रती

पण होत नाही शक्य आजकाल
कारण मी हरवत चाललोय माझ्याच विश्वात झपाट्याने जुन्याचे नवे संदर्भ शोधत 
आरपार खोलखोल..
            -Vikrant

Comments

Post a Comment