मोदिंची टाळी करोनाची थाळी

मोदींची टाळी आणि कोरोनाची थाळी 

इंग्रजी साहित्याचा अभ्यास ज्या माणसाचं साहित्य वाचल्याशिवाय पुढं जावूच शकत नाही त्या शेक्सपियरच्या हैम्लेट नाटकामधलं हे वाक्य " जगावं की मरावं हा प्रश्न आहे ? " (   To be or not to be ) हे आजपर्यंत अनेक संदर्भानी वापरलं गेलं .पण याच धर्तीवर भारताच्या संदर्भात आज मला हे वाक्य प्रकर्षाने म्हणावसं वाटतय. आज " हसावं की रडाव हा प्रश्न आहे" नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून चीनमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला. आणि हळुहळु सगळं जग आता कोरोनाच्या विळख्यात आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग भारत याला कसा अपवाद असू शकतो.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा भारतात प्रवेश व्हायला सुरूवात झाली आणि दिवसेंदिवस कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. कुठल्याही देशावर जेव्हा अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा तेथील सरकार व नागरिक म्हणून तुम्ही आम्ही या सर्वांची जबाबदारी असते की त्या संकटाच्या निवारणासाठी सर्वांनी मिळून योग्य ती पावले उचलायला हवीत.  आणि त्या  संकटाच्या मागचं गांभीर्य ओळखायला हवं असंत.पण  भारतीयाना गांभीर्य नावाच्या गोष्टीची लस जन्मताच देण्याची सोय असती तर बर झालं असतं. अस म्हणण्याची पाळी आलीय. जगभर झपाट्याने पसरणार्या या महाभयंकर रोगाला रोखण्यासाठी  जितक्या लवकर केंद्र सरकारने  पावलं उचलायला हवी होती तेवढ्या लवकर ती उचलली नाहीत. यात त्याचा काही दोष नाही. आपण मोदी सरकारची तुलना जर विदेशी सरकारशी करायला लागलो तर तो आपला फौरवर्डनेस आहे खुप . म्हणजे बैलगाडीत बसायचं आणि फैरारीच्या वेगाची अपेक्षा करायची असं होतंय हे. खैर कुछ भी हो.उशिरा का होईना मोदीनी 1 दिवसीय जनता कर्फ्युचं लॉजिक लावलं. इथपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर जेव्हा त्यानी टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा 5 कलमी कार्यक्रम जाहीर केला . तेव्हा कदाचित त्यांनाही याच्या काटेकोर अंमलबजावणीची कल्पना आली नसेल.22 मार्चचा जनता कर्फ्यु पार पडला आणि 5 वाजताच त्यावर पद्धतशीर पाणीही फिरलं. दिवसभराची पोलिस कर्मचारी, मेडिकल स्टाफ, डॉक्टर्स आदींची मेहनत वाया गेली. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढाच गलथानपणा पुरेसा होता की काय दुसर्या दिवशी खडबडून जागे झालेले कार्यसम्राट नेहमी प्रमाणे व रोज प्रामाणिक काम करत असल्यासारखे वागायला लागले. सगळं जीवन पुर्वरत दिसायला लागलं. कलम 144, गर्दी न करण्याचं आवाहन, यातलं काही काही कामाला आलं नाही. खरं तर सुरूवात झाली परदेशी व्यक्तींच्या आगमनाने. कोरोनाला आपल्याला पहिल्याच पायरीवर रोखता आलं असतं. पण श्रीमंताच्या पायावर लोळण घेणारं प्रशासन, परदेशी लोकांचे मंत्रालयीन वशीले, एअरपोर्ट ऑथॉरिटीतील आधिकार्यांचा भ्रष्टाचार हाच कोरोनासाठी व्हिसा ठरला आणि इमिग्रेशनच्या कसल्याही चितेंविना हा प्रवासी दिल्ली , मुंबई आदी शहरात दाखल झाला.पहिली स्टेज संपली. दुसरी स्टेजपण हा पटापट पार करतोच आहे. दिलासा आहे तो. वेगवेगळ्या  राज्यातील सरकारे घेत असलेल्या निर्णयाचा. पुर्णपणे सार्वजनिक वाहतुक बंद, कलम 144 लागू, संचारबंदी लागू, अत्यावश्यक वाहने सोडून इतर  वाहनांना पेट्रोल , डिझेल बंद व वैद्यकीय सेवांची उपलब्धता. या गोष्टी आश्वासक वाटत आहेत. पण या पुर्णपणे मानवी शरीराशी निगडीत असणार्या रोगावर वैज्ञानिक पद्धतीने उपचार हा एकमेव मार्ग असताना व तो सुद्धा धुसर असताना. यावर गाणी बनवणं, टिकटॉक व्हिडिओ, विनोदी कमेंट , नारे, कार्टुन, मीम्स, छद्मविज्ञानातील उपाय सांगणे हा अगदी मुर्खपणाचा कळस आहे.हे आपण सर्रास करत आहोत. एकीकड ही मोदीची टाळी आणि मृत्युला मेन्यूमध्ये ठेवून कोरोनाने आणलेली थाळी आहे. यातून सुटका कशी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असं मला वाटतं. हा माझाही प्रश्न मला वाटला असता पण सामुहिक निर्णय हे गंभीर समुहाला  गृहीत धरून घेतले जातात. गो करोना गो चे नारे देत कान फाटेपर्यंत आणि थाळी तुटेपर्यंत थाळी वाजवणार्या वरातीत नाही. "गर लगेगी आग तो आयेंगे घर कई जद में
यहांपर हमारा मकान थोडी है .

        ©️ विक्रांत शंके

Comments