एका मैफिलीत
तुमच्या कवितांच्या प्रेरणा कशा बनत जातात ?
मी क्षणभर सुन्न ?
यार या लोकांच्या धारणा अशा का बनत जातात?
कविता सुचायला कारणं लागतं
हे कारणं खुप जुनं झालंय
कवितेच्या मागे प्रेरणा असते , हे तारणं मात्र शिल्लक राहिलय
असं वाटतं,
असं वाटतं की, चमकतय मेंदुत कुठेतरी क्लिक होतंय, मित्रा !
तीच असते कविता सुचण्याची नांदी.
आता हे उगाच सुचतं नाही, ओढुन ताणुन लिहिलं तर लोकांना रूचतं नाही,
म्हणुन मित्रा....
poetry is the spountenous overflow of Emotions म्हणुन भागत नाही.
आणि तुला व्यक्तच व्हायचं असेल तर त्याला कोणतीच प्रेरणा लागत नाही.
©️ Vikrant


Comments
Post a Comment