हरवलेला मार्क्स शोधायला
हरवलेला मार्क्स शोधायला
आधी माझं मार्क्सवर प्रेम होतं
साध. सरळ .सोप .
Love at First site
च्या प्रकारातलं.
हळुहळु त्याची लेखनशैली, मग सैद्धांतिक मांडणी आणि विचारसरणी
रोजच्या रोज मला भुरळ घालत गेली.
आणि मग मार्क्स मला नेहमीच भेटु लागला.
कधी भांडवलाच्या पानात, कधी कामगाराच्या संपात,
तर कधी SFI च्या बैठकीत.
तो आला की
दरवेळी नवाच भासायचा.
आपली भरदार दाढी कुरवाळत मिश्किल हसायचा.
त्या किचकट मांडणी करणार्या लोकांकड पाहुन , खुळकन बसायचा
आणि हळुच उठुनही जायचा.
त्या बकाल कामगाराच्या वस्तीत बेमालुमपणे मिसळायचा .
त्या दिवशी मलाही कंटाळा आला, घमघमाटाने भरलेल्या डाव्यांच्या बैठकींचा मी त्याग केला
हळुच मागोमाग निघालो मार्क्सच्या.
जो जाईल तिकडे .
वळणा वळणाने , चढउताराने.
अंतरा अंतराने
त्यातल्याच एका टप्प्यावर मार्क्स थांबला .
मागे वळुन माझ्याकडे पाहत विश्वासाचं हसला आणि लुप्त झाला.
मी खिन्न मनानी परत आलो. मार्क्सवर भलताच नाराज झालो. मला त्याच्याशी बोलायचं होतं, भांडायच होतं.
मानवमुक्तीचं त्यानं बघितलेलं स्वप्न त्याच्याच डोळ्यांनी पहायचं होतं .
मी परत आलो.
आणि त्या दिवसापासुन हळुहळु मार्क्सवरचं माझं प्रेम कमी होतं गेलं.
दरम्यान मला एक मुलगी आवडायला लागली, कारण तिला मार्क्स आवडायचा.
कालांतरानी समजलं तिलाही मार्क्सने असाचं धोका दिलेला.
आता ती मुलगी आणि मी आणि रोज जातो. श्रमिकांच्या वाड्या वस्त्यांत, हरवलेला मार्क्स पुन्हा शोधायला.
त्याच वळणावर
अंतरा अंतरानी.
-Vikrant


ek number bhai..
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteBhava ❤
ReplyDeleteMast
ReplyDeleteKhup chan.... 👌👌
ReplyDeleteखूपच छान. परिपक्व कवी सारख लिखाण आल आहे. आपल्या प्रतिभेला सलाम.विचार आणि दिशा योग्य आहे. संकोच नको .We are proud of you.wish you all the best.
ReplyDeleteVery nice... Thinking is critically also Great imaging
ReplyDeleteWow Great....
ReplyDeleteखूप छान विक्रांतजी
ReplyDelete💕💕💕
ReplyDeleteखूपच सुरेल विक्रांतजी
ReplyDelete