महेशच्या माझ्या चर्चेअंती

10 मिनिटाच्या चर्चेअंती
महेश आणि विक्रांत
#देशीवाद #तरूणाई
#टिकटॉक पिढी #शेतीप्रश्न

महेश आणि मी संधी मिळेल तेव्हा चर्चा करतच असतो. पुर्वी वेळ मिळायचा भरपुर आता तो त्याच्या कामात मी माझ्या कामात व्यस्त. आज योगायोगाने भेट झाली. तेव्हा आमच्यात झालेला हा संवाद . प्रश्नोत्तराच्या रूपात देत आहे. [ 16  May 2020 ] 

महेश -: हिंदु आहे का रे तुझ्याकडे ? ( नेमाडेंची कादंबरी ) 
मी  -:  PDF स्वरूपात आहे. 
महेश -: PDF नको. वाचावीशी वाटत नाही. पुस्तक स्वरूपात हवी.

मी -: कस काय आज अचानक हिंदु आठवली ?

महेश -: असंच वाचाव म्हणतोय. 

( इथुन चर्चेला सुरूवात झाली.)

मी -: देशीवाद तुला काय वाटतो ? आणि त्याची एवढी गरज का आहे ?

महेश -: देशीवाद मला श्वाश्वत वाटतो. कारण तुमच्या भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव तुमच्या आरोग्याशी मग ते शारिरीक असो , सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक सुसंगत असतो. जर तुम्ही तुमच्या मुळांपासुन फारकत घेतलीत तर झाडाचा बुंधा आणि ते धुड कस वागवु शकणार ? आज आपण सर्वजण वेगानी आपली मुळं कापत चाललोय. हे थांबायला पाहिजे.

मी -: मी ' बुद्धप्रिय कबीर' यांच्या मृत्युपश्चात कॉम्रेड अमरनाथ यानी लिहिलेला लेख शेअर केला होता वाचलास का ?

महेश -: हो. वाचला

मी -: काय वाटतं एकुण त्याबद्दल ??

महेश -: अमरनाथ यांनी खर तेच लिहीलय नं. पुरोगामी , परिवर्तनवादी चळवळीत निष्ठेने झोकुन देवुन काम करणार्या कार्यकर्त्यांच पुढं काय होणार ?? कारण कार्यकर्ता त्याग करतो. त्याच्यासाठी तो त्याग करतो. समाजासाठी मात्र वेडगळपणा किंवा अजुन काहीतरी. ज्या समुहासाठी तो काम करतोय. त्याची जाणीव त्या समुहांनाच नाही. आणि चळवळींमध्ये सुद्धा स्वार्थच ( interest) काम करतो. उदा. शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्वावर जर तु आंदोलन उभं केलस तर शेतकरी त्या प्रश्नाची तीव्रता बघुन तुझ्या आंदोलनात सहभागी होणार नाहीत.त्याना नगदीचे फायदे हवे असतात. उदा. त्यांच्या जमिनीला सध्या मिळत असलेला एकरी  10 लाख भाव वाढवुन तो एकरी 15 लाख इतका मिळावा म्हणुन आंदोलन करत असशील तर त्या 5 लाखाला पाहुन ते येतील. नाहीतर येणार नाहीत. असपण परिवर्तनवादी चळवळी जवळजवळ संपतच आल्यात. पी . साईनाथ. कॉम्रेड अमरनाथ यांचेकडुनही अपेक्षा संपत आहेत. थोडक्यात काय तर यापुढुन जास्त अपेक्षा नाहीत  

मी -: दक्षिणायन बद्दल काय वाटत ??

महेश -: गणेश देवींची चळवळ.  त्यांच काम या सगळ्या पार्श्वभुमीवर जबरदस्तच म्हणावं लागेल. त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात काम उभ रहावं म्हणुन आयुष्याची 30 -40 वर्ष खर्च केलीत. तुम्ही अनेक क्षेत्रापैकी कुठल्यातरी क्षेत्रात 20 -30 % काम केलत तर तेच सही आहे. अनेक क्षेत्रात 2 -2 % करत फिरत असाल तर तुमची ऊर्जा वाया जाणार. होणार मात्र काहीच नाही. देवींचा अजेंडा प्रभावी आहे. सगळं दक्षिण एक झाल तरच भाजप ला आपण थोपवु शकतो. द्रविड  Vs. आर्यन्स.

मी -: चळवळीची माणसं संपत चाललीत हे खरं आहे. पण आजच्या तरूणांबद्दल काय वाटत ? व्यवस्थेचं अचुक आकलन असणारे कमीच आहेत. पण मध्यवर्गीय कुटुंबातुन येणारे व जे तळ्यात मळ्यात अवस्थेत आहेत. अश्या तरूण - तरूणींना कस खेचता येईल चळवळीकडे ??

महेश -: ( थोडा हसतो) पुर्वीपासुनच तरूणांवर टीका होत आलेली. सर्वकालीक तरूण पिढ्यांनी ते सहन केलय. पण आजच्या तरूणाईकडं पाहता ही टीका खरी म्हणावी लागेल.  आजच्या तरूणांच वाचन काहीच नाही. उलट त्यांची आत्मकेंद्रितता आधिकच वाढत चाललीय. पुर्वीची जी पिढी होती तुझ्या माझ्या आजोबांची, वडिलांची त्यांच्यामध्ये अगदी थोडासा जनरेशन गैप होता. म्हणजे शेतीपद्धतीतला एखादा नवीन बदल वा तत्सम काहीतरी. बाकी सगळं जैसे थे चालत आलेलं. तसच 40 ते 90 च्या दशकातल्या पिढ्यांच होतं. 90 दी नंतर हळुहळु आपला भोवताल बदलायला लागला. याचे साक्षीदार आपण आहोतच. पुर्वी कोणत्यातरी एकाद घरात T v असायचा. नंतर सगळ्याच घराच TV दिसु लागला. हा कौटुंबिक संवादातला प्रथम आणि मोठा अडथळा होता. पुर्वी अश्या साधनांच्या अभावी माणसा माणसातील संवाद घट्ट होता. आणि मग हळुहळु नव्वदीनंतर व्यक्तीपरत्वे एकलेपणा ( Alination) वाढत गेला. लोकं त्यांच्यातली संवेदनशीलता , विवेक हरवायला लागली. म्हणजे हा एकट्या टीव्ही चा परिणाम नाही. अनेक कारणं आहेत याला. त्यातल्या त्यात तुझ माझ ठीक होतं. पण साधारणतः  2005  जन्मलेल्या सा 
Tik -Tok पिढीच काही खर नाही. आता स्पर्धापरीक्षा देवुन थकलेल्यांकडुनच काहीतरी अपेक्षा आहेत. किमान जाणीवा जिवंत आहेत त्यांच्या. 

मी - Tik-Tok वरून विचारतोय.  टिकटॉक  हे जाणीवपुर्वक भांडवली व्यवस्थानी पेरलेल विष आहे की गरज म्हणुन लोकांनी स्वीकारल ?

महेश -: यापैकी वरच कारण नाही. स्मार्टफोनच्या जमान्यात जे अनेक चैटिंग , एन्टरटेनिंग Apps आले. त्यापैकीच टिकटॉक हे एक App आहे. मात्र याद्वारे तरूणांना अभिव्यक्तीची जागा सापडल्यासारख झालय. त्यांची त्यांच्या संवादाची own space . नाहीतर ते त्यांच एकलेपण ,  तुटलेपण सांधणार कुठं होते ?? त्याना हे समजायला हवं की हा काही श्वाश्वत मार्ग नाही तुटलेपण सांधण्याचा.

मी -:  तु देशीवादाचा पुरस्कार करतोस अर्थातच मी ही. देशीवाद श्वाश्वत आहे. अशी राल्फ लिंटनची मांडणी जी नेमाडेंनी भारतात केली. याबद्दल काय सांगशील ? 

महेश -: बरोबरच आहे. तुमच्या भौगोलिक पर्यावरणाला अनुसरून जसा तिथल्या वनस्पती, प्राणी इ चा आरोग्यावर वाढीवर स्थानिक  हवामानाचा प्रभाव पडतो. तसंच माणसाच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणाचं आहे. आज या पर्यावरणात प्रचंड भेळमिसळ झालीय. ग्लोबलायजेशन मुळं निर्माण झालेली आयात संस्कृती किंवा हायब्रीड संस्कृती आपल्याला संपवुनच दम घेणार असं दिसतय. याच्या मुळाशी प्रचंड नफेखोरीची भांडवली धोरणं आहेतच पण त्याबरोबरच आपल्या हाडीमासी भिनलेला चंगळवादही आहेच. शेतीमधील  आधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांच्या अतिवापराचच उदाहरण घे. आता केमिकल इनपुट काही देशी चीज नव्हे. स्थानिक पर्यावरणाशी तिचा कसलाच ताळमेळ नाही. हरित क्रांतीच्या लाटेखाली आपण तिला अकारण पचवायचा प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणुन आज अर्धा पंजाब कैंसरशी लढतोय. यावर देशभराच आजघडीला कुठेच चर्चा होताना दिसत नाही. एका राष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणुन , देशाचे तरूण म्हणुन समकालीन पिढ्यांना राष्ट्राच्या श्वाश्वत अस्तित्वासाठी काही चर्चा कराव्या लागतात. काही धोरणं आखावी लागतात. भारतात याचा फार मोठा अभाव आहे. ही पोकळी कधी भरून निघणार ? 

मी -: शेतकर्यांना यावर गंभीर विचार करायला लावलं तर ?

महेश -: नाही. ते गंभीर नाहीत होणार. कारण सेंद्रिय खतांचा वापर करून जमीन परत सुपिक बनवायची म्हणली तर तिला किमान 2 -3 वर्षाचा वेळ द्यायला हवा.दोन तीन वर्ष जमीनीत कसलच उत्पादन घ्यायचं नाही. आज शेतकर्यालाही ही कल्पनाही सहन होणार नाही. 50 वर्षानंतर जमीनीची पोत काहीच शिल्लक राहणार नाही. वगैरे सांगितल तर माझ्या मुलाच्या पिढीचा हा प्रश्न झाला. तो बघुन घेइल. ही आजच्या बळीराजाची धारणा आहे. त्याच्या कुटुंबापुरतही सेंद्रिय उत्पादन घ्यायची त्याची तयारी नाही. या पार्श्वभुमीवर तु देशीवादाचा आग्रह कसा धरणार ? आजोळी म्हणजे मामाच्या गावाला जाण्याचं कल्चर संपलय. मला दहीभाकर खायचीय म्हणल तर पुराणमताचा समजतील हा हा 😂😂

मी -: हे सगळं खुपच भयावह आहे. बदलणार कस ??

महेश -:  (हसुन) तु आहेस की , काही होवो भगतसिंंगाप्रमाणे आपण शेवटपर्यंत तरूणांवर विश्वास ठेवायला हवा. 

( तेव्हा चमकुन मी ही हसतो व महेशचा निरोप घेतो.)


शब्दांकन- विक्रांत शंके

Comments

  1. फोन रेकॉर्ड करून ठवला व्हता का ?
    😢

    ReplyDelete
  2. नाही.. माझ माइंड सगळं रेकॉर्ड करत .

    ReplyDelete
  3. खूप भारी विक्रांत जी अप्रतिम शब्द रचना केली आहे ,हे वाचताना अस वाटत आहे की जणू समोरच संभाषप चालू आहे की काय

    ReplyDelete
  4. Khupppp chhan 👌👌👌

    ReplyDelete
  5. लेखकाची खरी ओळख म्हणजे त्याच्या लेखनातील जिवंत पणा ...!! तसा जिवंतपणा या लेखनातील संवादात जाणवत होता नेहमी...!!! अप्रतिम कविता....👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment