कलेक्टर - तु माझा नोकर

साथीनो लाल सलाम , जयभिम 
आज भारताला स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष झाली , संविधान लागु होवुन तितकी वर्ष झाली पण बदललं काहीच नाही. असं म्हणणं सोपं आहे आणि चुकीचही आहे. बदल खुप झालाय.  संविधानामुळे आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणुन वावरू लागलो. या व्यक्तीकेंद्रित संविधानाने आपल्याला इतके काही हक्क दिले की राजाच बनवुन टाकलं. पण आपण काही बदललो नाही. काही  इतिहासकार म्हणतात भारत हा गुलामांचा देश आहे. आता सत्य सांगणार्याना या देशात कोंडीत पकडतात , तसं त्यांना जावु नका जाब विचारायला सोने की चिडीया न म्हणता गुलामांचा देश कसं म्हणताय ?? त्यांच्याकडे पुरावे तयार आहेत तुमच्या गुलामीचे. आणि आजही त्यात काहीही बदल झाला नाही. असं मला वाटतं. आपण गुलाम आहोत . गुलाम होतो आणि गुलामच राहाणार. जर आता आपण तरूण - तरूणींनी मिळुन काही हालचाली नाही केल्या तर... आज वास्तव पाहु शकता तुम्ही. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी एकच पकडुया . नोकरशाही.  ( Bureaucracy) आज या व्यवस्थेत जे नोकर काम करत आहेत. त्यांचा व्यवस्थेतला दर्जा काहीही असो. शेवटी ते नोकर आहेत. मात्र आज तेच नोकर आपले मालक असल्यासारखे वागत आहेत. कारण आपण त्यांना तशी परवानगी देतोय. we are allowed him. फक्त परवानगी देवुन थांबत नाही तर कर्तव्यदक्ष आधिकारी हे ते म्हणुन त्यांच उदात्तीकरण करतोय.  त्यांना व्याख्यानाला बोलावणं, त्यांची हांजी , हांजी करणं कशासाठी चाललय हे सगळं. यामुळे आपण त्यांना जाब विचारण्याची आपली शक्ती गमावुन बसत आहोत. जी सरकारी काम न्याय मार्गाने होणारी असतात त्यासाठी सुद्धा त्या सरकारी नोकरांसमोर तोंड पसरून हसताना आपणाला काहीच नाही वाटतं. किती दिवस देशाचा मालक हा देशाच्या नोकरासमोर हात पसरणार ?? लाळ घोटुन बोलणार ?? यात तुमची माझीही काही चुक नाही कारण आजुबाजुच्या व्यवस्थेने आपल्या धारणाच तशा बनवुन ठेवलेल्या आहेत. कलेक्टर आपणाला मोठा वाटतो, Sp, Dysp मोठा वाटतो. मला वाटतय आता हे सगळं थांबलं पाहिजे. आता जिल्ह्याजिल्ह्यात लोकशाही जाणीवा जिवंत असलेली मुलं - मुली तयार करण्याचा माझा मानस आहे. आणि जे माजी नोकरशहा, आजी /माजी  लोकप्रतिनिधी, संविधानतज्ञ, वकील आहेत. यांनाही माझ आवाहन आहे की , आपण सोबत द्यावी. लोकशाहीसमोरचा मोठा अडथळा असणारी ही भ्रष्ट नोकरशाही उखडुन टाकु आणि या जनतेच्या नोकरांना त्यांची जागा दाखवुन देवु. बस्स झाले 70 -72 वर्षे आमच्या पैशावर मजा केली यांनी.वेळ आलीय आता  जनतेच्या पैशानी रात्री बेरात्री घरात बायकोसहीत इतर बायका नाचवणार्या आणि दिवसा मात्र गरीब जनतेला, मध्यमवर्गीयाना वाघ होवुन गुरकावु पाहणार्या मदमस्त सरकारी नोकरांना त्यांची जागा दाखवण्याची. 

ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के
अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के.
              - विक्रांत शंके 

Comments

  1. Sach hai vikrantji..... Hum apke sath hai..... Ladenge aur jitenge 👑👑👑

    ReplyDelete
    Replies
    1. जी जरूर . इन्कलाब जिंदाबाद

      Delete
  2. Khup chan.... Inkalab jinadabad.. ✊✊

    ReplyDelete
  3. वास्तविक मांडणी

    ReplyDelete
  4. Very deep thinking.
    we need to change our mind set to change this situation

    ReplyDelete
  5. खूप छान दादा

    ReplyDelete
  6. सर्वजण मिळुन बदलुया हे वास्तव ,
    युवक आहे निखारा- युवती आहे विस्तव

    ReplyDelete
  7. It's true vikrant I'm with you

    ReplyDelete
  8. मानसिक गुलामीतून बाहेर काढले पाहिजे

    ReplyDelete
  9. आपण युवकच या पोकळ व्यवस्थेला मोडून काढू.

    ReplyDelete
  10. आपण युवकच या पोकळ व्यवस्थेला मोडून काढू.

    ReplyDelete
  11. Barobar mitra... Lokana aapn kon aahot aani aapn kay kru shkto hech mahiti nahi...

    ReplyDelete
  12. Barobar mitra... Lokana aapn kon aahot aani aapn kay kru shkto hech mahiti nahi...

    ReplyDelete
  13. काही खरंच खूप कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत पण काही एवढे कर्तव्य शून्य आहेत की विचारता सोय नाही. एखाद्या कायद्याबद्दल सजग असणाऱ्या व्यक्तिसमोर अशा लोकांची त्रेधातिरपीट होते. म्हणून यात सामील होणाऱ्या मुला मुलींना कायद्याचे धडे देणे गरजेचे आहे. अस माझं मत आहे.

    ReplyDelete
  14. विक्रांत तुमचा संताप समजू शकतो हा व्यवस्थेचा दोष आहे .तुम्हाला एका नाटकातील वाक्य सांगतो peoples get the the government they deserve.याचा अर्थ असा लोकांना लोकांच्या लायकी प्रमाणे सरकार मिळतात ज्या देशात दारू पैसे च्या आधारावर निवडणूक होतात त्या देशात असेच चित्र पहावयास मिळते .एक मात्र नक्की आपण युवकांनी विधायक मार्गानी जाब विचारला पाहिजे जे काही करतील ते युवक करतील असा माझा विश्वास आहे माफ करा मी जरा जास्त लिहितोय

    ReplyDelete

Post a Comment