माझ्या कवितेला स्वप्नात पाहणार्या निळ्या डोळ्यांना उद्देश्शुन ........!
माझ्या कवितेला स्वप्नात पाहणार्या निळ्या डोळ्यांना उद्देशुन .....
प्रगल्भ व्हायला लागलो होतो त्या टप्प्यावर ..
ब्राउनिंगची पोएट्री नाही मिळाली वाचायला
म्हणुन पश्चाताप केला नाही ग कधी .
कारण मला विद्रोही तुकाराम भेटला होता.
"आम्हां घरी धन -शब्दांचीच रत्ने" म्हणत
दिवसाच्या एका प्रहरी
जेव्हा नुकतच उन तापायला लागलं होतं, आणि
माझा मजुर बाप तळला जात होता रखरखत्या उन्हात विहीरीच्या कामावर....
हे माज्या नशीबाला येवु नये म्हणुन ओरडत होता. म्हणत होता साळा शिक पुस्तुक वाच .
मी वाचत राहिलो अधाशाप्रमाणे
तुकारामानंतर- फुले- आंबेडकर- मार्क्स - पाब्लो नेरूदा- चेगव्हेरा..
वाचुन वाचुन मला काही बाही सुचायलाही लागलं होतं ते लिहीत गेलो.
त्याला वेदनेची अभिव्यक्ति म्हणतात हे मराठीच्या गुर्जीनी सांगितलेलं आज लख्खपणे आठवतं...
ती अभिव्यक्तीच घेवुन वाचत राहिलो, लिहीत राहिलो.
या सगळ्यात अवकाशच मिळाला नाही तुझ्या सौंदर्यशास्त्रातलं फिक्कट प्रेम करायला.
तु मात्र वाचत असशील आमच दुःख ढसाळ - खरात- रायटन ते बाल्डविनच्या साहित्यात.
गुलाबी गादीवरून न हलता ,
एसीच्या वार्याखाली पालथ पडुन....
may be वाटत असेल तुझ्या फैंटसीत तुलाच एका विद्रोही प्रियकराची प्रेयसी व्हावं म्हणुन....
किंवा चुकुही शकतो माझा अंदाच , तुला माझ्या कविता आवडतात, स्वप्नात येतात यामागचा काढलेला तर्क ..
पुन्हा एकदा सांगतो
हे जगण पेलवणार नाही गं तुला,
उद्या माझ्यासोबत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत रणरणत्या उन्हात डांबरी सडकेवर बसशील धरणे धरून शेतकरी आंदोलनात दिवसभर ...
तेव्हा याच कविता तुला काचतील खोलवर...
चरचरत जातीलमेंदुपर्यंत सुख-लोलुपतेचे संदर्भ जाळत ...
तेव्हा काय करशील ?
पण तरीही माझ्या कविता स्वप्नात येत राहिल्या नेहमीप्रमाणे तर सांग...
सुर्य मावळेपर्यंत सावली धरीन माझ्या देहाची तुझ्या कोमल मुर्तीवर
शोषणमुलक व्यवस्थेचा निरंतर प्रतिकार करत तुझ्या साथीने....
- विक्रांत


Wah.. .khup mst. . 👍👌👌
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteKhop chan
ReplyDeleteAwesome 😊😘
ReplyDeleteलै भारी।
ReplyDeleteक्या बात है। 🤗👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteअप्रतिम भाऊ
ReplyDeleteसर्वांचे मनपुर्वक धन्यवाद . Keep reading keep supporting
ReplyDelete