या मनीची - त्या मनी
#या मनीची-त्या मनी
रोज सायंकाळी पाखरं घरी परततात ,
आपला दिवसभराचा शीण घालवतात . विसावा घेतात.
तद्धतच माझी अवस्था.
या जगरहाटीच्या कोलाहालात,
नात्यांच्या गदारोळात ,औपचारिक बंधनात.
मी वळतो तुझ्याकडे . कधीही ,
आठवण येते तेव्हा.
कारण माझ्या विक्षुब्ध मनाचा एक
हळवा कोपरा तुच आहेस.
हल्ली जाणवतही नाही मला माझं अस्तित्व.
इतकं बेमालुम मिसळुन गेलंय तुझ्यात.
तुला जाणवतो का ग ?
तुझ्या - माझ्यातला हा संथ संवाद .
जो चालत राहतो.निरंतर.
काय -काय नसतं ? या प्रवाहात.
सु:ख ,दु:ख, कौतुक,
वेदना,पीडा,
प्रतारणा.
अजुन बरंच काही शब्दातीत.
कोणत्याच लिपीत मांडता न येण्यासारखं.
तुला माहितीय का ?
वरकरणी अनोळखी भासणारे दोन चेहरे जेव्हा रूपांतरीत होतात एकाच चिरकाल ओळखीच्या चेहर्यात,
आणि संवादाच चित्र बदलतं.तेव्हा भाषा ही केव्हाच संपुष्टात येते ,
अभिव्यक्तीच माध्यम म्हणुन.
फक्त एक दीर्घ जाणीव मुरत जाते.
सहअस्तित्वाचा संदेश घेवुन
या मनीचा त्या मनी.
- Vikrant


.....ते तसच असतं ...मन पाखरु पाखरु
ReplyDeleteप्रेमात पाडल आपण
ReplyDeleteSupper ho sir
ReplyDeleteखूपच जबरदस्त ! व्यक्त होतांना भावनांच्या अल्लड ओघ, प्रहावास मांडणीस्तव शब्द सागरातुनी अलगद वेचलेले शब्द खरंच अप्रतिम,अद्भुत ,शब्दातित.... अभिनंदन !!
ReplyDeleteWell
ReplyDeleteअभिनंदन अतिशय छान 👏💐
ReplyDelete