चेन्नई सेंट्रल- तत्वासाठी लढणार्याची कहाणी
चैन्नई सेंट्रल - तत्वासाठी लढणार्या लोकांची कहाणी
मला पुर्वीपासुनच दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल आदरमिश्रीत कौतुक वाटत आलेल आहे. कारण त्यांच्या सिनेमाचे विषय हे कधीच बॉलीवुड सिनेमांसारखे पांढरपेशे किंवा हॉलिवुड पटातला खारीसारखा कडक रोमांस भीत भीत पावसारखा भिजवुन बॉलिवुडमध्ये कॉपी करणारे असे नसतात.दाक्षिणात्य चित्रपटामध्ये अस्सलतेला व देशीवादाला मोठं स्थान आहे असं दिसतं. त्यामुळे टॉलीवुडचे सिनेमे सर्वसामान्यांशी खुपच रिलेट करतात. यापैकीच एक म्हणजे मी नुकताच पाहिलेला. चैन्नई सेंट्रल हा सिनेमा. यामध्ये धनुषने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. आता या सिनेमाचं कथानक थोडक्यात सांगुन मग माझा सिनेमा पाहण्याचा अनुभव काय होता यावर बोलतो. सिनेमाचं कथानक सुरू होतं चैन्नईमधील सागरीकिनार्यावर झोपडपट्टीत राहणार्या गरीब मच्छीमारांचा मसीहा राजन याच्या खुनापासुन. सन 1987. थोडक्यात राजनची पार्श्वभुमी अशी की मच्छीमारांच्या वस्तीतला हा स्मगलर असतो व तो सतत वस्ती वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतो. मग त्याठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेवुन बिल्डर्स, नेते राजकारणी येतात, पोलिसी बळाचा वापर करतात . तेव्हा तेव्हा राजन त्यांना सामोरा जातो व वस्तीला वाचवतो. याचे 4 पंटर असतात.सेंथिल , कलेश्वर, वेलु आणि भुरा. हे त्याच्यासोबत नेहमी सावलीसारखे असणारे मात्र स्थानिक राजकारण्याच्या ऑफरला बळी पडुन सेंथिल आपल्या फायद्यासाठी राजनचा खुन करतो यात त्याचे तीन मित्रही सामील असतात. यानंतर कथानकाला सुरूवात होते. कथेचा शेवट असा की राजनची बायको भुरासोबत लग्न करते व आपल्या नवर्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाट राहत असते. तेव्हा शंबु (धनुष ) एन्ट्री होते. धनुष हा साधा सरळ एक पट्टीचा कैरम प्लेअर असतो. त्याला पद्मा नावाच्या ड्रायव्हरच्या मुलीसोबत प्रेम होतं. दोघांच प्रेमप्रकरण वस्तीमध्ये मोठा चर्चेचा विषय होवुन बसलेला असतो.पद्मा सुंदर असल्याने तिला सर्वजण छेडत असतात. यात कलेश्वरचं छेडणं पद्माच्या खुपच जिव्हारी लागत मग ही गोष्ट ती शुंभुला शेअर करते. मग शंभु व पद्माचा भाऊ कुंदन हे त्याला समजावुन सांगण्याचा 2 -3 वेळा प्रयत्न करतात व शेवटी अनावधाने त्यांच्या हातुन कलेश्वरचा खुन होतो. व राजनच्या बायकोला बळीचा बकरा मिळतो. यातुन कथानक पुढं जातं राहतं. मग कशाप्रकारे राजनची बायको शंभुला कलेश्वरच्या खुनातुन वाचवते व त्याचा वापर करून सेंथलला जेलमध्ये मारायला लावते तो मरत नाही.अपंग होतो. मग तीघात मांडवली होते.व तिघेजण मिळुन वस्तीमधुन महामार्गाचा प्रस्ताव आणतात व 15 वर्षानंतर पुन्हा एकदा वस्ती संकटात येते आणि तेव्हा शंभु राजनचा वसा घेवुन वस्तीचा रक्षक बनुन उभा राहतो. इथे कथानकाचं वर्तुळ पुर्ण होतं.
आता चैन्नई सेंट्रल या सिनेमाची लक्षात ठेवण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे झोपटपट्टीतील लोकांच जगणं दिग्दर्शकानी हुबेहुब उभं केलय. यात प्रामुख्याने त्यांची भाषा. पुर्ण सिनेमाभर प्रत्येक पात्राने आपली झोपडपट्टीतील ती टपोरी भाषा व सदोष इंग्रजी सोडलेली नाही. खुप दिवसापुर्वी अण्णाभाऊंचा चिरागनगरची भूत हा कथासंग्रह वाचला होता. सिनेमा पाहताना मला त्या कथासंग्रहाची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचबरोबर अनेक दलित लेखकांच्या महानगरीय कादंबर्यामध्ये वाचलेली व मुंबईमध्ये प्रत्यक्ष पाहिलेली झोपडपट्टीही या सिनेमात हुबेहुब जिवंत केलेली आहे. दुसरा पैलु म्हणजे कैद्यांच आयुष्य , झोपडपट्टीतील वस्तीच्या लोकांमध्ये मुरलेली गुन्हेगारी व पात्रांच्या डोक्यामध्ये असलेली डिप्लोमैसी . हल्लीच्या सिनेमात तत्वासाठी झगडणारा व समुहाच्या न्यायहक्कासाठी लढणारा नायक दुर्मिळ झाला आहे. योगायोगाने मालिकेत सापडलेला धनुष मात्र आपल्यातला हा नायक शेवटी खंबीरपणे ऊभा करतो. चैन्नई सेंट्रल हा सिनेमा तुम्हांला एका वेगळ्या जगात घेवुन जातो व गरीबी, गुन्हेगारी, लाचारी, मुत्सदीपणा, स्वार्थ इ संकल्पनांची चांगलीच सैर करून आणतो. कथानकाला घेवुन एकेएका पात्रावर बरच लिहीण्यासारखं बोलण्यासारखं खुप काही आहे. चित्रपटाबद्दल समीक्षा करत असताना चित्रपटाचं संगीत , दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय इ. बाजुचा विचार करायचा असतो. पण साहित्याचा विद्यार्थी असल्याने मला कथानकच भुरळ घालत व सिनेमामध्ये आलेलं वास्तविकतेच चित्रण मी पाहु शकतो. बाकी बोलेतो सिनेमा बहोत झक्कास था भायलोग, लग रहा था, जैसे आपुनच पर्देपे धुम मचारेला है . सिनेमा जरूर देखना और,भायके ब्लॉगपे कमेंटभी करना.
- Vikrant


Comments
Post a Comment