हजारो मैलाच्या चिन्हांकीत सीमावर
हजारो मैलाच्या चिन्हांकीत सीमावर
हजारो मैलाच्या चिन्हांकीत सीमावर
दोघेही सहप्रवासी.
तत्कालाचा प्रवास त्याच्या पुर्वजानी केला.
समकालाचा प्रवास आम्ही दोघे करतोय.
माझ्या वंशजाच भविष्य मात्र अंधारात.
माणसाच्या उत्पतीनंतर झालेली विभागणी टाळता येवु शकली असती कदाचित .
पण ते शक्य झालं नाही कुणालाच.ना माणसाला, ना त्या माणसाच्या so called विधात्याला.
त्या लंगोटीधारी टोळीतील काही हुशार माणसं उठली जोर करून,
नैतिकतेचा गळा दाबत रचली धर्मशास्त्र,
पेरलं भेदाभेदाचं विष प्रत्येक अंगणात.
देवादिकाचा हवाला देत
हजारो विवेकी मेंदुना केलं बाटलीत बंद .
भासवलं आम्हां सगळ्याना आजची ही विषमता निसर्गदत्तच आहे म्हणुन.
आता त्या घटनेच्या 10 लाख वर्षानंतर..
या प्रदीर्घ प्रवासाची अखेर केव्हा होणार ?
या प्रतिक्षेत दुनियेत
असंख्य जीव ताटकळताहेत ,
काही माझ्यासारखे खोदताहेत मानवी स्वातंत्र्याची जमीन जीवाच्या आकांताने,
समतेच्या
लामणदिव्यासारख्या अंधुक प्रकाशात
आपल्या सर्वस्वाचा नरबळी या पाशवी व्यवस्थेला अर्पण करत दररोज
- Vikrant


खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteएकदम बरोबर बोललो भैया 💯
खुप छान विक्रांत दादा
ReplyDelete10 ha ank marathi t kar.. Baki mast expression
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDelete