सर्जनाचे अंगी ,कल्पनेच्या रंगी - साक्षी देशपांडे ( शब्दांकन - विक्रांत शंके )
सर्जनेच्या अंगी कल्पनेच्या रंगी :साक्षी देशपांडे (शब्दांकन - विक्रांत शंके )
नमस्कार, मित्र आणि मैत्रीणींनो,
मी साक्षी देशपांडे. आज प्रथमच तुमच्यासमोर काही मांडत आहे. म्हणजे तसं मी भरपुर विचार करते चिंतन करते पण ते सगळं कधी शब्दात बांधुन कागदावर उतरवण्याचा प्रयत्न नाही केला. आता मला हे सुद्धा लिहीण्याची प्रेरणा कशी निर्माण झाली हा विषय तुर्तास गुलदस्यात आहे. पुढे कधीतरी लिहायला सरावले की नक्की याचाही खुलासा करीन. पण आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय अगदी तुमच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. कल्पना. ( imagination) मित्रांनो, आपण जगत असताना कितीतरी प्रकारच्या कल्पना करत असतो. चांगल्या, वाईट, विचार करायला लावणार्या , अंतर्मुख करणार्या. तर मग हे कल्पना करणं नेमकं काय असतं. तर मला वाटतं कल्पना म्हणजे एक विचारप्रकिया (Thought process) आहे. ज्याद्वारे आपल्या मेंदुत त्या विषयाशी संबंधित प्रतिमा , ध्वनी, चित्रे गर्दी करतात. बरोबर न. आणि या अशा स्वरूपातल्या कल्पनेनेच या लॉकडाउनच्या दिवसात माझी सर्वाधिक सोबत केली. कदाचित तुमचीही केली असेल. आपण लहानपणापासुन ऐकत आलोय की कल्पना म्हणजे सृजनशीलता ( creativty) . सृजन म्हणजे नवनिर्माणाची शक्ती. होय. कल्पनेतुन आपण नवीनच जग एक वेगळं विश्व साकारू शकतो. त्यामुळेच प्रत्येकाचं एक कल्पनाविश्व असतं. विश्व या शब्दाला तुम्ही अधोरेखीत करू शकता.लॉकडाउनच्या 4 महिन्यात या विचारप्रकियेतुन काही गोष्टी मला रिअलाईज ही करता आल्या. त्यातील पहिली माणुस हा भावनाशिवाय काहीच नाही. दुसरी माणसाचं एकटेपण फक्त माणुसच दुर करू शकतो. मी एके ठिकाणी ऐकलय प्लेटो असं म्हणतो की माणसाला भावना आहेत म्हणुन तो माणुस आहे. नाहीतर एक तो देव तरी झाला असता किंवा जनावर तरी. आता जनावरला भावना असतात पण असुन नसल्यासारख्या. कारण त्याला हव्या त्या तीव्रतेने कुठं व्यक्त करता येतात ?? म्हणुन मानवी आयुष्यात भावनाला प्रचंड किंमत आहे हे समजलं. राग , लोभ, प्रेम, द्वेष, हळवेपण या सर्वांनी मिळुन तर माणुस बनला आहे. आणि आता माणसाचा एकटेपणा. माणसाच्या एकटेपणावर माणुसच उत्तर आहे. आता हे विधान अनेकांना खटकु शकत. कारण हल्ली आपण माणुसघाणे होत चाललोत. असो. पण हे तुम्हीही रिअलाईज करू शकता. मुळात माझा हाही प्रश्न आहे की माणुस खरंच मरेपर्यंत कधी माणसाविना एकटा असतो का ?? तर यांच उत्तर आहे. नाही. तुम्ही कितीही एकांत शोधा. दुर बेटावर जा.तुम्ही शरीराने एकटे असाल पण तुमच्या,डोक्यात, मनात, कल्पनेत माणसच नाचत असतात. तुम्हाला कधीकाळी भेटलेली, तुम्ही अनुभवलेली. त्यामुळं आपण कधी एकटे असतो. हा ही भ्रम आहे आपला. असं मला वाटत.याउपरही हा कृत्रिम एकटेपणा दुर करावा म्हणलं तर याला शेवटी माणुसच पर्याय आहे. जेव्हा काही करून दुर तुमचा एकटेपणा दुर होत नसेल तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत मग ती आई असेल, भाऊ, बहीण, मित्र, प्रियकर, प्रेयसी कुणीही असेल संवाद करा. पहा तुमचा एकटेपणा कुठल्याकुठे निघुन जाईल. या अनुभुतीच्या गोष्टी आहेत. आता याच्या उलटही काही गोष्टी घडतात. समजा तुम्ही सतत सतत एकटे रहायला लागलो तर मग तुम्हांला माणसं नकोशी होतात. मग ती जवळची असोत वा लांबची. फक्त स्वतःचा सहवास आवडु लागतो व सततच्या विचारातुन चालु असणारं आंतरयुद्धही .प्रसिद्ध शिक्षणतज्ञ जिद्दु कृष्णमुर्ती म्हणतात की " हर पल, हर समय, हर दिन- आदमी खुदसेही लडता रहेता है " हे शतप्रतिशत खरं वाटायला लागत. पण यालाही काही मर्यादा असतात. असं मला वाटतं. एका ठराविक मर्यादेनंतर हे सगळं नकोसं होत. म्हणजे एकटेपणातुन येणारे विचार, भुतकाळ आठवुन मिळणारं सुख वा होणार दुःख , किंवा भविष्याच्या कल्पनेने येणारी अस्थिरतेची अनुभुती यात काहीच अर्थ वाटत नाही. जे अस्तित्वातच नाही त्या आभासी जगाशी जोडुन घेवुन जगण्यात, हसण्यात, रडण्यात विलाप करण्यात काय अर्थ. म्हणजे तुमच्याच कल्पनेतुन साकारलेलं हे जग तुम्हांला सुखाःची आणि दुःखाचीही अनुभुती देत. पण लवकरच तुम्हांला यातला फोलपणाही जाणवुन यायला लागतो. बाकी या सर्जनाच्या अंगणात तुम्ही तुमच्या कल्पनेच्या रंगात किती न्हावुन निघता हे तुमच्यावर अवलंबुन आहे. पण
एक गोष्ट पक्की आहे. तुम्ही तुमच्या जीवनातलं कल्पनेचं स्थान कधीही नाकारू शकत नाही.
- साक्षी देशपांडे
(शब्दांकन -विक्रांत शंके)



Mast expression. Aavdle
ReplyDeleteHearti thanks Bhai
DeleteKhup sunder ...sakshi 🤗
ReplyDeleteसाक्षी अप्रतिम लिहिले आहे. खूपच छान !! 👌
ReplyDeleteधन्यवाद सरजी
Deleteखुपच छान साक्षी
ReplyDeleteHearti thanks from her
Deleteखूप छान दादा
ReplyDelete