समाज, संस्कृती व आजचा स्रीवाद

स्त्रीवाद हा काय आहे. याबद्दल खूप जणांना खूप प्रश्न असतील. गैरसमज असतील. स्त्रीवाद हा शब्द पुढे आल्यावर आपल्यासमोर येते ती एक रागीट स्त्री व सतत ओरडत असणारी स्त्री. खूप जण समजतात कि स्त्रीवाद हा विवाह संस्थेच्या विरुद्ध आहे. व खूप जण समजतात की ही संकल्पना परदेशी आहे आणि आपल्या देशात याबद्दलचे कोणतेही प्रसंगीकरन नाही. पण स्त्रीवाद म्हणजे स्त्री-पुरुष समानता अधिकार आणि हक्कांमध्ये समानता. तेही सर्व सामाजिक विभागांमध्ये फक्त एक समतोल समाजासाठी.                 
 
  जसे की पुरुषाला लहानपणीपासून शिकवले जाते की तू हुशार असला पाहिजे दनकट ,बोलका मोठेपणाचे विचार असणारा.आणि महिलांना सांगितले जाते की ओरडु नको भांडू नको व्यायाम करुन स्नायू बळकट करू नको नाहीतर तू बाई सारखी दिसणार नाहीस. पुरुषांना मजबूत शरीर मिळवण्यासाठी बळजबरी केली जाते. मुलींना सभ्य होण्यासाठी सांगितले जाते आणि तरीही त्यांच्या हालचाली कोणाच्या तरी हातात असतात. एकटी कुठे जाऊ नको रात्र होण्याच्या आधी घरी ये. आणि तू जर हे सगळे नियम मोडले आणि बाहेर पडलीस आणि तुझे शोषण झाले तर यासाठी तू जबाबदार राहशील. विचार करा तिच्यावर झालेल्या गुन्ह्यासाठी तिलाच दोषी ठरवले जाते हा कोणता न्याय आहे?मुलींना रात्रीच्या आधी घरी येण्यास सांगितले जाते आणि मुले बाहेर फिरू शकतात आणि सगळी मजा करू शकतात. कारण मुलींवर लैंगिक अत्याचार होतात त्याच्यावरती मग एकच उपाय आहे.मग पुरुषांना रात्री घरी ठेवत जावा त्यामुळे ते गुन्हेगार बदलणार नाहीत आणि मुली बाहेर गेल्या तर त्या सुरक्षित राहतील. आपल्याला  नावीन्य पूर्वक विचार करावा लागेल.स्त्रीला जर मूल असेल तर ही तिचीच का प्रथम जबाबदारी आहे की त्याचे पालन पोषण आणि काळजी घेण्याची.जर पुरुषांना घर सांभाळायचे असेल तर संभाळू द्या हा सगळा निवडीचा भाग आहे.                        "लग्नच माझ्यासाठी सर्वकाही का आहे आणि यात माझे आयुष्य संपेल".असे विधान दिल्यावर समाज म्हणणार कि ती लग्नाला प्रश्न करते . आपली संस्कृती आपलं सगळं काही आहेत. "मानसे संस्कृती बनवतात संस्कृती माणूस बनवत नाही". मग समाज बदलतोय प्रथा आणि विधीही बदलत आहे.आपण कसे काही विधींचा अपमान करतो ते पुढे बघा उदाहरणार्थ, १) वटसावित्री पूजा.                                              २) करवा चौथ.         वटसावित्री मध्ये स्त्री तोच नवरा सात जन्म असावा अशी पूजा करते.जरी तो दारूडा ,अत्याचारी आणि निरुपयोगी असेल तरीही. हे अशे सगळे संदेश कोण लिहित देव तर लिहीत नाही माणसे लिहितात.जर तुम्ही संस्कृती मोडत असाल तर तुम्हाला एकतर चुकीचे ठरवले जाते किंवा तुमचा निर्गुन खूनही केला जातो. हरियाणामध्ये एका जोडप्याने आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. जर तुम्ही पद्धती व परंपरांना आवाहन देत असाल तर तुम्हाला शिक्षा मिळेलच. आपण भानवरी देवी चे उदाहरण घेऊया. भानवरी देवी ही एक स्त्री जी की सरकारी कर्मचारी होती ती तिची नोकरी करत होती म्हणजे बालविवाह विरुद्ध जनजागृती करणे. तीच सामूहिक बलात्कार करण्यात आला.कारण एक बाल विवाह संपन्न होत असताना तिने प्रश्न विचारला .हे तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही संस्कृती मोडायला जाता.                                                आपल्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले आहेत स्वातंत्र्य दिले आहे की आपण आंतरजातीय विवाह करू शकतो. आता समाजाला आपली धारणा बदलून पुढे जावे लागेल. स्त्रीवादाला लग्न व्यवस्था बदलायची नाही.           दुसरा गैरसमज म्हणजे की स्त्रीवाद हि एक पाश्‍चात्त्य संकल्पना आहे. हे समजणे म्हणजे मूर्खपणा आहे. स्त्रीवाद हा महाभारताच्या द्रोपदी पासून चालत आलेला आहे जिने पुरुषांना   प्रश्न विचारला की मला पणाला लावण्याचा अधिकार तुला कोण दिला. त्यानंतर पाकिस्तान मधली मलाला जी  इस्लामी कट्टरपंथी याविरुद्ध उभी राहिली. ज्यांचे म्हणणे होते की स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही.टोनी मॉरिसन जी की आफ्रिकन अमेरिकन कादंबरीकार तिचे म्हणणे आहे की, if you want to fly, you have to give  up the things that weigh you down. स्त्रीवादाची ही एक सुंदरता आहे की त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.आपल्याकडे खूप उदाहरणे आहेत जसे की राजस्थानची मिराबाई जी प्रेमाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होती तिचा कृष्ण शोधत होती. कृष्ण जे प्रेमाचे प्रतीक आहे. कर्नाटक ची अक्का महादेवी आणि असे खुप संत जे स्त्रीवादी होते माझ्या डोक्यामध्ये ‌.नंतर सावित्रीबाई फुले एक पुणेरी स्त्री, पंडिता रमाबाई ,ताराबाई शिंदे या सगळ्या स्त्रीवादी होत्या कारण त्यांनी प्रश्न विचारले .त्यांनीजातीवादाला प्रश्न केला,.                त्यांनी बालविवाहाला प्रश्न केला,.                             त्यांनी सती प्रथेला प्रश्न केला.  आणि स्त्री शिक्षण नाकारलेल्या यांना प्रश्न केला.मग अशा खूप महिला आहेत की त्यांनी खूप आधीपासून प्रश्न विचारले होते हे प्रश्न आता विचारणे सुरूच आहे आज पर्यंत. अत्याचाराचे भय गेलेले नाही विशेष अधिकार असणाऱ्या महिला सुद्धा बदल होण्याची वाट बघत आहेत.मग स्त्रियांना नक्की काय हवे तर भागीदारी कि पुरुषांनी स्त्रियांना हातभार लावावा एक समतोल समाज निर्माण करण्यासाठी. आत्ता एक नवीन प्रयोग करण्यात आला एक स्त्रीवादी मुलींचा गट होता  त्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंतच्या पीडित मुलींचे कपडे गोळा केले  व स्त्रीवर बलात्कार होतो तो तिच्या कपड्यांमुळे नाही हे दाखवून दिले. आपल्याला अशा वेगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचा आहे.                                         जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला ऐकायला शिकायला हवं. महिला काय बोलतात ते ऐका आणि स्वतःला तिच्या जागी ठेवून विचार करा. तर मग आम्हाला पुरुष हे भागीदार हवे आहेत या न्यायात. शेवटी एक स्त्री जी की वर्णद्वेषाविरोधात लढत होती ती म्हणते की  Nobody is free still everybody is free.                             -साक्षी देशपांडे 

Comments