विनाकारण
विनाकारण
विनाकारण उदास वाटतेय मला ही संध्याकाळ
तुझ्यासारखी ,
तुझ्याविना ,तुझ्यासाठी...!
असे ऋुतु येणार याची कल्पना होती
पण एवढ्या तीव्रतेने ?
याचा अंदाज बांधता आला नाही.
तु पण अशीच भरून राहायचीस.
या संथ आकाशासारखी माझ्यावर...
एकटेपणाच्या जीवघेण्या गारव्यात , तुझी ऊब धावत यायची मला शोधत,
तेव्हा तुझं असणं मला वाटायचं विनाकारण
कामाशिवाय.....कामाविना .....!
काहीवेळा तु ही चुकायचीस ,त्रास द्यायचीस या वातावरणासारखीच हुकवायचीस क्षणात ऊन तर क्षणात गारवा घेवुन बसायचीस . तेव्हा त्रागा केला नाही मी कधी.
आयुष्याच्या वळणावर ऋुतु बदलला, पार नुर पालटला.
तु पुढं गेली, मी पुढं आलो
वेगवेगळ्या वाटानी...
आता तुझ्याविना मला हे आयुष्य वाटतय
विनाकारण, विनासायास, उदास आजच्या संध्याकाळसारखं
- Vikrant


Superb 🥰😍khupch chhan ✌️✌️
ReplyDelete