जोर्तीमय सावित्री : पुस्तक लेखनातील नवा प्रयोग

जोर्तिमय सावित्री : समताधिष्ठीत सहजीवन - पुस्तक लेखनातील नवा प्रयोग

काल दि 3 जाने. रोजी या पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल अंजनी येथे झाले.  त्याआधी या पुस्तकाच्या लेखिका अरूणा दिवेगावकर यांची विषयाच्या अनुषंगानी  मी मुलाखत घेतली होती.  त्यावेळी मी हे पुस्तक वाचल होत.  सुबक मुखपृष्ठासह बनवलेल हे आकर्षिक पुस्तक पाहताक्षणीच वाचकाच लक्ष वेधुन तर घेतच पण आपण जर पुस्तक पलटल तर त्याच्या मलपृष्ठावरील मजकुर हा सुद्धा वाचण्याजोगा व खिळवुन ठेवणारा आहे. प्रेम ही श्वाश्वत संकल्पना आहे मात्र आजची तरूण पिढी प्रेमाकडं अतिशय  पुर्वग्रहातुन पहायला लागलीय.  सद्यस्थितीत जोरावर असलेली किंवा प्रभावी असलेली भांडवली मुल्ये , त्याला असलेली पुरूषी वर्चस्वाची झालर आणि सरते शेवटी जातीय धारणा यामधुन तयार होणारं एक नकारात्मक  स्री - पुरूषाच नातं हे झपाट्याने विपन्नावस्थेत जात असलेल्या  समाजाच लक्षण आहे  . म्हणुन या पार्श्वभुमीवर जोतीबा - सावित्री यांच्या सहजीवनाचा वस्तुपाठ हा एक निरोगी सहजीवन जगण्यासाठी गिरवणे महत्वाचे आहे. आज जोती-सावित्रीच्या सहजीवनाच्या अनुषंगानी दोन गोष्टी होणं महत्वाचे आहे. एक म्हणजे तत्कालीन समाजाविरूद्ध आपल्या मुल्यव्यवस्थेशी  एकनिष्ठ राहुन त्यांनी केलेला संघर्ष जगासमोर येण महत्वाचं आहे.  दुसरी गोष्ट पती पत्नी म्हणुन त्यांनी जगलेल सहजीवन,  यातली मुल्यव्यवस्था नवतरूणांना माहित होण.  जोतीर्मय सावित्री या  पुस्तकाच्या माध्यमातुन या दोन्ही गोष्टी साध्य होतात.  अस मला वाटत. पुस्तक वाचायला घेतल्यावर प्रस्तावनेपासुनच ते भारी वाटत.  या मयुरी सामंत यांनी आजकालच्या तरूण पिढीच्या बाबतीतला लग्न न जमण - न टिकणं या समस्येची जी सैद्धांतिक पद्धतीने ओळख करून देण्याचा प्रयत्न केलाय.   ते खुप महत्वाची वाटते. सध्याच्या काळात ही समस्या तितकीशी लक्षात येत नसली तरी भविष्यात मात्र उग्र रूप धारण करणार आहे. याची कारण परत तीच आहेत , जोडप्यांच्या सहजीवनामध्ये प्रधान असलेली नकारात्मक मुल्यव्यवस्था, पारंपारिक विचारांचा पगडा ,इ. हे पुस्तक या नातेसंबंधाच्या विरूद्ध विचार करायला भाग पाडत. तसेच जोतीबा आणि सावित्री यानी आपल्या सहजीवनात अंगीकारलेले समता ,जोडीदाराचा आदर , त्याचे /तीचे निर्णयस्वातंत्र्य या  मुल्यांची नव्याने ओळख करून देत. पण मला वाटत हे पुस्तक वाचण , समजुन घेण हा परिवर्तनाच्या चळळीचा  दुसरा टप्पा असणार आहे. हे पुस्तक परिवर्तनाची स्पष्ट भुमिका घेतलेल्या युवक युवतींसाठी फायदेशीर ठरू शकत. पण जे अजुनही परिवर्तनाच्या प्रवाहात आलेले नाहीत , त्यांना जोती सावित्री हे फक्त 5-2 मार्कापुरते स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकातच वाचुन माहिती आहेत वा स्कोरिंग साठी गरजेचे आहेत. त्यांना हे पुस्तक शिवाय टेबलावर ठेवण्याच्या या पलीकडे काही कामाचे नाही. किंबहुना तसेच करतील. त्यामुळ या पुस्तकाचा वाचक आपोआपच मर्यादित होतो. आता थोड्याश्या वरच्या पातळीवरच्या वाचकांचा काहीसा  भ्रमनिरास करणारही हे पुस्तक आहे. कारण ज्या पद्धतीने किमान लातूर शहरात या पुस्तकाची ब्रैंडींग फुले दाम्पत्याच्या सहजीवनावर प्रकाश टाकणार पुस्तक म्हणुन केली गेली. तर थोड्याच्या चिकित्सक, संशोधक व्रतीच्या वाचकाची उत्सुकता अशी असते की, फुले दाम्पत्यांच्या सहजीवनावर आता काहीतरी खरंच अप्रकाशित, कुठेही न वाचलेलं , ठोस असं वाचायला मिळणार. पण पुस्तक वाचुन संपवल्यावर अशा वाचकांचा भ्रमनिरास होतो. कारण पुस्तकात जोतीबा आणि सावित्रीच्या आयुष्यातील ज्या घटनांचे संदर्भ दिलेत ते सर्वाना अगदी पाठ झालेले असे आहेत. ते सावित्रीला ख्रिस्ती मिशनर्यांनी चित्रमय पुस्तक भेट दिल इथपासुन ते त्यांनी प्लेगच्या साथीत रूग्णांची जातीने सेवा केली इथपर्यंत सर्वच. म्हणजे या पातळीवर जोतीबा सावित्री यांच्या सहजीवनावर अनेक बाजुनी  अजुन खुप संशोधन होण व ते जगासमोर येण  महत्वाचं आहे.पण या सर्वात लेखिकेचा स्वतला रूढ अर्थाने लेखिका न मानण्याचा  सततचा उल्लेख आश्वासक वाटतो. त्यातुन पुस्तक निर्मितीतला प्रामाणिक हेतु आधिक स्पष्ट होतो. पण जोतीबा सावित्री यांच्या सहजीवनावर खास सहजीवन हाच पैलु घेवुन पुस्तकनिर्मीतीचा प्रयोग हा वाखाणण्याजोगा आहे. हरिती पब्लिकेशन ही  प्रकाशनसंस्था नेहमीच असे प्रयोग राबवते. अशा नवनवीन प्रयोगासाठी लेखिका अरूणा दिवेगावकर , व हरिती प्रकाशन संस्थेस खुप खुप शुभेच्छा ! हे पुस्तक आपणही वाचाव.
                  - विक्रांत शंके
   संपर्क - 9890766640
( लेखक कवी व समीक्षक असुन महाराष्ट्र जीवन मिडीया समुहात कार्यकारी संपादक या पदावर कार्यरत आहेत ) 

#Critics#of#Book
#Jyotirmay#Savitri
#NewExperient

Comments