महाराजांच एकदिवशीय उदात्तीकरण आणि वर्षभरासाठी विसरण

महाराजांच एकदिवशीय उदात्तीकरण आणि वर्षभरासाठी विसरणं ....!
                  - विक्रांत शंके

आज शिवजयंती 19 फेब्रु जगात भारी.  हो ! हे खरंय पण एक दिवसासाठीच का? हा प्रश्न प्रकर्षाने समोर येतो.  त्यातही आपण महाराजांना पारिभाषिक अंगाने जाणार्या अभिनिवेषयुक्त आणि जडजड अलंकारकृत शब्दात अडकवलय. हे झालं गौरवोद्गाराच्या बाबतीत. दुसरी शिवउदात्तीकरणाची  बाजु आहे, ती म्हणजे आपण महाराजांना प्रतिकांतही बंदिस्त केलंय.  भगवे भेटे, चंद्रकोर, सुवर्णमुर्त्या, गड, किल्ले सगळ्या निर्जीव आणि प्रतीकात्मक गोष्टी. हे सगळ 19 फेब्रु.पुरतच का  मर्यादित राहत. पुन्हा वर्षभरासाठी आपण छ. शिवाजी महाराजाना  पुर्णत : विसरून जातो. बर या एकदिवसापुरत तरी महाराजांच्या आदर्शाचा शोध घेण्यासाठीची बुद्धी कुठली येणार आपल्याला. आणि  तसही एकदिवसात महाराजांचा शोध संपेल इतक खुरटं त्यांच व्यक्तीमत्व कधीच नाही पण किमानपक्षी आपण सुरूवात तरी करायला हवी.  आणि हे एकदिवशीय उदात्तीकरण फक्त महाराजांच्याच बाबतीत होत अस नाही तर जवळपास  सगळ्याच महापुरूषांना घेवुन आपलीच हीच मनोअवस्था आहे. मला अस वाटतं एक प्रागतिक समाज म्हणुन आपण या सर्वातुन बाहेर पडायला हव. आजही भारतीय समाजामध्ये ते सामाजिक, राजकीय प्रश्न उपस्थित आहेत ज्यासाठी या महापुरूषानी लढा दिला होता. Specifically शिवाजी महाराजांच्याच बाबतीत बोलायच झाल तर महाराज हे रयतेच्या सुखाबद्दल किती आग्रही होते हे सर्वश्रुत आहे. " रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका असे कळकळीने सांगणारे छ.शिवाजी महाराज. पण आज त्यांचच नाव घेवुन सत्तेवर य़ेणारे सत्ताधीश जनतेला ऊसासारख पिळुन खात आहेत. यांच्या बद्दल यांच्या हक्काबद्दल आपण जराही विचार करत नाही. त्यांना जाब विचारत नाही. मग शिवरायांचे मावळे कसले ? महाराजांचा माणसा माणसात भेद पाडणार्या विषारी विषमतावादी विचारसरणीला प्रचंड विरोध होता पण आज दुर्दैव हे की , त्यांच्याच नावाने भेदा भेद करण्याच षडयंत्र रचल जात आहे. महाराज हे स्वत: ला  कुण्या एका जातीचे धर्माचे मानत  नव्हते , ते जनतेचे होते.पण आज त्यांचा हिंदु राजा म्हणुन गौरव केला जातोय.तसेच 16 व्या शतकात शिवाजी महाराजांचे जितके संघर्ष झाले त्याच स्वरूप एक सत्ताधारी VS दुसरा सत्ताधारी असे होते पण ,आज त्यांचा संघर्ष मुस्लीम विरूद्ध हिंदु दाखवला जातोय. हा त्याच षडयंत्राचा एक मुख्य भाग आहे .आणि ही भावना  नक्कीच महाराजांना मोठ  दु:ख देणारी आहे. यावर आपण कधीच विचार करत नाही किंवा बोलतही नाही. शिवजयंतीला पोवाडे गाणारे किंवा व्याख्यान देणारे शिवव्याख्याते ही मंडळीसुद्धा या मध्ये समान सहभागी आहेत . अस मला वाटत कारण ,ज्या माध्यमातुन त्यांना खरे शिवाजी महाराज सांगायचे आहेत , त्या ऐवजी ते शिवजयंतीच्या  समकालीन उत्सवी स्वरूपाला  भुलुन म्हणा किंवा स्व: प्रस्थापनेसाठी म्हणा ,नवी मांडणी घेवुन पुढ येत नाहीत . म्हणुव त्या अवकाशात ज्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी ती होत नाही. ही सगळी आव्हान आहेत.जी  मला वाटतयं आपल्याला आपल्या लाडक्या शिवाजी महाराजापर्यंत पोचु देत नाहीच. यावर आपण सर्वांनी प्रकर्षाने विचार करायला हवा. महाराजांच्या आदर्शाचा खरा शोध घेणाच्या प्रयत्न  कोणत्याही दिवशी सुरू होवुन तो निरंतर चालला पाहिजे अस मला वाटत. बाकी मी तर त्याच प्रयत्नात असतो. महाराजांच्या राजमुद्रेसह आपली रजा घेतो.

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपणांस  लाख लाख शुभेच्छा !
महाराजांच्या आदर्शावर चालण्याच बळ  सर्वांमध्ये याव हीच अपेक्षा व्यक्त करतो.
                  -  विक्रांत शंके
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र जीवन न्युज )

Comments

Post a Comment