आयशाच्या मृत्युस जबाबदार कोण?
आयशाच्या मृत्युस #जबाबदार कोण?
अवघ्या देशाच मन हेलावुन टाकणारी घटना, साबरमती नदीकाठी हसतमुखाने आयशाने बनविलेला व्हिडियो अंगावर काटा आणणारा आहे. मृत्युला कवटाळण्यापुर्वी किती मैच्युअरली बोलुन गेलीय ती? तिच्या मृत्युस जबाबदार जेवढा ती, तिचा नवरा आहे तेवढेच जबाबदार समाज म्हणुन आपण आहोत अस मला वाटत. इथली शिक्षणव्यवस्था आहे. सुशांत सिंग राजपुत, आमटेताई, समीर गायकवाड या प्रत्येक आत्महत्येनंतर मी हाच प्रश्न उपस्थित करत आलोय. कारण काही असेल, परीक्षेत नापास होण्यापासुन ते कर्जबाजारीपणा, अपमान, सेल्फ इगो प्रेमात धोका काही काही . आपल्याला परिस्थितीवर मात करून जगायला शिकवु शकलं नाहीये हे शिक्षण. हा भारतीय शिक्षणव्यवस्थेचा खुप मोठा दोष आहे. समाज म्हणुन तर
प्रत्येकाच्या आत्महत्येस पुरक अशीच व्यवस्था दिवसें दिवस उभी होत चाललीय. आपण इतके टोकाचे असंवेदनशील आणि बेगडी होत चाललोत की बस्स.. आता हिंस्र जनावरांपेक्षा जास्त माणसांचीच भीती वाटायला लागलीय. त्यांच्या वागण्याची. हल्ली समाज म्हणुन माणसाच्या मुलभुत गरजा नाकारणं चालल आहे. यामध्ये प्रेम, अभिव्यक्ती सारख्या इ मानसिक ,भावनिक गरजा आहेत. आता अभिव्यक्तीली जोडुन मला एक निरीक्षण मांडावस वाटतयं हवं तर तुम्ही स्वतःचही आत्मपरीक्षण करून ते पडताळु शकता.
"अगदी मनातल बोलावं, ह्रदयाच्या तळातल मांडाव अशी माणसं खुप कमी राहिलीत," बरेचदा ज्यांना आपण गृहित धरतो, रूढ अर्थाने समाज ते नातं निश्चीत करतो ती, तो व्यक्तीच आपल्या भावनांची खिल्ली उडविण्याची संधी शोधतात. उदा, आयशाच्या पतीचच उदाहरण घ्या, तिला त्याच्या मानसिक आधाराची गरज होती, समाजानेही गृहित धरल होत की पती म्हणुन हा तिला समजुन घेईल घ्यावं, पण त्याने तिच्या भावनांची खिल्ली उडवली. तिला मरणाचा सल्ला दिला. किती वेदनादायी होत हे. मी यालाच आत्म्याची हत्या म्हणेन.. आयशाची आत्महत्या तेव्हाच झाली होती जेव्हा तिला प्रिय असणार्या व्यक्तीनेच तिच्या भावनांचा गळा घोटला. नदीत उडी मारून तीने #देह संपवला आहे . आता आपल्याला असंही वाटु शकत की, काय गरज होती एवढी? घटस्फोट घेवुन वेगळी झाली असती तर बर झाल असत, तिच्यासमोर दुसर्या लग्नाचा पर्याय होता की, पण हे सहजी शक्य नाही, कारण भारतीय समाजव्यवस्थेनेच एक पतीव्रत व एक पत्वीव्रताला घेवुन जबरदस्त नेणीवा तयार केल्या आहेत. त्यामुळ लग्नानंतर दुसर्साशी नात जोडयला आपल मन सहजी तयार होत नाही. परत समाजा म्हणुन आपणही परितक्त्या व्यक्तीकड किती #सुवर्णलोचनांनी पाहतो हे सर्वश्रुतच आहे. यालाच जोडुन अजुन एक सामाजिक निरीक्षण मांडतो, हा #Complex समजुन घेणही खुप महत्वाच आहे. विवाहापुर्वीच्या प्रेमसंबंधात बहुतांश मुली आपल्या जोडीदारावर निस्सीम प्रेम करत नाहीत.आपल्या जोडीदाराला lightly घेतात. किंवा त्याला समजुन न घेता सरळ नाकारतात. कदाचित त्याना आपल्या नात्यासाठी सामाजिक अधीष्ठाण हवं असत कारण समाज म्हणुन आपण मुलींच्या धारणा तशाच बनवलेल्या असतात, पण जेव्हा लग्नानंतर हे सामाजिक अधिष्ठाण प्राप्त होत तेव्हा मात्र त्या आपल्या नवर्यावर भरभरून प्रेम करायला लागतात. पण इथं या टप्यावर पुरूषाला त्याच्या आयुष्यात मुलींकडुन, नकारात्मक अनुभव आलेले असल्यामुळे तो पत्नीचा द्वेष करायला लागतो. किंवा तिचं तेवढ महत्व त्याला वाटत नाही. तिच कितीही प्रेम असल तरी.
यातुन मग आयशासारख्य मुलींना मृत्युला कवटाळाव लागत. या पार्श्वभुमीवर समाज म्हणुन मुलामुलींच्या या धारणा आपल्याला तोडाव्या लागतील. प्रथम हे समजुन सांगाव लागेल की बाई प्रेम म्हणजे प्रेम असत, ते लग्नापुर्वी की लग्नानंतर याला तितक महत्व देत बसु नको. लग्न हा फक्त संस्कार आहे. आता तर लग्न ही बाब जोडीदार निवडीतील समस्या म्हणुन पुढे येत चाललीय. मग समाज म्हणुन आपण मुला मुलींना जोडीदार निवडीसाठी जात, पात, धर्म, सामाजिक स्थान आदी काहीही न पाहता विवेकी पद्धतीने जोडीदाराची निवड कशी करायची हे शिकवलं पाहिजे. या उपरही जोडीदाराची निवड चुकली तर त्याला स्वतःला संपवण हा कधीच पर्याय होवु शकत नाही हे ही ठासुन सांगाव लागेल.
राहिला प्रश्न शिक्षणव्यवस्थेचा तर माझी सरकारला विनंती आहे की, आता तरी क्युरीकुलम बदला आणि मुलांच्या IQ बरोबरच Emotional Qushent ला महत्व द्या. तरच आयशासारख्या निष्पाप मुलींचे बळी जाणार नाहीत.
- विक्रांत शंके
( कार्यकारी संपादक महाराष्ट्र जीवन न्यूज)


Nice
ReplyDelete