Lock Down ला विरोध करा

हे सरकारच्या सुचना व आदेशांचे गुलाम झालेल्या नागरिकांनो आतातरी जागे व्हा ,Lowdown ला विरोध करा.

साथींनो नमस्कार
आज काल बाजारात , कार्यालयात इथे तिथे हीच चर्चा सुरू आहे. Lowdown होणार का  ? होईल का ?होणार आहे का ? आता बंद करा या चर्चा आणि थोडंस मेंदुची कवाड नीट उघडी करून विचार करा. काय तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती एवढी सक्षम आहे की , तुम्ही अजुन पुढील वर्षभराच Lock down झेलु शकता ? काय तुमचा व्यवसाय एवढा सुद्रुढ आहे की तुम्ही वर्षभर शटरला कुलुप लावुन पुन्हा नव्या जोमाने काम करू शकता ? तस असेल तर काही हरकत नाही किंवा अस समजा ही पोस्ट तुमच्यासाठी नाही. मंडळी अस नाही , मागच्याच Lock down मधुन आपण पुर्णपणे सावरलेलो नाही आहोत.  माझा पत्रकार म्हणुन काम करत असताना maximum समाजातील सर्वच स्तरात जगणार्या घटकाशी संपर्क येतोय यावरून सांगतो,  आज रिक्षाचालक, मजुर, हातगाडेवाले यांच जगण मुश्कीलीच झालय,  आटो रिक्षाचे हफ्ते, कर्जाचे हफ्ते, वीजबील इ च्या थकीत रकमा खाजगी सावकारांच चक्रवाढ व्याज इ मुळे यांचा जीव अगदी मेटाकुटीला आलाय.  छोटे व्यवसायिक यामध्ये  कटिंग सलुनवाले, चहा टपरी, हॉटेलचालक, मोबाइल रिचार्च दुकानदार, अनेक जण चिंताग्रस्त आहेत.   कालच माझ्यासोबत टुर्स ट्रैव्हल्सचे काही प्रतिनिधी आपली व्यथा मांडत होते. त्यांच्याही त्याच वेदना आहेत.  एकीकडे जीवघेणी महागाई , पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव आणि दुसरीकड उद्योग धंद्यावरच हे  संकट यांनी आपण तुम्ही  मी पुरते पिचुन गेलोत.  पण तरीही प्रशासनाने Lock Down लावल तर मान्य करायला तयार आहोत.  म्हणजे किती ही  षंढ मानसिकता म्हणावी लागेल. बर हे तुम्हांलाही माहिती आहे की कोरोना विरूद्ध लॉकडाउन हा काही अंतिम उपाय आहे का?  तर  नाही. मग Lowdown चाच घोष का?  काय बर आहेत 
#लॉकडाउनचे #निकष ?  लॉकडाउन लावण्यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? 

(1) कोरोनाचे वाढत जाणारे आकडे 
(2)जिल्हा किंवा शहरातील हॉटस्पॉटची संख्या
(3)संसर्गाचा दर  (R  Rate )
(4) दुपटीचा दर 
(5)कोरोना चाचण्या,  लसीकरणाचा वेग, 
(6)उपलब्ध बेडस वैद्यकीय सुविधा 
(7) कोरोना रूग्णांची वाढती संख्या इ. 
वरील निकषाच्या आधारे लॉकडाउन जाहीर केल जात.  मग जर जिल्ह्यात लॉकडाउन सदृद्श परिस्थिती निर्माण होत असेल तर ती चुक प्रशासनाची आहे की जनतेची आहे?  तुम्ही नियम पाळत नाही, गर्दी करता म्हणुन आपली जबाबदारी जनतेवर ढकलुन द्यायच सरकारन बंद कराव.  लोक नियम पाळतात. सध्या लातूर शहरात  रात्री 8 ते  सकाळी 7 वाजेपर्यंत  संचारबंदी आहे . लोक 8 वाजता घरी जातच आहेत ना.  कोण म्हणल नियम पाळत नाहीत. हे खोटय . लोक नियम पाळतात. म्हणुन तुम्हां सर्वांना माझ आवाहन आहे,  नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा .पण , सोबतच लॉकडाउनसाठी मात्र सरकारविरोधी,  प्रशासनविरोधी भुमिका घ्या. कारण वर जे आर्थिक वास्तव मी मांडलय ते पाहता आगामी लॉकडाऊन हे मुठभर लोकांच्याच हिताच राहणार आहे ( सरकारी नोकर, बडे राजकारणी , भांडवलदार आदी.) म्हणुन लॉकडाउनचा पुरजोर विरोध करा.  केंद्र सरकारच्या.23 मार्च 21 रोजी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार  सरसकट संपुर्ण देशभर Lowdown करता येणार  नाही. तसेच राज्यभर लॉकडाउन करण्याचे आधिकारही केंद्राकडेच आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने Taste  , Track,  Treat हा protocol पाळायला हवा. कोरोना हॉटस्पॉट व वाढत्या रूग्णसंख्येची ठिकाण वगळता इतर ठिकाणी शाळा,  महाविद्यालय इ ना सुद्धा सुरळीत चालु द्यायला हरकत नाही अस केंद्र सरकारच म्हणण आहे.  ( संदर्भ https://www.instagram.com/tv/CMzu3L9p4nv/?igshid=26y0l48kouu2 ) पण या कोणत्याच बाबी लक्षात  न घेता स्थानिक प्रशासन  व राज्य  सरकाराने हा शहर ओस पाडण्याचा  जो गोरखधंदा चालवलाय तो बंद केला पाहिजे. यासाठी तुम्ही आणि मी संघठित होवुन  लढल पाहिजे . शेवटी कवी वामनदादा कर्डक म्हणतात तसच झालय, 

"मला चीड येत ,
 नाही हाच  माझा गुन्हा, 
 दोष देवु कुणा ? "

Say #NoLockdown 
#SangathitVha

    - विक्रांत शंके  9890766640
(युवा पत्रकार ,महाराष्ट्र जीवन न्यूज)

Comments

  1. तुमचा लेख एक नंबर आहे गोरगरीब जनतेचा विचार केला जावा या सरकारने

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही खरंच पार कर्जात बुडलीये जनता आणि हे लोक लॉकडाऊनच्या धमक्यांनी घाबरवून सोडत आहेत एकाही राजकारण्याचे रुपयाचे देखील नुकसान होत नाही पण गरीबाची अवस्था आणखी वाईट होत आहे यांनी लॉकडाऊनची अमलबजावणी करण्याआधी विषाच्या बाटल्या तरी मोफत द्याव्या गरजूंना कारण तेही घेण्याची आता गरीबाची औकात नाही सगळे नियम काटेकोर पाळून देखील वर्ष भराने हीच परिस्थिती आहे लसीकरणावर लक्ष द्यायचे सोडून धमक्या देत बसलेत

    ReplyDelete

Post a Comment