बाबासाहेब समजुन घेताना
#बाबासाहेब समजुन घेताना !
आज बाबासाहेबांची 130 वी जयंती. वर्षानुवर्ष बाबासाहेबांची जयंती येते आपण साजरी करतो. या लॉकडाउनसदृश्य परिस्थिती कोरोना वगैरेमुळ जयंतीला आलेल उत्सवी रूप थोड कमी झालय. बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव जल्लोषपुर्ण रितीने करावा का तर नक्कीच करावा ही आपली खुप मोठी सांस्कृतिक अंगानी जमेची बाजु आहे. आपली म्हणण्याचा अर्थ म्हणजे त्या सर्वांची ज्यांचा फुले - शाहु - आंबेडकरी विचारावर विश्वास आहे ज्यांच्या जगण्याची जीवनमुल्येच ती आहेत. तर आता प्रश्न हा पडतो की जयंती उत्सवाच्या पुढे आणि मागे आपण काय करतो? मला नेहमी हाच प्रश्न पडत आलेला आहे आणि मी पुर्वीपासुनही हेच मांडत आलोय आणि फक्त बाबासाहेबांच्याच बाबतीत नाही तर सगळ्याच महापुरूषांच्या बाबतीत. तुर्तास आपण बाबासाहेबांबद्दल बोलुया. तर मला असं वाटत की साल दरसाल आणि प्रत्येक दिवस आपण बाबासाहेब समजुन घेण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अजुन किमान पुढचे 100-150 वर्ष तरी बाबासाहेबांच्या विचारांची validity आहे. तस आपण शाब्दिक अर्थाने बाबासाहेबांचा विचार चिरंतन, श्वाश्वत वगैरे म्हणतो पण ते काही खर नाही .कारण बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलय की जग हे सातत्यानंं बदलणार आहे. शिवाजी महाराजांचा काळ उलटुन 300-400 वर्ष होताहेत तर त्याच्या आतच महाराजांच्या काळातील सरंजामी समाजव्यवस्था संपुष्टात आली आहे. कदाचित लोकशाहीच ही तसच होईल. ही 200 वर्ष आणि पुढची 100 म्हणजे 300 वर्षात लोकांना लोकशाही नको वाटेल कदाचित ते दुसर्या कोणत्यातरी पर्यायाचा शोध घेतील. पण सध्यातरी #लोकशाहीपेक्षा उत्तम #शासनप्रणाली जगभरात कुठही पर्याय म्हणुन उभी नाही. आणि जोवर या देशात किंबहुना जगात लोकशाही अस्तित्वात आहे तोवर बाबासाहेबांना समजुन घेण क्रमप्राप्त ठरत.
तर बाबासाहेबांना समजुन घेण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठीची पुर्वअट काय आहे तर इथली #जातव्यवस्था (Indian caste system) तुम्हांला समजुन घ्यावी लागेल. आणि ते ही कोणताही पूर्वग्रह किंवा स्व : जातीचा अभिमान न बाळगता. जेव्हा तुम्ही बााबासाहेबांच्या अनुषंगानी जातीचा अभ्यास करायला लागाल तेव्हा आपसुकच तुम्हांला #चार्तुवर्ण्यधिष्ठित , #ब्राम्हण्यवादी #धर्मांध ,#सनातनी, #प्रतिगामी हिंदु समाजमानसिकतेची चीड येईल. या कैटगरित तुम्ही किंवा तुमचे कुंटुंबिय येत असाल तर ही जाणीव आधिक वेदनादायी आहे. पण जेव्हा तुम्हांला खर्या अर्थाने भारतीय जातीच स्वरूप समजेल तेव्हा मात्र तुम्ही जातीचा त्याग केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जाणीवपुर्वक काही मुठभर गटाच्या हितासाठी चातुवर्ण्यावर आधारित ,पुरूषसत्ताक जाणीवेतुन तयार झालेली झालेली व माणसा माणसात भेद पाडणार्या विचारसरणीवर आधारित जात ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे
" The path of social reform like the path to heaven at any rate in India, is strewn with many difficulties.. Catse is the monster that crosses your path. You cannot have political reform, you cannot have economic reform, unless you kill this monster " (Dr. B R Ambedkar writing and speeches Volume -2) म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही वळणावर हा जातीचा राक्षस तुम्हांला आडवा येणारच आहे. पण दुर्दैव हे की बाबासाहेब समजुन घेण्याऐवजी आपण हा जातीला राक्षस काखेत घेवुन फिरतोय.हिंदु धर्मातील जात ही मनुवादी व्यवस्थेने दिलेली नीच अर्थाची शिवीच. पण आपण आज त्याच जातीचा अभिमान बाळगतोय. मी मांग, मी महार, मी ढोर, मी लमाण आणि बाबासाहेबांना त्यांच्या कृतीनाही जातीच्या रिंगणातच खेचतोय. हे थांबल पाहिजे. बाबासाहेबांना समजुन घेताना इथल्या जातवास्तवानंतर आपल्याला समकालीन वास्तवावर प्रकाश टाकला पाहिजे. जातीविरोधाबरोबरच बाबासाहेब ज्या लोकशाही राष्ट्राच्या संकल्पनेसाठी आग्रही होते. त्यांना जे लोककल्याणकारी राज्य अभिप्रेत होत त्याबद्दलही आपण विचार केला पाहिजे. संविधानाच्या अंमलबजावणीनंतर बाबासाहेबांनी ". आपण प्रथमतः व अंततः भारतीय आहोत " हे जाहीर करून टाकल. यावरून हे दिसुन येतं की बाबासाहेब आता आपल्याला Beyond the #religion, #caste, #subcontinent #language विचार करायला सांगत होते. आपली फक्त #भारतीय ही ओळख त्यांना हवी होती. मग जेव्हा सार्वभौम व स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणुन आपण विचार करायला लागु तेव्हाच इथली शासनव्यवस्था, लोकशाही यंत्रणा इ चा आपणास उलगडा होईल. तेव्हा आपण तुमच्या माझ्यासारख्या , सामान्य नागरिकापासुन ते मजुर, कामगार, स्रीया इ. च्या हक्काचा प्रगतीचा विचार करू. त्याला अडसर ठरणार्या सरंजामी, अन्यायी, लाचखोर, भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विरोधात उभ राहु. न्यायाची, समतेची, पारदर्शक राज्यकारभाराची आग्रही मागणी करू.
बाबासाहेब समजुन घेताना ही प्रक्रिया झाली पाहिजे. आज देशामध्ये मनुवादी शक्ती काही शांत बसलेल्या नाहीत. आज अतिशय टोकाचा मनुवाद देशभरामध्ये उफाळुन वर येतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( RSS) छत्रछायेखाली बाबासाहेबांच भगवीकरण अतिशय जोरात सुरू आहे. संविधानाला नाकाम करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. प्रामाणिकपणे बाबासाहेब समजुन घेवु इच्छिणार्यांनी हे सगळ डोळसपणे पहाव. आणि बाबासाहेबांचा विचार बुलंद करावा. हीच अपेक्षा
बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐
#BirthAnniversary
#Day of Selebration
( लेखक युवा विचारवंत व महाराष्ट्र जीवन न्यूज समुहात कार्यकारी संपादक पदावर कार्यरत आहेत)


खरच खूप अभ्यासपूर्ण लिखण आहे हे लिहिलेले जेंव्हा लोकांना समजेल व प्रत्यक्षात उतरेल तेव्हा ते खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल
ReplyDeleteThank you
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete