लॉकडाउन लागल्याच्या पहिल्या दिवशी
#लॉकडॉउन लागल्याच्या #पहिल्या दिवशी
देशभर एक #महामारी आली अन् कचेरीतल्या बाबूच्या सहीनिशी एक #फतवा निघाला ,
उद्या रात्री आठ पासून
शहर बंद .राज्य बंद .देश बंद.
त्या दिवशी शहरात बरीच #धावपळ झाली ,
बाजारामध्ये गर्दी आणि गर्दीत बाजार बुडून गेला.
अनेक दिवसांपासून कामच नसलेला #मजूर #हताश होऊन घरी आला
" पप्पा मला खायला आणलं का " ?
उपाशी मुलीने प्रश्न केला मजुराच्या #चेहर्यावरची रेषही हलली नाही ,
मजूर झोपी गेला !
बघता-बघता रात्रीचे आठ वाजले लॉकडाउनची #अंमलबजावणी सुरू झाली.
गाड्यांचे सायरन वाजले खाकी वाल्यानी काठ्या आपटल्या .
शहरात स्मशान शांतता पसरली ,
दुसऱ्या दिवशी #देशाचा प्रमुख #फेसबुक #लाईव्ह आला आपली पल्लेदार #दाढी कुरवाळत भरदार बोलून गेला
लॉकडाऊन ला #अधिकृत सुरुवात झाली होती.
जो तो आपापल्या घरात बंद झाला
आता कुणीच कुणाला ओळखणार नव्हतं ,
कुणाच्या मदतीला कोणी येणार नव्हतं
हळूहळू मृतांचे आकडे तेवढे वर चढत गेले
पंधराव्या दिवशी "त्या" मजुराच्या घरातून क्षीण आवाज आला.
" हॅलो ! येताय नव्हं त्येनी फासी घितली" लहान मुलीच्या भेसूर किंकाळीने वातावरण खिन्न झाले.
लॉकडाउनच्या 15 व्या दिवशी .
लॉकडाउनमधील कविता 1.4


Comments
Post a Comment