बैकलॉग (Backlog)
( एट एटर्नी गेट -1890 by व्हिसेंट व्हैन गॉग)
मी लिहायला हवं होतं काही तरी किमान पुस्तकांच्या पानात दडवून ठेवलेल्या जुन्या चिठोर्यांवर ...
लिहायला हवा होता, माझ्या मेंदूतला प्रक्षोभक कैओस, ओव्हर थिंकिंगने भुगा झालेल्या गलितगात्र मनाची अवस्था आणि अनिश्चित भविष्याच्या भीतीने गाळण उडालेल्या ह्रदयाचा कार्डिओग्राफ ..
पण लिहायच विसरलो आणि हजारो पुस्तकांच्या पानात दडवीत राहिलो लाल कागदाचे चौकोनी तुकडे खूण म्हणून
ज्या पुस्तकांनी मला माझ्या पूर्वसुरींचा बॅकलॉग भरून काढण्या विषयी जाणीव दिली.
जातीने, धर्माने ,देशाने कलंकित ठरविलेल्या समूहाचा घटक म्हणून जगण्याचं दुर्भाग्य हजारो वर्षे त्यांच्या नशिबी आलं ,पण तरीही ते लढत राहिले. त्यांचा बैकलॉग.
आज इतक्या वर्षानी त्यांच्या सोशिक चेहर्यानी जेव्हा मला वाचायला बसवलं.दिसल माझच दुःख, दैन्य ,दारिद्र्य ,वेदनेची परिसीमा ..परंपरेन भोगलेली व्यथा
आता माझ्या समकालीन दुःखाचा कोण विचार करणार. मीच करायला हवा होता पण आणि लिहायला हव होतं पण
मी खोचत राहिलो पुस्तकाच्या पानात लाल, पांढऱ्या चिठोर्या खूण म्हणून एकामागून एक जन्मभर...!
ज्यावर लिहायचं राहून गेलं माझ्या वंशंजासाठी
- Vikrant


Comments
Post a Comment