आता भोगा फळ - स्वप्नीलची आत्महत्या समाजात वाढीस लागलेल्या आत्मकेंद्रित मुल्यव्यवस्थेच फलित
#आता भोगा फळ
आणि स्वप्नीलन आधिकारी झाल्यानंतर #भ्रष्टाचार केला नसता ही माझी #भाबडी अपेक्षा..
जेव्हापासुन हे #स्पर्धापरीक्षेच पेव फुटल तेव्हापासुन मी या मुलांची #मानसिकता जवळुन अनुभवत आलोय. वरवर जरी हे दाखवत असले की , आम्हांला #सरकारी नोकरीतुन समाजाच भलं करायचय ,लोकांना #न्याय द्यायचाय हे ते पण यांचा #अंतस्थ हेतू वेगळाच असतो.पोस्ट काढणे , सरकारी नोकरी मिळाली की चांगल स्थळ येत किंवा प्रेम असेल कुणावर तर त्या बाजुनेही लग्नाचा मार्ग खुला होतो. झाल लग्न करायच नोकरी स्वीकारायची आणि आयुष्यभर 7 व्या वेतनावर ताव मारायचा #भ्रष्टाचार करायचा. याला वरची कमाई हे गोंडस नाव सुद्धा दिलय.मग 5-10 वर्ष इतका #आत्मकेंद्रित विचार करत गेल्यावर कुठुन सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाचा विकास होणार ? आणि जगण्याचं बळतरी कुठुन येणार ? मग ज्या नोकरीच्या अपेक्षेवर स्वप्नांचे बंगले बांधले ते कोसळताना पाहुन दुख होणार . #भ्रमनिरास होणार हे साहजिक आहे.पण या #भावनांना नियंत्रीत करण्याला तर कुठे महत्व दिल गेलय या शिक्षण प्रक्रियेत ? दुसरी गोष्ट अशा लोकांच जगण इतक #संकुचित झालेल असत की दुसर्याच्या #जगण्यात स्व: च्या जगण्याच #प्रतिबिंब हे पाहुच शकत नाहीत.आणि आयुष्याचा खेळ संपवतात. आता या घटनेनंतर अजुन एक मोठा वर्ग तयार होतो .प्रचंड मोठा वर्ग यांच्या मृत्यूकडे सहानुभूतीने बघणारा.. अरेरे वाईट झाल ? सरकार का विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतंय ? वगैरे वगैरे सपक शब्दांनी याच्या दु:खात सहभागी असल्याचा आव आणतात पण याच लोकांना स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्याच्या बाजुने एक #मोठा #मोर्चा काढुन त्यात सहभागी होण्याच #आवाहन केल तर घराला कडी लावुन बसतील.ही यांची #संवेदनशीलता. ज्या वर्गाबद्दल संवेदना दाखवत आहात त्या वर्गाबद्दल कृतिशील आणि ठोस असं काही करायचं नाही. मग कसले संवेदनशील बे ? त्यामुळ हा वर्गही #व्यवस्था परिवर्तन करू शकत नाही वा हे #चित्र बदलु शकत नाही.बर मला जास्त राग येतो पोस्ट स्पर्धापरीक्षा वाल्यांचा, उमेदवारीत असतात तेव्हा अरेरेरे काय संवेदनशीलता दाखवतात,प्रत्येक प्रश्नावर पोटतिडकीने किमान बोलल्याचं दाखवतात पण जेव्हा नोकरी मिळते तेव्हा हे सगळ कुठ गळुन पडत काय माहित? आणि हळुहळु आधिकाराचा माज अंगी येतो ,7व्या वेतनाची मुजोरी अंगात भिनते, खिशात पैसा खुळखुळायला लागतो.मग शेती खरेदी कर, वाहन खरेदी,सोन नाण देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालत राहतात.आणि काही वर्षापुर्वी ज्या वर्गातुन,वस्तीतुन,खेड्यातुन वर आला त्याच ठिकाणची माणस साध काम घेवुन गेली तर त्यांना बिनदिक्कत पैशाची मागणी करतात.या #कम्युनिटीचा तर मी दररोज अनुभव घेतो आहे. एक छोटस उदाहरण देतो, एका पोलिस स्टेशनची महिला psi ज्या एरियात तिचा जन्म झाला वाढला.तिथच तिच पोस्टिंग मिळाल.. गल्लीतल्या लोकांनी हारतुर आणले सत्कार केला. काही दिवस उलटले. त्या भागातली गुंडागर्दी कमी झाली आणि या महिला पोलिस आधिकार्याच्या भावाची गुंडागर्दी वाढली. दरम्यान तिच्या भावाने एका मुलीची हैरेशमेंट केली आणि तक्रार घेवुन ती मुलगी माझ्याकडं आली. सविस्तर वृत्तांत कथन केला. मी तात्काळ एक अर्ज तयार करून तिच्याच गाडीवर पोलिस स्टेशन गाठल. त्या ठाण्याचे मुख्य pi आजारी असल्याने सगळा चार्ज या बाईकडेच होता. तिच्याच भावाची तक्रार म्हणल्यावर ठाणे अंमलदारही अर्ज घ्यायला टाळाटाळ करायला लागला. मग आल्या आधिकारी बाई ईतरांप्रमाणे मला त्या मुलीला दमदाटी करायला पाहिली. मी शांतपणानी व्यक्त होत माझ्या मतावर ठाम राहिलो. इथ अर्ज घेणार नसाल तर आम्ही पोलिस अधीक्षकांकड जावु म्हणलं.... पुढ जावुन त्या मुलीला न्याय मिळाला ही बाब अलाहीदा.यानंतरही अनेकदा ती बाई कितीतरी प्रकरणात लाच घेत असायची. पुरावे गोळा करून #स्टिंग #ऑपरेशन करणार होतो .
पण माग दुसरेच काम लागले असो.या उदाहरणावरून मला हे सांगायचय की ज्या परिस्थितीतुन ती वर आली त्या परिस्थितीच भान त्या बाईला राहिल नाही. आणि 99 % आधिकारी कर्मचार्यांच हे असच असत. आता दिवंगत स्वप्नील लोणकर यांच्या मुद्यावर येवु " भाऊ, आत्महत्येपुर्वी जर तु मला येवुन भेटला असता न तर मृत म्हणुन फोटो येण्याऐवजी विद्यार्थी नेता म्हणुन तुझे फोटो छापुन आले असते. इतरही स्पर्धा परीक्षा वीराना माझं जाहीर आवाहन आहे. निराश होवु नका मला भेटा तुम्हांला एक जबरदस्त #Strategy तयार करून देतो. संवैधानिक मार्गाने एक व्यापक लढा उभारा सरकारविरोधात. पण मला खात्री आहे कुणीही नाही येणार कारण आंदोलन केलं तर सगळ्याच भल होईल पण पुढाकार घेणार्याचं नुकसान . मागे मार्च महिन्यात परीक्षा पुढ ढकलली म्हणुन भावनेच्या भरात विद्यार्थी रस्त्यावर आले. पण तो एक #इमोशनल फ्लो होता याला आंदोलन म्हणता नाही येणार. बर त्या आंदोलनात माझी परीक्षा रद्द झाली हा #आक्रोश होता हजारो विद्यार्थी #बरबाद झाले ही #तळमळ नाही. आदर्श आंदोलन दिल्लीतील शेतकर्यांच म्हणता येईल. आज कितीतरी महीने होत आहेत शेतकरी हटायला तयार नाहीत. ही #उत्कटता पाहिजे. पण तुम्ही तुमच्या परिवेशाशी प्रामाणिक राहणार नाही तोवर हे शक्य नाही. तुम्ही तुमच्या लोकांशी बेईमानी कराल तर #मृत्युच तुमच्या #स्वागताला हार घेवुन उभा असणार. हा सगळा प्रश्न मानसिकतेचा आहे मुल्यव्यवस्थेचा आहे. कालपासुन या घटनेवर उमटणार्या विविध प्रतिक्रिया ऐकत होतो पाहत होतो एका आधिकार्याने अत्यंत अजब प्रतिक्रिया दिली . म्हणे सरकारी नोकरीत पगारी कमी आहेत आणि कामाचा ताण जास्त 😂😂 मी़ म्हणल 7 वा वेतन आयोग
कमी पडतोय का सर? हे असे उंटावरून शेळ्या हाकणारे पण महाभाग आहेत समाजात असो.
कमी पडतोय का सर? हे असे उंटावरून शेळ्या हाकणारे पण महाभाग आहेत समाजात असो.
स्वप्नीलभाऊ तु लढला असतात तर मला आनंद वाटला असता, पण प्रामाणिकपणे सांगतो या क्षणी तुझ्याबद्दल मला कोणतीही संवेदना नाही.
- Vikrant Shanke


very nice Analysis and Critics Vikrant
ReplyDeleteThank you sir
Delete