महामारी रोखण्यात जागतिक नेत्यांना आलेल अपयश,युवाल नोहा हरारी यांचा इशारा आणि आपण
#महामारी रोखण्यात जागतिक #नेत्यांना आलेल अपयश, #नोव्हाल हरारी यांचा इशारा आणि #आपण
#युवाल नोहा हरारी सर्वांना माहितच आहेत. सेपियन्स, होने डेयस, 21 लेसन्स फॉर द 21 सेंच्युरी या पुस्तकांचे लेखक व जागतिक कीर्तीचे #इतिहासतज्ञ, विचारवंत असा त्यांचा प्रवास आहे. या हरारींचा 21 फेब्रु 2021 रोजी अमेरिकेच्या #फायनांसियल #टाईम्स साठी लिहिलेला Lessons from the Year of Covid हा लेख माझ्या वाचनात आला. #द #वायर मराठी ने याचा #अनुवादित भाग प्रकाशित केला आहे. तुम्ही तो ही वाचु शकता तर या लेखात हरारी यांनी जगभरातील देशांची कोविड रोगाची परिस्थिती मांडली आहे. अठराव्या शतकातील साथरोगाची आताच्या कोविड रोगाशी तुलना केलीय व संक्षेपाने हे दाखवुन दिलय की आपण एक मानवजात म्हणुन अश्या रोगांना ओळखण्यात ,त्यांचा प्रचार प्रसार रोखण्यात व कमीत कमी आर्थिक नुकसान झेलत रोगाला थोपवण्यास सक्षम आहोत पण तरीही म्हणाव्या त्या प्रमाणात या कोविड साथीत हे शक्य झाल नाही. का ? तर या प्रक्रियेस हरारी जगभरातील नेत्यांना दोषी ठरवतात.हरारी यांच म्हणण अस आहे की , लोकांना रिलीफ देण्याऐवजी जगभरातील नेतेमंडळी एकमेकांवर कुरघोडी कऱण्यात व आरोप - प्रत्यारोप करण्यात मश्गुल होते व आहेत. या लोकांनी महामारीच्या काळात आपल वर्तन जबाबदारीच ठेवल असत तर जगभरातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले असते.पण दुर्दैवाने यांच्या अजेंड्यासमोर हा कार्यक्रम नव्हताच. हे असं असलं तरी हरारी जगभरातील संशोधक , वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांच कौतुक करतात.या लोकांनी एकमेकांना श्वाश्वत ज्ञानाची आदान-प्रदान करत मानवजातीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले ते अधोरेखीत करतात. त्याचबरोबर कोविड महामारीतही अमेरिकासारख्या देशातील शेतीउद्योगांना त्यांच्या सक्षम तंत्रद्यानाधारित व्यवस्थेमुळे जास्त फटका बसला नाही. तसेच 18 व्या शतकाच्या तुलनेत आपण दोन जगात जगत असल्याच अचुक विश्लेषण हरारी यांनी मांडल आहे. एक आभासी जग (इटरनेटचं) व दुसर प्रत्यक्षातील भौतिक जग.आभासी जगामुळे व पावरफुल इंटरनेट सुविधामुळे या महामारीत जगाला जागतिक व्यापारात जास्त तोटा सहन करावा लागला नाही. तसेच Work from Home सारख्या पद्धतीमुळे आपण बर्याच प्रमाणात कोविडला आळा घालु शकलो मात्र खर्या अर्थाने मानवी संस्कृती जपण्याचं काम मात्र मजूर ,ड्रायव्हर, सफाई कर्मचारी ,नर्सेस तळागाळा मध्ये राहून काम करणाऱ्या लोकांनी केलं. कारण भौतिक संपर्काशिवाय मानव संस्कृती नाही.पण एकीकडे सामान्य लोकांचा संघर्ष चालु असताना जगभरातील नेत्यांना यांच काहीच सोयरसुतक नव्हत .या सगळ्या समकालात हरारी भविष्यातील भीतीच्या दोन शक्यता व्यक्त करतात. हरारींच्या मते पहिली भीती ही आहे की , जर सायबर हल्ल्यामुळे किंवा काही कारणामुळे इंटरनेट व्यवस्था कौलैप्स झाली तर काय होणार ? आणि ज्या पद्धतीने जगभरातील सरकारी यंत्रणा विविध कारणाखाली नागरिकांची माहिती (Data ) गोळा करत आहेत यातुन त्या त्या देशातील सरकारे व सरकार प्रमुखांच्या हुकुमशाहीला साजेशी व्यवस्था निर्माण होत आहे. याला नागरिकांनी पर्याय उभा केला पाहिजे .जर सरकारांना प्रत्येक नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण शक्य होत असेल तर नागरिकांनाही सरकार व सरकाराच्या धोरणावरही लक्ष ठेवण सहज शक्य आहे.युवाल नोहा हरारी व जगभरातील अनेक विचारवंतांनी अलीकडच्या काळात ही भीती सातत्याने व्यक्त केली आहे. सरकारांनी विविध कारणाखाली आपल्याच देशातील नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्यावर नजर ठेवणे हा प्रकार वाढीस लागला आहे.याकडे हरारी आपल लक्ष वेधुन घेतात.
एकुणच हरारी जगभरातील व्यापक परिस्थितीचा संदर्भ देत आपल्याला सावध करत आहेत. जगभरातील नेत्यांना कोविडची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश हे भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी आहे पण दुर्दैवाने यांच कारण नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी हतबलता नसुन आपल्याच लोकांना वाचवण्याप्रती असणारी उदासीन राजकीय इच्छाशक्ती व मानवतावादी नेतृत्वाचा अभाव असणार आहे. हरारी शेवटी म्हणतात की, रोगप्रसाराबद्दल आपल असच बेजबाबदार वर्तन राहिल तर ऑफ्रिकेच्या एखाद्या छोट्याश्या खेड्यात निर्माण झालेला विषाणु हा तेथील गरीब शेतकर्याला बाधित करून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील बड्या आसामीनाही बाधित करू शकतो. म्हणजे कुठेतरी विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेतुन आपण या प्रकाराकड पाहिल पाहिजे अन्यथा बाजुच्याशी माझ काही देण घेण नाही या अविर्भावात आपण जगत राहिलो तर एक दिवस सगळेच संपुन जावु. हरारी यांना बोधकपणे हेच सुचित करायच आहे.
#हरारी यांच #विश्लेषण भारताच्या संदर्भात
हरारी यांनी वरील लेखात विशेष प्रकारे भारताच्या #संदर्भात कुठलेही भाष्य केलं नाही मात्र आपण यांच्या #विचारांची पट्टी लावुन भारताला नक्कीच मोजु शकतो. तीन मुद्यामध्ये हरारीने कोविड काळातील जगाच विश्लेषण केल आहे. भारताबाबतही आपण तसच करूया. पहिला मुद्दा हरारी यांनी शेकीपुरक आधुनिक तंत्रद्यानामुळे जगातील विकसीत देशाच खासकरून अमेरिकेसारख्या देशाच विशेष अस नुकसान झाल नसल्याच मत नोंदवलय. भारतातबाबत परिस्थिती नेमक्या प्रमाणात उलटी आहे.गेली 75 वर्ष झाल विकनशील देशाच्या यादीत घर करून बसलेल्या भारतात मनुष्यबळाशिवाय पर्याय नाही. आणि भविष्यात जर सातत्याने अशा आपत्ती येत राहिल्या तर आपण केव्हाचेच अविकसीत देशाच्या यादीत जावुन बसु. दुसरा मुद्दा इंटरनेटचा जर मोठा सायबर हल्ला देशातील आंतरजाल व्यवस्थेवर झाला तर त्यातुन सावरण्याच्या खुपच कमी शक्यता देशातील वशिलेबाज सायबर तद्यांनी ठेवल्या आहेत . तिसरा मुद्दा सरकाराकडुन नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्यावर नजर ठेवण्याचा, आता ही गोष्ट समजुन सांगायलाच अजुन 10-20 वर्ष लागतील तोवर मोदी सारख्या #हुकुमशहांनी या क्षेत्रात मोठी उडी मारलेली असेल. एकुणच युवाल नोहा हरारी या विचारवंताची हाक समग्र #मानवजात म्हणुन आपण वेळीच ऐकली पाहिजे अथवा स्वतःच्याच पायावर मृत्युची कुर्हाड मारून घेतल्यासारख हे होईल.
- विक्रांत शंके
दुरभाष - 9890766640
( लेखक महाराष्ट्र जीवन न्युज समूहात कार्यकारी संपादक पदावर कार्यरत आहेत)


Comments
Post a Comment