महाराष्ट्र जीवन न्यूज चं कम्युनिटी ट्रान्समिशन

#चिपळुण दौरा महाराष्ट्र जीवन न्युजच #Community Transmission आणि बरंच काही.

#रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली भागात प्रचंड पूर अश्या बातम्या प्रसारमाध्यमांवर झळकायला लागल्या होत्या. तेव्हाच आम्ही ठरवल की महाराष्ट्र जीवन न्यूज च्या वतीने  पुरग्रस्त भागाचा दौरा करायचा. आता सगळ्याच पुरग्रस्त भागाचा दौरा करणं हे सध्या तरी चैनलला #आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं मग सरतेशेवटी चिपळुण निवडलं . मला चिपळुणपर्यंत पोचविण्यात लातूरची रिक्षाचालक संघटना एकता रिक्षा युनियनचं खुप मोठ योगदान आहे. मग 30 जुलै ते
1 ऑगस्ट असा हा #दोन #दिवशीय दौरा ठरला व मी त्या ठिकाणी जावुन वार्तांकन करून आलो.या वार्तांकनाचे अनुभव व मी अनुभवलेली #पुरग्रस्त परिस्थिती याबद्दल सविस्तर लिहीणार आहे.या ठिकाणी मला महाराष्ट्र जीवन न्यूज च्या कम्युनिटी ट्रान्समिशन बद्दल बोलायचं आहे. ही टर्म प्रथम #कोविड साथीत लोकप्रिय झाली.याचा अर्थ असा सामुदायिक प्रसार असा होतो. बरेचदा तुमच्या लक्षातही न येता तुम्ही कोविड बाधित होता, अगदी #कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात न येताही. म्हणजेच तुम्हांला अपेक्षित नसतानाही तुमच्यावर एखादी गोष्ट #प्रभाव टाकते.पसरते .हेच आहे Community Transmission.  चैनलची सुरूवात केल्यापासुन #सकारात्मक अर्थाने आम्ही महाराष्ट्र जीवन न्यूज चे कम्युनिटी ट्रान्समिशन कसे होईल याकडेच लक्ष पुरवले आहे. आणि हे देशातील पत्रकारितेला नवं वळण देण्यासाठी खुप गरजेचं आहे.कारण जिथं खरी गरज आहे अशा ठिकाणी भारतीय मिडीया पोचला आहे असं किमान मलातरी वाटत नाही. चिपळुण दौर्यावरही हाच अनुभव आला. तेथील मुरादापूर, भौईवाडा, सतीसावरगाव, इ. दुर्गम भागात वार्तांकन करत असताना  स्वतः नागरिकांनी आमच्यापर्यंत मिडीया कसा आला?  म्हणत आश्चर्य व्यक्त केल. हा पुरावा आहे. खरा सामान्य माणुस त्याच्या वेदनेसह अजुनही #माध्यमांच्या कैमेर्यासमोर आलेला नाही. आणि गंमत अशी की कधी कधी त्यालाही त्याची गरज वाटत नाही. काय होईल म्हणतात आम्ही #प्रतिक्रिया दिली तर 😁 अरे बाबांनो, तुम्ही माध्यमांसमोर बोललात तर परिस्थितीत नक्की बदल होईल, शासनाला जाग येईल पर्यायाने लोकशाही बळकट होईल. पण जनसामान्यांची  #पत्रकारितेबद्दल असलेली ही धारणा हल्लीच्या मिडीयाने शिल्लक ठेवलीय कुठे?  ज्याला त्याला हेच वाटतं की, हे पत्रकार, चैनल्स व्यवस्थेचे बटीक आहेत, आपल्या सोयीची भाषा बोलतात, नसलेल्या गोष्टींच भांडवल करतात किंवा यांची इतकी क्षमता नाही की हे व्यवस्थेत बदल करू शकतील. मग याच #पुर्वग्रहातुन लोक आमच्यासारख्या मिडीया हाऊसेसकडे बघतात तेव्हा मात्र या वर्गाची कीव येते यासाठी चैनलचं Community Transmission होणं गरजेच अाहे. लोकांना नकळत चैनलचा Impact त्यांच्यावर पडला पाहिजे. आमच्या पत्रकारितेचा परिप्रेक्ष्य समजला पाहिजे. शेवटी लोकशाहीत #लोकहिताच्याच व लोकपाठिब्यांच्याच संस्था, रचना टिकतात अन्यथा संपुन जातात. लोकपाठिंबा मग तुम्ही तो कसाही मिळविलेला असो अगदी लोकांची दिशाभुल करूनही. पण चुकीच्या मार्गाने चाललात तर अल्पकाळासाठीच लोक तुमच्या मागे येतात हे ही तितकच खरं!  तर यासाठी आमची टीम अहोरात्र काम करत आहे,  आता ही पोस्ट वाचल्यावर महाराष्ट्र जीवन न्यूज नकळतपणे तुमच्या ओळखीचं झालंय  की नाही हे तपासा व मलाही सांगा.

#Community #transmission
#Mjivannews #democrasy

Comments