दीर्घ संवादाच्या मुद्याभोवती
तु म्हणतेस
माझ्याशी गुजगोष्टी रोज कर
काही हरकत नाही.
पण परावलंबीत्व वाढेल म्हणुन नको वाटतं ..
रोज बोलणं म्हणजे काय असतं गं ?
सामान्य संदर्भच रोज उगाळत बसणं ..
त्यापेक्षा बराय असंच..
कधीतरी Hii टाकायचं..,
चटकन रिप्लाय आला तर बरं .नाहीतर
खट - खट टाईप करून आपल्या भावनांचा आवेग रिता करायचा.
भरती ओहोटीच्या लाटेसारखा .
या संवादी परिवेशात तुला जाणवतं का ?
जोरदारपणे घोंघावणार्या वार्याला पाठीवर घेवुन आपल्या रौद्र रूपात व्यक्त होणारा समुद्र भासतो मी तेव्हा ...
आणि तु मात्र त्या सगळ्या लाटा थोपविणारा किनारा....
शांत , निखळ, नितळ
चंद्रात शीतल प्रतिबिंब सावरत समुद्राला आपल्यामध्ये रिचविणारा ..
दीर्घ अंतरानी होणार्या या संवादात
हे शब्दसामर्थ्य कुठुन येत
हा ही एक अ-उच्चारित प्रश्न असतो तुझा.
माझ्या कवितेची प्रेरणा मात्र तुच म्हणल्यावर तुला खरंही वाटत नाही.
"Woman is a source if insipiration" हे तुला कधी कळणार ते कळो ..
शेवटी मुद्दा बोलण्याचा आहे..
दीर्घ बोलण्याचा आणि रोज बोलण्याचा.
रिअलाईज कर.. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर अनुभवाला घेवुन आपला संवादच सुरू आहे
कोणत्याही माध्यमाविना.. निरंतर
Vikrant Shanke


Super boss
ReplyDelete