नाताळच्या आठवणी आणि नाचत येणारा सांता
नाताळच्या आठवणी आणि नाचत येणारा सॉंता
आज नाताळ (ख्रिसमस) जगभर साजरा केला जात आहे. खरंतर हा सण ख्रिश्चन धर्मियांचा कितीतरी मोठा सण .प्रभु येशुचा जन्मदिवस. माझेही या सणाशी काही खास भाव-बंध (Emotions) जोडले गेले आहेत . याला कारण म्हणजे लहानपणी मी ज्या लातूर शहराच्या पुर्व भागात रहायचो. तिथे राहणारे ख्रिश्चन लोक. या भागात अल्पसंख्याक परिवर्तीत (Converted) खिश्चन लोक आहेत. तर नाताळ दिवशी व्हायचं असं की, खरंतर आम्ही वर्षभर नाताळ, ईद, दिवाळी अशा सणांची आतुरतेने वाट पहायचो. याचं कारण शाळेला मिळणार्या सुट्ट्या. 25 डिसें म्हणजे तर पर्मनंट सुट्टी. आणि 24 डिसें च्या मध्यरात्री कैरोल्स म्हणत वाजत गाजत आमच्या गल्लीत Santa 🎅 यायचा. ढम ढम ढम... आम्हांला हे माहित असायचं म्हणुन त्या दिवशी आम्ही झोपायचं फक्त नाटक करायचो. आणि एकदा ढोलचा व गीतांचा आवाज कानावरती आला की आई बाबांनी कितीही अडवलं तरी कपाऊंड वॉलवरून इकडुन तिकडुन उड्या मारून त्या समुहात जावुन सामील व्हायचं. मग ही वरात आमच्या वस्तीच्या बाजुला असलेल्या स्लम ऐरियात जायची. हा सैंटाही भन्नाटच असायचा. खरा सैन्टा गुपचुप येतो म्हणे. पण हा सैंटा वाजत गाजत जावुन ते रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेले गिफ्ट त्या लहान मुलांचा हातात द्यायचा व नाचायचा. हा रैपर केलेल्या कागदात, बॉक्समध्ये काय होतं हे मात्र शेवटपर्यंत आम्हांला समजलं नाही. हा सोहळा झाला की, दुसर्या दिवशी चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचं भरगच्च आयोजन असायचं. आमच्या भागात दोन्ही चर्च आहेत. कैथलिक आणि प्रॉटेस्टंटही. मला कैथलिक चर्चमध्ये जायला आवडायचं. आजही कधी कधी जातो मी. त्या ठिकाणाचं मला प्रचंड आकर्षण होत. ख्रिसमसच्या रविवारी सकाळच्या प्रेयरला आम्ही हजेरी लावायचो. त्यानंतर छान छान पदार्थही खायला मिळायचे. इतर मुलं धमाल मौज मस्ती करायची. पण मी मात्र कधी त्यात रमलो नाही. मला प्रचंड कुतुहल होतं ते ख्रिश्चनांच्या संस्कृती बद्दल, फादरच्या कृतीमधुन त्यांच्या धारणा समजुन घेण्याचा प्रयत्न मी करत असे. मला आजही आठवत, कृपासदन कॉन्वेंट स्कुलकडे जाताना डाव्या बाजुला वळलं की ते चर्च आहे. अत्यंत रमणीय आणि शांत परिसर. चर्चच्या प्रवेशद्वारातच मेरी मदरचा सुबक असा पुतळा आणि मग चर्च. चर्ची वास्तु भव्य आणि शुभ्र रंगात रंगवलेली कमिटेड वास्तु वाटायची. आत गेलं की इटालियन वुडवर्क असलेले लाकडी बाक खुप मोठा प्रिमायसेस व मग येशु खिस्ताची क्रुसावर लटकवलेल्या मुद्रेतली मुर्ती. भितींवर विंचीत " द लास्ट सपर " हे चित्र चांगलेलं व सोबतच बायबल मधील घटनांची अनेक तैलचित्रे .आत जाता जाता व गेल्यावरही माणुस अंतर्मुख व्हावा. असं वातावरण. मी खुपदा तिथं जावुन अंतर्मुख झालोय. जेव्हा येशु खिस्ताचं चरित्र वाचलो तेव्हा तर ते दृश्य आठवुन खुपदा रडलो सुद्धा.
कधीही मी खुप उदास झालो की हमखास माझी पावलं चर्चकडे वळत असत. रविवार शिवाय ते उघडत नसतील मात्र तरीही ते आजुबाजुचं वातावरणही मी फील करायचो. तिथल्या बाहेरच्या बाकावर बसायचो . मेरी मदरचा पुतळा न्याहाळायचो. हे 5-6 वी पर्यंतच होतं. पुढे 8-9 वी च्या वर्गात असताना थोड्या भाव जाणीवा प्रगल्भ व्हायला लागल्या आणि येशु ख्रिस्ताच्या मुर्तीऐवजी लाल,
गुलाबी ,फ्रॉक घालुन प्रेयरला येणार्या मुली माझं लक्ष वेधु लागल्या. एक दोन वेळा असं झालं.. त्या ऐटीत यायच्या आणि मी मात्र साधा शर्ट पैंट घालुन जायचो. मग दोन रविवार जावु दिले.व तिसर्या रविवारी मीही थ्री पीस सुट घालुन गेलो. आता मीही सगळ्यांच Center of Attraction बनलो होतो. याचा मला खुप आनंद झाला. समाधान वाटलं. यानंतर हे सगळं मागं पडल गेलं. बाकी सिंड्रेलाचे बुट घालुन मिरवणार्या त्या मुली मला इंग्रजी साहित्य वाचताना त्यातील उद्धृत मुलींच्या character Imagination साठी खुपच कामाला आल्या. जादुई दिवस होते ते. हळुहळु हे सगळं माग पडत गेलं. मी ही चर्चला जाणं सोडलं. मात्र खिश्चन धर्मपरंपरा व प्रभु येशुनी माझी पाठ सोडली नाही किंवा असं म्हणुया मी त्यांना सतत भेटत गेलो. पुढे माझा वाचन प्रवास सुरू झाला. व ख्रिश्चन धर्माचा, जगाचा इतिहास वाचताना मला नाताळमधले माझे बालपणीचे हे सगळे दिवस सामोरे आले. मी फार पुर्वी बायबलही वाचलं. त्यातील न्यु टेस्टामेंट ओल्ड टेस्टामेंट मधील मत्तई सांगायचो. अभ्यासकांच्या मत्ते बायबल हे एक पुस्तक नाही.
तर अनेक पुस्तकांच संकलन आहे. आणि बायबल मध्ये संमिलित आशय अशा काळात तयार निर्माण झाला. ज्यामध्ये लेखकांच्या राहणीमानात - राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिवेशात प्रचंड प्रमाणात भिन्नता होती.
यात भटक्यांचे अस्तित्व दर्शवणारा आशय प्रतीत झाला आहे., त्याचबरोबर प्रस्थापित राजेशाही आणि मंदिर पंथ असलेल्या लोकांचे ग्रंथ, निर्वासित ग्रंथ, परकीय राज्यकर्त्यांच्या भयंकर छळातून जन्मलेले ग्रंथ, न्यायालयीन ग्रंथ, भटक्या करिष्माई प्रचारकांचे ग्रंथ, स्वत: ला महत्व देणार्या लोकांचे ग्रंथ व त्यांचा आशय समाविष्ट आहे.यात अाधुनिक हेलेनिस्टिक लेखकांच्यांही विचाराची हवा मिसळली आहे. हा एक प्रदीर्घ कालखंड आहे ज्यामध्ये होमर, प्लेटो, अॅरिस्टॉटल, थ्युसीडाइड्स, सोफोक्लीस, सीझर, सिसेरो आणि कॅटुलस यांच्या कार्यांचाही समावेश आहे. हा असा काळ आहे ज्यामध्ये अॅसिरियन साम्राज्य (12 वे ते 7 वे शतक) आणि पर्शियन साम्राज्य (6वे ते 4वे शतक), अलेक्झांडरच्या मोहिमा (336-326), रोमचा उदय आणि त्याच्या अधिपत्याचा उदय आणि त्याच्या पतनाचा काळ दिसून येतो. भूमध्य सागरीय (चौथ्या शतकातील प्रिन्सिपेटची स्थापना , 27 बीसी, जेरुसलेम मंदिराचा नाश (70 CE), आणि रोमन राजवटीचा स्कॉटलंडच्या काही भागांमध्ये विस्तार (84 CE). इ. काळाचे वर्णनही यात येते. हे सगळं बायबल वाचलं व त्यातील घटनांच विश्लेषण करून पाहिलं तर लक्षात येतं. हा वाचनाचा आणि चिंतनाचा विषय झाला.
मला तुम्हांला हे सांगायचय की, आज नाताळ बद्दल सगळं काही वाचताना जरी मजा येत असली तर लहानपणी ढम - ढम वाजवत घरासमोरून जाणार्या सांताक्लॉजने जो आनंद दिला कदाचित तो आनंद आज कुणीच देवु शकणार नाही.
©️ Vikrant Shanke
9890766640


Comments
Post a Comment