सीता रामम मुवी रिव्यु
खुसरो #पाती प्रेम की #बिरला बांचे कोय!
वेद, कुरआन, पोथी पढ़े, #प्रेम बिना का होय!!
खुप दिवसांनी मनाला स्पर्शुन जाणारं कथानक असणारी फिल्म पहायला मिळाली. सीतारामम रिलीज झाल्यापासुन समाजमाध्यमांवर मी याबद्दल भरभरून लिहीलेलं वाचत होतो. आणि एकदाचा मुवी पाहिलाच . कदाचित अजुन मुवी थियेटर ला आहे त्यामुळे स्पॉयलर टाळुनच सगळं लिहायचा प्रयत्न करतो.
सिनेमाच्या सुरूवातीलाच 1964 चा पाकव्याप्त काश्मीर दाखवलं आहे. इथे एक अतिरेकी संघटना त्यांचे काही 18-19 वर्षांचे तरूण प्यादे काश्मीर मध्ये घुसवणार असतात यासाठी त्यांना पाकिस्तान आर्मी मदत करत असते. यथावकाश ते काश्मीरमध्ये घुसतात व सर्वसामान्य मुस्लीम काश्मीसारखे राहतात. दरम्यान तुम्हांला दिग्दर्शक लेफ्टिनेंट रामची ओळख करून देतो. फौजी राम म्हणल्यावर मैं हु ना मधला शाहरूख आठवला असेल पण दुलकर सलमानने हा राम अगदी हसता खेळता आणि भुमिकेला साजेसा असा साकारला आहेे. होत असं की काश्मीर येथील आगरताळा हिंदुच पंडिताच गाव जाळण्यासाठी काही मुस्लिम गावकरी येतात ज्यांना मुजाहिदीन सारख्या संघटनांनी भडकवलेलं असत. लेफ्टिनेंट राम तिथ जातो व गावातील सगळ्या लोकांना वाचवतो .इथुन खर्या चित्रपटाची सुरूवात होते. या त्याच्या कामामुळं रेडियोवर वर त्याची मुलाखत होते. ज्यात तो अनाथ असल्याचं सांगतो. तेव्हा देशभरातुन त्याच्यावर पत्राचा पाऊस पडतो. त्या सर्वात एक वेगळं पत्र असत् सीतामहालक्षीचं जी स्वतःला रामची स्वयंघोषित पत्नी म्हणुन ठासुन सांगत असते. रामलाही याचं खुप कुतुहल वाटतं आणि तो तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो . मग ते दोघे भेटतात का? सीतामहालक्ष्मी आणि प्रिंसेस नुरजहां ही दोन्ही व्यक्तीमत्व एकच की वेगळे? रामच पुढं काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हांला चित्रपटच पहावा लागेल .
बाकी दिग्दर्शकांनी 60-70-80 च्या दशकातला मोठा काळ उभा केला आहे. प्रत्येक फ्रेम अर्थपूर्ण वाटते, प्रकाशयोजनाही अगदी साजेशीच आहे . कलाकारांनी जीव ओतुन काम केलंय. कथानक सादरीकरणामध्ये धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे पण तुम्हांला विसंगती कुठच आढळुन येत नाही. चित्रपट पाहतान् सीता आणि राम यांच हळुवार फुलत जाणारं प्रेम आधि हलक फुलकं भासत पण उत्तरोत्तर त्यातली उत्कटता आणि निस्सीम ओढ प्रेक्षकांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही . कथाकाराने या कथेतुन नैतिकता की प्रेम? त्याग विरूद्ध शत्रुसमर्पण ,सुखासीन आयुष्य यामधली निवड असा पेच टाकुन ठेवला आहे. त्यामुळ तुम्ही इथं कुणालाच व्हिलन ठरवु शकत नाहीत. खुप दिवसांनी इतकी सशक्त अभिव्यक्ती पहायला मिळाली. तुम्हीही पहाच


Comments
Post a Comment