मिस्टर गांधी
मिस्टर गांधी
मिस्टर गांधी तुमचं एकदिवशीय उदात्तीकरण करून काही नाही होणार हे मला माहितीय .
आम्ही प्रयत्न करत असतो दररोज तुम्हांला आचरणात आणण्याचा.
छोट्या छोट्या कृतीतुन, परिवर्तनाच्या विचारातुन अहिंसक क्रांतीच्या स्वप्नातुन.
रांगेतील शेवटचा माणसाचा उद्धार हे तुमचं ध्येय होत , पृथ्वी माणसाची गरज भागवेल पण हाव मिटवु शकणार नाही हे तुम्ही चांगले जाणुन होता.
आज तुमच्या विचारापासुन हा समाज कोसो दूर वेगानं जात असल्याचं चित्र आहे, भयंकर विचित्र आहे .
भांडवली, धर्मांध जातीय आक्रमण तीव्र होत आहेत, तुमच्या स्वप्नातला सामान्य माणुस विरघळत चाललाय..
पण अस्वस्थ होवु नकात मि.गांधी तुमच्या विचारांचे शिलेदार जागोजागी खिंड लढवत आहेत.
कुणी समाजसेवक बनुन समाजाची सेवा करतोय, तर कुणी समाजाला संविधान शिकवतोय.
निर्भय बनोचा नारा घेवुन एकाने अंधश्रद्धा आणि वुबाबाजीविरूद्ध जंग जंग पछाडलं, तर तुमच्या हत्यार्याच्या जातीतील लोकांनीच त्याला तुमच्याकडंच पाठवल.
भारत हा समस्यांचा देश खेड्यात वसला आहे हे तुम्हीच सांगितल ना, तेव्हा याच खेड्यातील लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठीही सर्वजण काम करत आहेत.
काळजी करू नकात मिस्टर गांधी फक्त भेटत रहा आम्हांला, जागोजागी वेळोवेळी, गावच्या कोन्यातुन पुस्तकाच्या पानातुन.
येत रहा रात्री गोड स्वप्न बनुन, आणि द्या थोडी हिंमत आमच्या विकारावर मात करण्याची जमलच तर
करा एखादा मैसेज एका दिवसात गांधी होता येत नाही म्हणुन.....
- Vikrant


Khup chan
ReplyDeleteVery nice.
ReplyDelete