मला दिसलेले Vikrant भय्या
रविवार होता थोडा वेळ जास्त झोपाव म्हटलं.पण झोपुन तर काय भेटणार आहे. जाऊन तर यावं संघटनेच्या बैठकीला तेवढाच वेळ तरी जाईल म्हणालो.संघटनेचे कार्यक्रम हून तून असतात.तरीपण गेलो,तेथे वाट पाहत बसलो होतो,विक्रांत भैया म्हणून कोणीतरी येणार होते,ते आले.त्यांना बघुन त्यापेक्षा त्यांना ऐकुन समजून असं जाणवलं की,विक्रांत सरांच नियोजन,कल्पना, बोलण्याची पद्धत,शब्दांची पकड,ज्ञान,अनुभव, माणूस कसा असावा याची संकल्पना, विद्यार्थी नव्हेच तर प्रत्येक माणसाला काय पाहिजे आणि आपल्याला काय देता येईल याचं उत्तम ज्ञान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं वकृत्व,अजुन एक गोष्ट म्हणजे त्यांचे प्रभावशाली विचार,एका निष्णात नेत्याचे गुण अशा सर्व वैविध्यपूर्ण गोष्टी या माणसात दिसल्या.अशा माणसाचा जर अशा संघटनेला आधार असेल तर थोडापण अडथळा निर्माण होणार नाही.संघटनेचे तत्व,विचार, विक्रांत संरांनी सांगितलेले कार्यक्रम (उदा: विचार पुस्तके वाचन, काव्य मैफिल, वकृत्व कार्यक्रम),विद्यार्थी हित काय केल्यास पुर्णत्वास जाईल याच नियोजन,आजच्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे त्यातून काय देता येईल त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणण, त्यांच्या उत्तम भविष्य कस यशस्वी होईल याकडे लक्ष,एकही विद्यार्थी बेरोजगार होणार नाही याचे ध्येयधोरण, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना एक जागा (platform) उपलब्ध करून देणं अशा या अनेक गोष्टी सरांनी म्हटल्याप्रमाणे जर संघटनेच्या पत्रीकेत असतील तर या संघटना आपोआप गरूडझेप घेईल आणि ही संघटना मजबूत बनेल.या संघटनेला कोणीही हलवु शकणार नाही.आपली संघटना नव्या रुपात येउन आकाशभरारी नक्कीच घेईल.सर्वच जण मिळून आपण संघटनेसाठी झटू आणि संघटना ही विद्यार्थी हितासाठी झटेल.ह्या संघटनेला दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
आणि माझा रविवारचा दिवस माझ्यात आत्मविश्वास भरणारा ठरला,नवेनवे विचारांच्या पैलुची माहिती मिळाली खरेतर हा दिवस माझा हितकारणी गेला.अशीच आपली साथ मिळावी ही विनंती..!
धन्यवाद..! 🙏
मंथन सूर्यवंशी.( लातूर)


Comments
Post a Comment