सायंकाळची कातरवेळ


सायंकाळची कातरवेळ अस्वस्थ करून जाते.
 भेटलेल्या न भेटलेल्या चेहर्यांच्या कितीतरी आठवणी भवताली फेर धरून पिंगा घालायला लागतात..
तेव्हा मी थिजुन जातो, पलंगाला , खुर्चीला , गैलरीच्या रेलिंगला ... 

माणसापासुनच दुर व्हायच तुटायचं 
हे आंदण  माणसालाच का मिळाल असेल ? 
हजार पद्धतीने विचार करतो.

स्तब्ध वार्याच्या साक्षीने बेभान होणार्या माझ्याच विचारांच्या कैदेतुन स्वतःला सोडवण्याचा पोकळ प्रयत्न.

हा प्रयत्न मला अजुन खोल गर्तेत घेवुन जातो श्वेतभावाच्या दलदलीत
वाटतं यार ......!
किती बरं झालं असतं 
जर हीच शांतता निर्मोही असती ,
हजारो आसक्तीने वेढल्या ऐवजी शांततेच्या काठी वसल्यावर
दोन घटकेची सायंकाळ किती जीवघेणी भासते एकट एकट असल्यावर
                     _Vikrant

Comments

  1. काय मस्त शब्धात बांधतोस कविता..खुप छान 👌👌❤

    ReplyDelete

Post a Comment