सर्वसामान्यांतुनच असामान्य नेत्रुत्व घडत याचा वस्तुपाठ म्हणजे जरांगे पाटील
- विक्रांत शंके
मागच्या २० वर्षापासुनचं राज्यातलं राजकारण पाहता .राजकारणात किंवा समाजकारणात ढवळा ढवळ करावी ती केवळ प्रस्थापित मुख्य प्रवाहातील नेत्यांनी , किंवा त्यांच्या पोरांनी किंवा केवळ भरमसाठ पैसे असलेल्यांनीच अशी एक जनसामान्यांची धारणा बनली होती.बर्याच अंशी बनवली गेली होती.आणि मग हळुहळु जनसामान्यांच्या जीवनातुन एखाद्या विचारधारेला धरून संघटित होण्याचा ,सरकारला विरोध करण्याचा भाग विलुप्त होत जाताना दिसुन येत होता.पण याला छेद दिला तो म्हणजे २२ वर्ष मराठा आरक्षणाचा विचार समाजात पेरून आंदोलन उभं करणार्या मनोज जरांगे पाटलांनी.घरून कसलच पाठबळ नाही,भरमसाठ पैसा नाही ,की धडधाकट शरीरयष्टीही नाही.म्हणजे कम्प्लीट अभावग्रस्तता .कुठंतरी एक छोटंस संघटन स्थापन करून सातत्यानं एकाच मागणीचा पाठपुरावा करण ही अतिशय अवघड गोष्ट आहे .पण जरांगे पाटलांनी ते करून दाखवलं.यातुन सर्वसामान्यातुनच असामान्य नेत्रुत्व घडत हा नियम पुन्हा एकदा सिद्ध झाला.
आता या मागच्या कारणांची मीमांसा करूया.
जरांगे पाटलांच आंदोलन राज्यव्यापी होण्यातील महत्वाचा Factor आहे.ती म्हणजे जात.जातव्यवस्थेमुळे भारतात जातीच्या नावावर काही करा ते खपवुन घेतलं जाणार उलट त्याचा उदोऊदो होणार.हे वास्तव आहे.आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तर राज्यातील एका महत्वाच्या व संख्येने मोठ्या असलेल्या ताकदवान समुहाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.
या मागचं दुसरं कारण हे आहे की ,आजपर्यंत मराठा आरक्षणावर निघालेले 52 मोर्चे व गावोगाव झालेली जनजाग्रुती.यात कस आरक्षण महत्वाचं आहे ? त्यामुळे मराठा तरूणांना कस बेकार रहावं लागतं व सुमार बुद्धीमत्ता असलेले ईतर जातीचे खासकरून अनुसुचीत जातीचे (SC) लोक कसं आरक्षणाच्या बळावर आपलं मेरीट सिद्ध करतात वगैरे.ई प्रचार व अपप्रचाराचा समावेश आहे.त्यानंतर आंतरवली सराटी येथे झालेला लाठीचार्ज ही या आंदोलनाला वेग देणारी महत्वाची घटना आहे आणि यामुळेच जरांगे पाटील प्रकाशझोतात आले.त्यानंतर सरकारशी चर्चा , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हातानी उपोषण सोडवणं मग 40 दिवसांचा अल्टीमेटम व परत आमरण उपोषण .या घडामोडी आपल्या सर्वांच्या समोर आहेत.यातुन आपण जरांगे यांच्यातील नेत्रुत्वाचे पैलु नक्कीच शोधु शकतो.जरांगे पाटील हे एका सभेत म्हणाले की ,मी पुस्तक वाचत नाही माणस वाचतो.आणि त्यांनी एका विराट सभेनंतर आपल्या समाजातील अनुयायांना पुढार्यांना गावबंदी हा क्रुतीकार्यक्रमही दिला.ते स्वतः आमरण उपोषणाचं हत्यार उपसतात.ही सगळी गांधीवादी नीती आहे अस मला वाटतं (Gandhian Style of Protest and ledership ) भले जरांगेनी गांधी वाचलेला असो वा नसो पण अनुभवाच्या अंगानी त्यांनी गांधी नक्कीच समजुन घेतला असणार आहे .आता मराठा आक्षण मिळेल का ? कायद्यात अशा आरक्षणाबद्दल काय काय तरतुदी आहेत या बद्दल भरमसाठ लिहीलं गेल आहे तसेत हा निरंतर चर्चेचा विषय होवु शकतो पण भारतासारख्या लोकशाही राज्यात , राजकीय पुढारी एवढे निगरगट्ट झालेले असताना ,त्यांच्या हातात सगळी सत्ता संपत्ती असताना सर्वसामान्यांतुन आज समस्त भांडवली राजकारण्यांना घाम फोडणारं नेत्रुत्व तयार होणं ही लोकशाही राष्ट्रासाठी अतिशय आशादायक बाब आहे.आपण जे म्हणतो कुठे काही होईल पण राजकारणात ,या व्यवस्थेत बदल होणं शक्य नाही तर मनोज जरांगे पाटील या प्रश्नाला एक सणसणीत ऊत्तर आहेत.
" कौन कहेता है आसमान में छेद नही होता ? "
" एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो ! "
आता येणार्या काळात अश्याच प्रकारचं नेत्रुत्व तेही सर्वसामान्यांमधुन संवैधानिक मुल्यांच्या जोपासणीसाठी तसेच नागरी हक्क व मागण्यांसाठी उपोषणाला बसाव व मोठं व्हावं असा आशावाद बाळगायला काहीच हरकत नाही. शेवटी वास्तव अर्थाने लोकशाही जिंदाबाद राहिली पाहिजे हेच खरं
- विक्रांत शंके
( लेखक हे सक्रिय सामाजिक व राजकीय चळवळीतील युवा नेते असुन महाराष्ट्र जीवन न्युज समुहात कार्यकारी संपादक पदावर कार्यरत आहेत )


Correct 💯
ReplyDelete