An eye for an eye makes the whole world bliend

माणुस म्हणुन आपण कुठेतरी थांबणार आहोत की नाही? (Tital) 

राष्ट्रपिता' म्हणुन आपल्या देशात ज्यांना प्रचंड मानल जात व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईननी ज्यांच्याबद्दल हे उद‌गार काढले की, " म. गांधीसारखा माणुस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढया कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. " अशा मोहनदास करमचंद गांधी यानी एक उद्‌गार काढले होते गांधी
 म्हणाले होते की, "लोग हमेशा एक दूसरे से बदला लेने की सोचते है, अगर ऐसाही हुआ और आंख के बदले आंख यही कानुन रहा तो पूरी दुनिया एकदिन अंधी हो जाएगी." आणि आज तेच मोठ्या प्रमाणात घडुन येताना दिसत आहे
 या लिखाणाच्या माध्यमातून आपण आपल्या आजुबाजुचा भवताल ते राज्य देश इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशा देशात होणारे संघर्ष ई. चा धावता आढावा घेणार आहोत. साथींनो हे वर्ष गाजल ते म्हणजे आरक्षण आंदोलन, रशिया युक्रेन युद्ध, आताच ताज इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्ध व राज्यात बनलेल्या खोके सरकारानी या  सगळ्या घटना वरवर जरी असंबंध व सुट्या वाटत असल्या तरी यांना जोडणारा समान धागा हा मानवी मनातून झपाट्याने होणार्या नैतिक मुल्याचा हास आहे. 
सर्वात प्रथम आपण देशात झालेले वेगवेगळे दंगे व मणीपुर हिंसाचार तसेच आरक्षण आंदोलनापासून सुरुवात करुया. देशात दिल्ली, उ.प्र इ. ठिकाणी काही धार्मिक उन्मादी लोकांच्या हातुन हिंदु विरुद्ध मुस्लीम या स्वरुपातील दंगली झाल्या . खरंतर हा संघर्ष गेली 30 वर्षापासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  व भाजपच्या  विध्वंसक लोकांनी आपली राजकीय , सांस्कृतिक वर्चस्वाची पोळी भाजण्यासाठी शिस्तबद्धपणे लोकांच्या मनामनात पेरलेल्या द्वेषाच्या विचाराचा परिपाक आहे .
जसे 18व्या शतकात इंग्रज भारतात आले आणि त्यांनी ज्या  पद्धतीने फोडा आणि राज्य करा. (Divide and Rule Policy )
या धोरणाचा वापर केला अगदी त्याच  पद्धतीने सध्या भारतामध्ये सत्तेत असलेल भाजपचं सरकार व याच पक्षाची मातृसंस्था सांस्कृतिक आघाडी असणारी विना नोंदणीकृत  संघटना RSS नेही याच धोरणाचा अवलंब केलेला आहे. पण थांबा हे फक्त या धोरणाचा अवलंब करून राज्यच करत आहेत का ? तर नाही . हे फक्त राज्य करीत नाहीत तर या देशातील मुलनिवासी · असणारे मुस्लीम, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांकाना समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुस्लीमांच खानपान, आहार-विहार, कपडे घालण्याच्या पद्धती, केशभूषा, शृंगार इ. या सगळ्यांचा कडाडुन विरोध केला जात आहे ज्यातून गोमांस विरोधी चळवळ किंवा शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा घालण्याला बंदीचा इ. धोरणांचा समावेश आहे. दालितासाठी सुद्धा त्यांच वेगळ धोरण नाही.
संघ व भाजप हे दलितांच सरसकट हिंदुकरण करून त्यांना पुन्हा एकदा मनुच्या जोखडाखाली आणू पाहत आहेत व दुसरीकडे संविधानाच्या माध्यमातुन दलितांना मिळणारे  आरक्षण, शिक्षण व संरक्षण यावरही गदा आणत आहेत. देशभरामध्ये आदिवासींच्या जमीनीवर भांडवली प्रकल्प आणु न त्यांनाही विस्थापित करणं सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणजे मणीपुर हिंसाचार घडवला गेला व आजही इशान्य भारताचा तो भुभाग धुमसता ठेवला आहे. आता जाट, पटेल, पाटीदार, मराठा, धनगर किंवा अनुसुचीत जाती
अंतर्गत वर्गीकरण करून आरक्षण द्या ही मागणीही फोडा आणि राज्य करा .
या धोरणाचाच व्यापक भाग आहे. आज वास्तव अर्थाने  देशातील जवळपास सगळेच जातीसमूह विकास व प्रगती कक्षाच्या बाहेर फेकले गेले आहेत. 
याला भांडवलीकरण व जागतिकीकरण तसेच भारतातील सरकारांचेच भांडवली केंद्रित धोरण कारणीभूत असताना मात्र याला कारणीभूत SC, ST व  OBC ना दिलेलं आरक्षण आहे असा प्रोपोगंडा तयार करण्यात आला आहे . यामध्ये आरक्षणामुळे माझ्या समाजाचा विकास होईल ही प्रामाणिक भाबडी भावना बाळगणाऱ्या त्या त्या समाजाचा नेत्याचाही वाटा आहेच. खर तर या सर्वांना आरक्षण हवं आहे ते शिक्षण आणि नोकर्यात पण जर आरक्षण देवुनही सरकारी नोकर्यांची भरतीच होणार नसेल किंवा मेडिकल व इंजिनियरींगच्या सीट्सची संख्याच मर्यादित असेल तर आरक्षण मिळवूनही काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीबरोबर यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरभरती , इ पहिले ते पदवी पर्यंत सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण व खाजगी क्षेत्रातील नोकर्यातही आरक्षण या मागण्या सरकारपुढे गांभीर्याने मांडल्या पाहिजेत. या सगळ्या पार्श्वभुमीवर आपण आतातरी माणूस म्हणुन विचार करणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. कारण हा मामला सगळा नैतिक मुल्याशी निगडीत आहे. आता आपण थोडंस आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या
राजकारणाकडं वळुया.
रशिया युक्रेन युद्ध ,इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध ही सगळी कशाची फळ आहेत ?ज्या दुसऱ्या महायुद्धातून आपण शांततेचा धडा घेतला असं म्हणतो आणि  दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब एकेकांवर वापरून हजारो लाखो निष्पाप लोकांचा बळी घेतो. हे काय आहे? म्हणजे आजही मानवाच्या जीवापेक्षा इथली अस्मिता, प्रतिक ,प्रदेश, इ. गोष्टीच महत्वाच्या वाटतात.हे अखील मानवजात नष्ट होईपर्यंत असच चालणार आहे का ? खरतर मी कुठल्या राष्ट्राची अधिकृत बाजू घेणार नाहीये पण इस्त्रायल बद्दल मला वाईट
वाटतं. अरे म्हणजे ज्या क्रुरकर्मा  हिटलरच्या तावडीतून तुमचे पूर्वज कसेबसे सुटले आणि तुम्हाला पॅलेस्टाईन  या उदार देशाने जागा दिली त्यांच्यावरच आज तुम्ही उलटुन जाता ? सगळ्यात जास्त युद्धाची आणि हिंसाचाराची झळ
सोसलेल्या धर्मसमुहाने तर किमान हिंसाचाराचा मार्ग
अवलंबू नये अस मला वाटत. दुसरी बाजू पाहता  एका हातानी टाळी वाजत नाही. याचा प्रत्यय या ठिकाणी येतो म्हणजे ज्या  पद्धतीने पॅलेस्टाईनमधील हमास सारखे राजकीय दबावगट असतील किंवा सामान्य नागरिक या सर्वांनी मिळुन सर्वात प्रथम एक स्थिर आणि लोकशाही मुल्यवव्यस्था बाळणारं धार्मिक उन्माद व युद्धखोरीपासुन शक्यतो अंतर ठेवणारं सरकार स्थापन केल पाहिजे व आंतरराष्ट्रीय संघाच्या मदतीने व काही उच्च दर्जाच्या जागतिक नेत्यांना मध्यवर्ती घालुन ( दारू पित नसाल तर दारूचा ग्लास उलटा पकडा हे सांगितल्यावर खो खो हसणार्याला नको) इस्त्रायल सोबत शस्त्रसंधी केली पाहिजे.तसेच एखादा दीर्घकालिक शांतता करारही चालु शकतो.आता हे सुचवायला काही फार मोठ्या व उगाचच आव आणुन किचकट बरळणार्या तुपकट छापाच्या आंतरराष्ट्रीय तद्याची गरज नाही.जगात शांतताच प्रस्थापित करायची असेल तर क्रुती करण खुप सोप्पय पण जर अनैतिक मुल्यवस्था मनाशी बाळगुन जातीचा ,वंशाचा,धर्माचा,वर्णाचा,लिंगाचा खोटा अभिमान मिरविण्याची खाज असेल तर जगाला विध्वंसापासुन कुणीही वाचवु शकणार नाही.जगाला आज बुद्ध ,महावीर ,कबीर,मोहम्मद पैगंबर,म.गांधी यांच्या विचारावर तंतोतंत चालण्याची गरज आहे .नाहीतर लक्षात ठेवा An eye for an eye makes the whole world bliend .
                          - विक्रांत शंके

Comments