आजचं देशातलं धार्मिक उन्मादी वातावरण पाहुन भगतसिंगाची आठवण का येवु नये ?

आज देशातलं एकंदर वातावरण बघुन मला भगतसिंगाची खुपच प्रकर्षाने आठवण होत आहे.खरंतर मला प्रश्न पडलाय की कशासाठी आणि का ? हे लोक ईतके उन्मादित  झाले आहेत ? निमित्त काय तर  अयोद्धेमध्ये बहुसंख्य हिंदुचं दैवत असणारे प्रभु श्रीराम यांच मंदिर बांधल जात आहे.ते कधी ना कधी बांधल जाणारचं होतं किंवा बांधल गेेलं नसतं कधी तरी काही विशेष फरक पडला नसता. पण भाजप सारख्या पक्षाला या घटनेचा एक Proper अजेंडा करून सत्तेमध्ये यायचं होतं आणि आता २०२४ ला सुद्धा त्यांना सत्ता टिकवायची आहे. हे साध सरळ सोप गणित आहे.
पण याला बाबराचा ईतिहास आणि त्यातुन सुव्यवस्थितपणे तयार केलेला मुस्लीमद्वेष याची किनार लावली व आज हे उन्माद उफाळला आहे.
या उन्मादाच्या मागे हाच एक मोठा इसेन्स मला तर जाणवतो आहे. जगात अनेक धर्मांच अस्तित्व आहे त्यात हिंदु धर्मही आहे.मी कोणत्याच एका विशिष्ट धर्माचा द्वेष करत नाही.पण ज्या पद्धतीने आज हिंदु धर्माच्या आडुन ईतर धर्माचा द्वेष करायला लावला जात आहे ,तेव्हा हे सगळे धर्मच मला नाकारावेशे वाटतात आणि भगतसिंगाची मग प्रकर्षाने आठवण होते.भगतसिंगानी एक पुस्तक लिहीलंय मी नास्तिक का आहे ? त्यात त्यांनी हे नमुद केलंय की भित्री माणस ही धार्मिक असतात , कुठल्याही काल्पनिक आधाराशिवाय स्वत:च जगण पुढं न्यायला तुमच्या जवळ एक निडरपणा असायला हवा. नास्तिक व्हायचं झालं तर ते सगळे आधाराचे दोर कापावे लागतील म्हणुन मग देव आणि धर्माच्या आधारानी जगत गेलो तर जगणं सुसह्य होतं.आणि आज हा प्रत्येकाचा तुमचा माझा अनुभव आहे.काही अडचण आली ,संकट आली तर त्यापाठीमागच्या कारणांची वैद्यानिक चिकित्सा करण्याऐवजी त्यामागचा कार्यकारण भाव जाणुन घेण्याऐवजी आपण देवाच्या नावाचा धावा करतो. यातुन ठोस असं काहीच साध्य होत नाही.हे आपणालाही माहित असत मात्र आपण रोजच आपली फसवणुक करत जातो. उदा ,एखादा विद्यार्थी परीक्षा देतो व निकाला आधी देवाचा धावा करतो.निकालाच्या दोनच शक्यता आहेत एक तो उत्तीर्ण होईल किंवा अनुत्तीर्ण तरी पण जर त्याने अभ्यास केला नसेल व अनुत्तीर्ण होणार असेल तर त्याला अनुत्तीर्णतेकडे डोळेझाक करायची आहे.यासाठी त्याला देवाच्या आधाराची गरज आहे. तो करतो .आणि समजा उत्तीर्ण झालाच तर त्याच श्रेयही देवालाच देतो. पण परीक्षा पद्धती , निकाल तंत्र याच वैद्यानिक आकलन तो कधी करत नाही.हेच उदाहरण आपल्या जीवनात अनेक घटनांना लागु होत.
म्हणुन देवाचं वर्णन करताना '' सुख दुख में संगी साथी प्यारे भगवान हमारे '' असं केलं जातं. म्हणजे काय तर धार्मिक माणसाला देव नावाच्या काल्पनिक संकल्पनेकडुन एक भक्कम असा मानसिक आधार हवा असतो. हे इथपर्यंत सगळंच ठीक आहे.व्यक्ती देव मानतो व आपल्या वैयक्तीक जीवनात एक आधार शोधतो पण जेव्हा याच देव आणि धर्माच्या संकल्पनेचा राजकीय वापर सुरू होतो तेव्हा मात्र हे एका Cultured ,व उन्नत मानवी समाजासाठी मोठा धोका निर्माण होतो.मग मार्क्स म्हणल्याप्रमाणे #धर्म ही #अफुची गोळी बनतो आणि सगळा देशच मग एका वेगळ्याच उन्मादी नशेत चुर होतो.आणि आज हेच होताना दिसत आहे. आज रामजन्मभुमीवर रामाच्या मंदिराचा वाद यशस्वी झालेला दिसत आहे. तिथं राममंदिर बनवल गेल आहे.जर यांच्या मनात मी वर नमुद केल्यासारखी एक धार्मिक भावना असती तर एक छोट्याश्या समारंभाच स्वरूप देवुन  यांनी हा सोहळा उरकला असता पण मोदी आणि त्यांच्या पिलावळीला याच मोठं राजकीय भांडवल करायचं होतं व त्यांनी ते केलं.देशभर मोठमोठे फ्लेक्स लावणं,ज्यात बर्याच ठिकाणी रामापेक्षा मोदीचीच Branding जास्त झालेली दिसत आहे. वर्तमानपत्रात जाहिराती ,न्युज चैनलवर अयोद्ध्या ,राम मंदिर याबद्दलचे वार्तांकन ,वादचर्चा या सगळ्या Political Agenda चाच भाग आहे. पण या माध्यमातुन एक आधुनिक लेकशाही देश म्हणुन कितीतरी वर्ष मागे चाललो आहोत याबद्दल कुणाला काहीच बोलायचं नाही.देशात अफु पिवुन नाचणार्या या सर्वांना फक्त मंदिर हवं आहे.लोक कोविडमध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळं आपले प्रियजण गमावले याच दु:ख नाही.देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. दैनंदीन जगण्याचे प्रश्न टोकदार होत आहेत.देशातील 140 कोटी जनतेला अन्न , वस्त्र, निवारा,आरोग्य , शिक्षण इ .बाबतचा दर्जा पुरविण्यास जवळपास सर्वच सरकारे अगदी तोंडघशी पडली आहेत.यात राज्य शासन केंद्र शासनाचा ही समावेश आहे.सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार आढळुन येत आहे.अदानी सारखे भांडवलदार देशाच रक्त गोचिडापेक्षाही आधिक तीव्रतेने पीत आहेत .पण याबद्दल देशातील So called पत्रकार,विद्वान विचारवंत, साहित्यिक यांना कुणालाच बोलयचं नाही.हे चित्र भयावह आहे.या वेळी मला भगतसिंग आठवतात आणि या सगळ्या राजकीय अजेंड्याची शिकार झालेल्या उन्मादी लोकांची कीव येते.हे असंच चालत राहिलं तर एक दिवस आपला देश रसातळाला जाईल आणि पुढच्या पिढ्या भारत हा कधी बुद्ध ,महावीर ,ओशो,भगतसिंग,गांधी,
आंबेडकर ,फुले या महान मानवाचा देश होता यावर विश्वास ठेवणार नाहीत.
                           - विक्रांत शंके

Comments