हे माणसा !
हे माणसा !
तु जग जन्माला घातल आपल्या मांडणीतुन , मांडलस तत्वज्ञान, रचलीस महाकाव्य
पण माणसा लक्षात घे
आजवर तु आदर्शवादाच तत्वज्ञान मांडल फक्त ,
ते कधीच कृतीत उतरवलं नाही.
तुझी ,नेहमी समोरच्याने तेवढं माणुस असावं ही अपेक्षा राहिली कायम .
हे माणसा !
तु या जगात येवुन मांडलीस गृहितक , केल्याच बेरजा
पण स्व:हिताच्या आणि ,
स्वार्थाच्या सुविचाराने भरलीस व्यवहारवादाच्या पुस्तकांची पानं ,
त्यागाच्या नावाखाली आमच्यासारख्या कोर्या डोक्याच्या तरूणांना पाजली आदर्शवादाची अफु नी केलं बरबाद .
आता आम्ही सापडलोय असंख्य विचारांच्या भोवर्यात ,
संदिग्ध अश्या संकल्पनांच्या कोलाहलात ,जागोजागी.
आज आमचं जगणं मुश्किल झालंय,
इंद्राच्या मयसभेसारखं
हे वास्तवं ,चुकवतंय, फसवतंय
आणि पावलोपावली फुकुंन पावलं टाकावी लागताहेत आम्हांला .
वरून हे खोट जगणं परवडत नाही .
असह्य होतंय रे
आदर्शवादाच्या मासुम चेहर्यामागे लपलेले स्वार्थाचे, अनैतिकतेचे भेसुर चेहरे.
आम्हांला सतावताहेत
रोज स्वप्नात येताहेत त्या आदर्शवादाचं प्रेत खांद्यावर घेवुन .
आता बस्स झालं
मी हे तुझं बनवलेलं विश्व तोडतोय
तुझ्या परवानगीसह वा परवानगीविना.समाजबाह्यतेची भीती पत्करून .
- Vikrant


Wa mast
ReplyDeleteSuperb 👍🏻👍🏻
ReplyDeleteसुपर 👌👌bhai
ReplyDeleteअप्रतिम रचना विक्रांत ...
ReplyDeleteOutstanding
ReplyDeleteखूपच छान...
ReplyDeleteअप्रतिम विक्रांत जी
ReplyDeleteखूप छान विक्रांत जी
ReplyDeleteSuper bro
ReplyDeleteRealstic Satire.better observation of society & human beings. VIKRANT Congratulations by heart Stay at home,stay safe.
ReplyDeleteमस्त नेते....
ReplyDeleteSuper
ReplyDelete