हे माणसा !


हे माणसा ! 
तु जग जन्माला घातल आपल्या मांडणीतुन , मांडलस तत्वज्ञान, रचलीस महाकाव्य
  पण माणसा लक्षात घे  
आजवर तु आदर्शवादाच   तत्वज्ञान मांडल फक्त ,
ते कधीच कृतीत उतरवलं नाही.
तुझी ,नेहमी समोरच्याने तेवढं माणुस असावं ही अपेक्षा राहिली कायम .
हे माणसा !
तु या जगात येवुन मांडलीस गृहितक , केल्याच बेरजा 
पण  स्व:हिताच्या  आणि ,
स्वार्थाच्या सुविचाराने भरलीस व्यवहारवादाच्या पुस्तकांची पानं ,
 त्यागाच्या  नावाखाली आमच्यासारख्या कोर्या डोक्याच्या तरूणांना पाजली आदर्शवादाची अफु नी केलं बरबाद .
आता  आम्ही सापडलोय असंख्य विचारांच्या भोवर्यात ,
संदिग्ध अश्या संकल्पनांच्या कोलाहलात ,जागोजागी.  
आज आमचं  जगणं मुश्किल झालंय,
इंद्राच्या मयसभेसारखं
 हे वास्तवं ,चुकवतंय, फसवतंय
आणि पावलोपावली फुकुंन पावलं टाकावी लागताहेत आम्हांला . 
वरून  हे खोट जगणं  परवडत  नाही .
 असह्य होतंय  रे
आदर्शवादाच्या मासुम  चेहर्यामागे लपलेले स्वार्थाचे, अनैतिकतेचे भेसुर चेहरे. 
आम्हांला  सतावताहेत 
रोज स्वप्नात येताहेत त्या आदर्शवादाचं प्रेत खांद्यावर घेवुन .
आता बस्स झालं 
 मी हे  तुझं बनवलेलं विश्व तोडतोय 
तुझ्या परवानगीसह वा परवानगीविना.समाजबाह्यतेची भीती पत्करून .
                  - Vikrant

Comments

Post a Comment